भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर कधी परतणार? जाणून घ्या महत्त्वाची अपडेट (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
भारतीय अंतराळवीर सध्या अमेरिकेच्या सेप्सएक्स आणि अॅक्सिओम स्पेस यांच्या अॅक्सिओम -4 आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात आहेत. २५ जुन रोजी शुभांशू शुक्ला यांनी अंतराळात उड्डाण घेतले होते. त्यानंतर २८ तासांच्या प्रवास त्यांनी केला आणि आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात दाखल झाले. भारतासाठी ही मोहीम अत्यंत महत्त्वाची आहे. दरम्यान शुभांशू शुक्ला यांच्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरुन परतण्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
केंद्रीय जितेंद्र सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभांशू शुक्ला १५ जुलै रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजता पृथ्वीवर परतण्याची शक्यता आहे. शुभांशू शुक्ला यांनी अॅक्सिओम -4 या मोहिमेंतर्गत तीन अंतराळावीरांच्या टीमसह उड्डाण केले होते. हे मिशन १४ दिवसांचे होते. हे मिशन आता पूर्ण झाले असून शुभांशू शुक्ला आपल्या टीमसह पृथ्वीवर परतण्याच्या तयारीत आहेत. या मोहिमेत शुभांशू यांच्यासह नासाच्या अंतराळवीर आणि Ax-4 मोहिमेच्या प्रमुख पेगी व्हिटसन, तसेच पोलंडचे स्लावोस उजनास्की-विस्निवेस्की आणि हंगेरीचे तिबोर काबू सहभागी झाले आहेत.
केंद्रिय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर म्हटले आहे की, अॅक्सिओम -4 मोहिमेचा अनडॉकिंग १४ जुलै रोजी दुपारी ४.३० वाजता निश्चित करण्यात आला आहे. शुभांशू शुक्ला यांच्या पृथ्वावीर परतण्याची प्रक्रिया १५ जुलै रोजी सुरु होईल. त्यानंतर भारतीय वेळेनुसार, ३ वाजेपर्यंत शुभांशू शुक्ला आणि त्यांची टीम पृथ्वीवर परततील. यामध्ये सुमारे एक तासाचा मार्जिन विंडो आहे. तसेच त्यावेशी देखील महत्त्वाच्या अपडेट्स शेअर केल्या जातील असे जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे.
स्पेसएक्सचे ड्रॅगन कॅप्सूल अनडॉकिंगनंतर काही तासांनी पॅसिफिक महासागरात कॅलिफोर्नयाच्या किनाऱ्यावर उतरण्याची अपेक्षा आहे. या मोहिमेचे नेतृत्त्व कमांडर पेगी व्हिट्सन करत आहेत. तर शुभांशू शुक्ला यांनी पायलटची भूमिका बजावली आहे.
Lucknow, Uttar Pradesh: IAF Group Captain Shubhanshu Shukla’s father, Shambhu Dayal Shukla says, “We are all very excited! His return will begin tomorrow on 14th July, and we are eagerly waiting for him to arrive on the Earth on the 15th…” pic.twitter.com/jAJzi2owi2
— IANS (@ians_india) July 13, 2025
नासाने दिलेल्या माहितीनुसार, अॅक्सिओम-४ टीमने या १४ दिवसांच्या मोहीमेंतर्गत अनेक महत्त्वाचे प्रयोग केले आहेत. यामध्ये बायोमेडिकल संशोधनाअंतर्गत रक्ताचे नमुने घेण्याच आले. यावर अंतराळात सूक्ष्म शैवालांचा अभ्यास करण्यात आला. याअंतर्गत अन्न आणि जीवन प्रणालींच्या स्त्रोतांचा अंतराळात शोध घेतला गेला. तसेच नॅनोमटेरियल्सचाही अभ्यास करण्यात आला. यामुळे वेअरेबल उपकरणांच्या विकासात मदत होते. या उपकरणांमुळे अंतराळातील क्रू मेंबर्सच्या आरोग्यावर लक्ष ठेवता येऊ शकते. याशिवाय अंतराळात विद्युत स्नायू उत्तेजना, थर्मल कम्फर्ट सूट मटेरियलची चाचणी आणि क्रू मेंबर्सच्या वर्तणुकीचा अभ्यासही करण्यात आला आहे.