(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर ४ फेब्रुवारीपर्यंत अमेरिकेत असणार आहेत. यावेळी राजधानी वॉशिंग्टन येथे मंगळवारी (०३ फेब्रुवारी) पहिली द्विपक्षीय बैठक घेतील. या बैठकी दोन्ही देशांतील प्रादेशिक आणि जागतिक पातळीवर अनेक मुद्यांवरही चर्चा होणार आहे. यामध्ये रशिया युक्रेन युद्ध, मध्य पूर्वेतील सद्य परिस्थिती, परस्पर आर्थिक आणि धोरणात्म सहकार्यावरही चर्चा होणार आहे.
तसेच बुधवारी (०४ फेब्रुवारी) दुसरी द्विपक्षीय बैठक होणार आहे. यामध्ये महत्वाच्या खनिजांवर चर्चा होईल. भविष्यातील खनिज पुरवठा वाढवणे, धोरणात्मक सहकार्याला बळकटी देणे यांसारख्या विषयांवर सविस्तर चर्चा केली जाईल. यावेळी अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स देखील सहभागी होण्याची शक्यता आहे.
ही उच्चस्तरीय बैठक अध्यक्ष ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांच्यातील फोन संभाषणानंतर होत आहे. या संभाषणात दोन्ही नेत्यांनी नव्या व्यापार कराराची घोषणा केली होती. सुरुवातील अमेरिकेने भारतावर ५०% टॅरिफ लादले होते. परंतु पंतप्रधान मोदींशी झालेल्या चर्चेनंतर आणि व्यापाराच्या घोषणेनंतर हे टॅरिफ कमी करण्यात आले आहे. सध्या अमेरिकेने भारतावर १८% टॅरिफ लादले आहे. यामुळे उच्चस्तरीय आणि द्विपक्षीय बैठकांना अधिक वेग आला आहे. यामुळेच जयशंकर यांचा दौरा अत्यंत महत्वपूर्ण आणि सकारात्मक पाउल मानला जात आहे. यामुळे दोन्ही देशांतील व्यापार उद्दिष्ट्ये स्पष्ट होतील.
Ans: परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर अमेरिकेशी द्विपक्षीय संबंधावर आणि महत्वपू्ण खनिजांवर चर्चेसाठी अमेरिकेला गेले आहेत.
Ans: एस. जयशंकर अमेरिकेत मार्को रुबियो यांच्याशी द्विपक्षीय संबंधावर आणि महत्वपूर्ण खनिज सहकार्यावर, तांत्रिक आणि आर्थिक सुरक्षा, प्रादेशिक सहकार्य आणि काही आंतरराष्ट्रीय मुद्यांवर चर्चा करणार आहेत.
Ans: अलीकडेच पंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष ट्रम्प यांच्या चर्चा झाल्यानंतर व्यापाराची मोठी घोषणा करण्यात आली होती. तसेच भारतावरली टॅरिफही कमी झाले होते. यामुळे द्विपक्षीय व्यापार सहकार्या वाढविण्यासाठी जयशंकर याचा अमेरिका दौरा महत्वाचा मानला जात आहे.






