काय आहे सायबेरियात निर्माण होत असलेल्या खोल खड्ड्यांचे रहस्य? पृथ्वीसाठी धोक्याची सूचना तर नव्हे ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
रशियातील सायबेरिया प्रदेश हा विस्तीर्ण आणि थंड वातावरणासाठी ओळखला जातो मात्र अलिकडच्या वर्षांत येथे निर्माण झालेल्या अनेक मोठ्या खड्ड्यांमुळे जगभरात चिंता व्यक्त होत आहे. रशियात या खड्ड्यांना “बल्गस” असे म्हणतात. शास्त्रज्ञ आणि भूगर्भशास्त्रज्ञ या खड्ड्यांच्या निर्माणामागील कारणे आणि त्यांच्या परिणामांचा अभ्यास करत आहेत, कारण हे खड्डे हवामान बदलाचे गंभीर संकेत देत आहेत.
खड्डे का निर्माण होतात?
सायबेरियामध्ये मुख्यत्वे पर्माफ्रॉस्ट अर्थात जमिनीचा कायमस्वरूपी गोठलेला थर वितळल्याने हे खड्डे तयार होतात. पर्माफ्रॉस्टमध्ये मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड आणि मिथेन वायू अडकलेले असतात. हजारो वर्षांपासून हे वायू पर्माफ्रॉस्टमध्ये सुरक्षित राहिलेले असतात, परंतु हवामान बदलामुळे जागतिक तापमानात झालेल्या वाढीमुळे पर्माफ्रॉस्ट वितळू लागला आहे. या वितळण्यामुळे वातावरणातील मिथेन आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर येतात आणि जमिनीवर दाब तयार होतो, ज्यामुळे मोठे खड्डे निर्माण होतात.
खड्डे तयार होण्याची प्रक्रिया
पर्माफ्रॉस्ट वितळल्यावर, त्यात अडकलेले वायू बाहेर येऊ लागतात. मिथेन आणि कार्बन डायऑक्साईडसारखे वायू जमिनीच्या आत दाब निर्माण करतात आणि तो दाब जसजसा वाढत जातो तसतसे जमिनीवर स्फोटासारखी परिस्थिती निर्माण होते. या स्फोटानंतर जमिनीवर मोठे विवर तयार होतात. या विवरांमधून कार्बन डायऑक्साईड आणि मिथेन सतत बाहेर पडत राहतात, ज्यामुळे वातावरणात ग्रीनहाउस वायूंचे प्रमाण वाढते आणि हवामान बदलात अधिक भर पडते.
हे देखील वाचा : जगातील ‘या ठिकाणी पोहोचून तुम्ही अमर होऊ शकता; इथे चक्क वय वाढायचे थांबते
2024 मध्ये पहिले विवर
2024 मध्ये सायबेरियात पहिल्यांदाच एक मोठा खड्डा दिसला, ज्यामुळे जगभरात खळबळ उडाली. त्यानंतर सायबेरियामध्ये अनेक ठिकाणी असे खड्डे दिसू लागले आहेत. शास्त्रज्ञांच्या मते, या खड्ड्यांची संख्या भविष्यात अधिक वाढण्याची शक्यता आहे. रशियन शास्त्रज्ञांचे मत आहे की या खड्ड्यांची निर्मिती केवळ सायबेरियामध्येच होत नाही तर हे खड्डे जागतिक हवामान बदलाचे इशारेही देत आहेत.
काय आहे सायबेरियात निर्माण होत असलेल्या खोल खड्ड्यांचे रहस्य? ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
हवामान बदलावर परिणाम
सायबेरियातील या खड्ड्यांमुळे बाहेर पडणारे मिथेन वायू हवामान बदलास कारणीभूत ठरत आहेत. मिथेन हा कार्बन डायऑक्साईडपेक्षा अधिक घातक ग्रीनहाउस वायू मानला जातो, कारण तो वातावरणात अधिक काळ टिकून राहतो आणि तापमानवाढीला कारणीभूत ठरतो. परिणामी या खड्ड्यांमुळे जागतिक तापमान वाढत आहे आणि हवामानातील बदलाची गती वाढू लागली आहे. शास्त्रज्ञांच्या मते जर यावर नियंत्रण ठेवले गेले नाही, तर जागतिक हवामान बदलाचे परिणाम अधिक गंभीर होतील.
हे देखील वाचा : ‘मी त्याच दिवशी रडेन जेव्हा…’, इस्रायली हल्ल्यात मारल्या गेलेल्या मेजरच्या पत्नीने खामेनेईंना काय म्हटले?
सायबेरियातील बल्गसचा जागतिक संकेत
सायबेरियातील बल्गस हा जागतिक हवामान बदलाचा स्पष्ट संकेत आहे. या खड्ड्यांमुळे विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात असलेली आव्हाने अधिक कठीण बनत आहेत. हवामान बदलामुळे निर्माण होणारी ही विवरे एक चेतावणी आहे की पृथ्वीवरील तापमान वाढत असल्यामुळे पर्माफ्रॉस्टसारखे गोठलेले क्षेत्र वितळू लागले आहेत, ज्यामुळे वातावरणात ग्रीनहाउस वायूंची पातळी वाढत आहे.
सायबेरियातील या खड्ड्यांचे रहस्य अजूनही शास्त्रज्ञ उलगडण्याचा प्रयत्न करत आहेत. या खड्ड्यांमुळे पर्यावरणीय संतुलन बिघडू शकते आणि भविष्यात आणखी गंभीर परिणाम दिसू शकतात. हवामान बदलावर नियंत्रण ठेवण्यासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे, कारण या बदलांचा प्रभाव केवळ एका प्रदेशावरच नव्हे तर संपूर्ण पृथ्वीवर होऊ शकतो.