सिंध प्रांताचे मुख्यमंत्री मुराद अली शाह आणि भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सिंध प्रांताचे मुख्यमंत्री मुराद अली शाह यांनी राजनाथ यांच्या विधानावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी संरक्षण मंत्र्यांच्या विधानाला विसंगत, तथ्यहीन, निराधार आणि कल्पानात्मक म्हटले आहे. मुराद अली शाह यांनी सांगितले आहे की, सिंध हा पाकिस्तानचा भाग आहे, जो त्याची ओळख, भाषा आणि संस्कृतीवर ठाम आहे. मुराद यांनी म्हटले की, भारक केवळ कल्पनेच्या जगातच सिंध प्रांताला आपला भाग मानू शकतो. तसेच त्यांनी भारतीय नेत्यांवर उपहासात्मक टीप्पणी करत, त्यांना दिवसा स्वप्ने पाहणे थांबवण्याचा सल्ला दिला आहे.
मुराद अली शाह यांनी दावा केला आहे की सिंध प्रांत १९३६ मध्ये ब्रिटिशांनी बॉम्बे प्रेसीडेंटपासून वेगळा केला होता. यानंतर सिंध प्रांताचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण झाले. पूर्वी पाकिस्तान यामध्ये नव्हता. तसेच सिंध प्रांतात हिंदू लोकसंख्या अधिक होती. पण आता सिंध पाकिस्तानचा भाद आहे.
याशिवाय पाकिस्तानने (Pakistan) देखील राजनाथ यांच्या विधानावर कडक शब्दात टीका केली आहे. त्यांनी राजनाथ यांच्या सिंध प्रांतावरील विधानाला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन म्हटले आहे. तसेच भारताच्या दृष्टीकोनाला अस्वीकाहार्य म्हटले आह. पाकिस्तानच्या मते, राजनाथ सिंह यांचे विधान हे विस्तारतावादी आणि हिंदुत्ववादी विचारसरणीचे आहे.
भारत आणि पाकिस्तानमधील तणाव हा ऐतिहासिक भाग आहे. दोन्ही देशांतील राजकीय, लष्करी, आणि भौगोलिक संबंध अधिक गुंतागुंतीचे आहेत. अशा परिस्थिती सिंध प्रांतावरील राजनाथ सिंह यांचे विधान हे दोन्ही देशात नवा वाद निर्माण करणार आहे. या विधानामुळे पाकिस्तानला धोका जाणवत आहे. पूर्वी पाकिस्तान देखील भारताचाच भाग होता. तेव्हा भारताला हिंदुस्तान या नावाने ओळखले जायचे. पण १९४७ मध्ये इंग्रजांची राजवट संपली हिंदुस्तानची भारत-पाकिस्तान अशी फाळणी झाली. तेव्हापासून आतापर्यंत दोन्ही देशांत तणाव कायमस्वरुपी आहे.






