फोटो सौजन्य- pinterest
मेष राशीच्या लोकांसाठी चतुर्ग्रही योग खूप शुभ राहणार आहे. मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप अनुकूल राहणार आहे. धार्मिक आणि शुभ कार्यक्रमांमध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता. व्यवसायानिमित्त तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. तुमच्या कुटुंबात आनंद आणि समृद्धी नांदेल. मित्रांकडून तुम्हाला सहकार्य मिळेल. तुम्ही घेतलेल्या मेहनतीचा तुम्हाला फायदा होईल. या काळात तुम्हाला नशिबाची अपेक्षित साथ मिळेल. व्यवसायात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. कला क्षेत्रात असणाऱ्या लोकांना अपेक्षित यश मिळेल.
धनु राशीत चतुर्ग्रही योग तयार होत आहे. या काळात तुमच्यामधील आत्मविश्वास देखील वाढेल. तुमचे काम यशस्वी होईल आणि विवाहित लोकांचा वेळ चांगला जाईल. तुमच्या जीवनसाथीकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. करिअरमध्ये प्रगती शक्य आहे. बढती आणि पगारवाढीमुळे तुम्ही आनंदी असाल. तु्मची नियोजित कामे पूर्ण होतील. जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. करिअरमध्ये नवीन जबाबदारी मिळू शकते. नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नती किंवा बढती देखील मिळू शकते.
चतुर्ग्रही योगाचा फायदा मीन राशीच्या लोकांना होणार आहे. मीन राशीच्या लोकांना त्यांच्या कारकिर्दीत आणि व्यवसायात प्रगती दिसेल. कामावर नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात. तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. पूर्ण समर्पणाने काम करा. तुम्ही घेतलेल्या मेहनतीचा तुम्हाला फायदा होईल. जे लोक स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांना अपेक्षित यश मिळेल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: ज्यावेळी एकाच राशीत चार ग्रहांचा संयोग होतो. तेव्हा चतुर्ग्रही योग तयार होतो. हा योग खूप शक्तिशाली मानला जातो
Ans: सूर्य, बुध, मंगळ आणि बृहस्पति हे चार ग्रह धनु राशीत एकत्र येतात. म्हणून धनु राशीमध्ये हा योग तयार होणार आहे
Ans: चतुर्ग्रही योगाचा मेष, धनु आणि मीन राशीच्या लोकांना फायदा होणार आहे






