फोेटो - सोशल मीडिया
वॉशिंग्टन : अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक घेतली जाणार आहे. त्यानुसार, अनेक पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी यापूर्वीच निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे आता अमेरिकेत माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि माजी उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांच्यात प्रमुख लढत पाहिला मिळणार आहे. यासाठी येत्या 5 नोव्हेंबरला मतदान घेतले जाणार आहे.
हेदेखील वाचा : व्हाईट हाऊसमध्ये दिवाळीचा जल्लोष; बायडेन यांनी कमला हॅरिसचे कौतुक करत दिल्या शुभेच्छा
अमेरिकेत 5 नोव्हेंबरला होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीबाबत जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती एलॉन मस्क यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा दिला आहे. इतकेच नाहीतर ट्रम्प यांच्यावर टीका करणाऱ्यांवरही चोख प्रत्युत्तर दिले आहे. एलॉन मस्क यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा दिला आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला अवघे सात ते आठ दिवस उरले आहेत. यामुळे सध्या अमेरिकेत राजकीय वातावरण तापले आहे.
रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार व माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस यांच्या निवडणुकीसाठी लढत सुरू आहे. त्यातच माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांनी मिशिगनमध्ये कमला हॅरिस यांच्या समर्थनार्थ रॅली काढली. मिशेलने या रॅलीत कमला हॅरिस यांना पाठिंबा देत अमेरिकेच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्षाची निवड करण्यासाठी आव्हान दिले आहे.
ट्रम्प यांनी मागितली मुस्लिम समाजाकडे मतं
तसेच दुसरीकडे, डोनाल्ड ट्रम्प यांनी मिशिगनमध्ये रॅली काढून मुस्लिम आणि अरब मतदारांचे समर्थन मागितले. या रॅलीदरम्यान ट्रम्प म्हणाले की, गाझामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे आणि त्यावर अमेरिकेची भूमिका पाहता, डेमोक्रॅटिक पक्षाबाबत मुस्लिम आणि अरब मतदारांमध्ये नाराजी आहे. याचा फायदा घेत ट्रम्प यांनी शांततेचे वचन दिल्याचे मुस्लिम नेते बेलाल अलझुहैरी यांनी सांगितले.
व्हाईट हाऊसमध्ये साजरी केली दिवाळी
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी सोमवारी व्हाईट हाऊसमध्ये मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी केली. या विशेष कार्यक्रमात 600 हून अधिक प्रतिष्ठित भारतीय-अमेरिकन सदस्यांसह काँग्रेस सदस्य, सरकारी अधिकारी आणि कॉर्पोरेट नेत्यांनी हजेरी लावली. जो बाडेन यांनी व्हाईट हाऊसमध्ये सर्वात मोठ्या दिवाळी रिसेप्शनचे आयोजन करण्याचा मान मिळाल्याबद्दल आपला अभिमान व्यक्त केला. तसेच त्यांनी यादरम्यान कमला हॅरिस यांचेही कौतुक केले.
हेदेखील वाचा : मिशेल ओबामा यांचा कमला हॅरिसला पाठिंबा; तर ट्रम्प यांनी मागितले मुस्लिम आणि अरब मतदारांचे समर्थन