लास वेगास : विमानातील प्रवासी आणि विमान कर्मचाऱ्यांमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून खटके उडत असल्याचे आपण अनेकदा पाहिले असेल. पण लास वेगासमधील (Las Vegas) हॅरी रीड आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Harry Reid International Airport) एक धक्कादायक प्रकार घडला. विमानात चढणाऱ्या तरुणींच्या कपड्यांवर विमानातील कर्मचाऱ्यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर त्या तरुणींना सर्वांसमोरच कपडे बदलण्यास सांगण्यात आल्याचा आरोप या तरुणींनी केला आहे.
Omfg an @AmericanAir employee forced me and @keanuCthompson to change our pants before getting on the flight which actually turned out to be MORE REVEALING
THIS IS NO WAY TO TREAT A REWARDS MEMBER pic.twitter.com/SgjCrHdLHV
— Chrissie Mayr🇺🇸 (@ChrissieMayr) May 2, 2023
या दोन तरुणींनी केलेल्या खळबळजनक आरोपामुळे विमान कंपनीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. यातील कॉमेडियन असलेल्या क्रिसी मेयर या महिलेने ट्विट करून ही माहिती दिली. त्यामध्ये तिने म्हटले आहे की, ‘अमेरिकन एअरलाइन्स कर्मचाऱ्याने त्यांना सार्वजनिक ठिकाणी सर्वांसमोर कपडे बदलण्यास भाग पाडले होते. सर्वांसमोर अशाप्रकारे कपडे बदलण्यास सांगितल्याने आम्हाला हे अजिबात आवडले नाही. मात्र, मला माझी फ्लाइट वेळेवर पकडायची होती. त्यामुळे मला तसे करणे भाग पडले. हे प्रकरण अमेरिकेतील लास वेगासचे आहे’.
ट्विट करत दिली माहिती
क्रिसी मेयरने ट्विट करून या घटनेची माहिती दिली आहे. यामध्ये तिने लास वेगासमधील हॅरी रीड आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपल्यासोबत गैरवर्तन झाल्याचे म्हटले आहे.
दोघांनी परिधान केले होते मॅक्सी स्कर्ट
मायरने ट्विटरवर दोन फोटो शेअर केली आहेत. एका चित्रात ती आणि तिची प्रवासी सहकारी कियावू मॅक्सी स्कर्ट आणि ट्राउझर्समध्ये दिसत आहेत. तर दुसऱ्या चित्रात दोघी शॉर्ट्समध्ये आहेत. त्यांना प्रवेशद्वारासमोरच कपडे बदलावे लागले, असा दावा त्यांनी केला.