जगभरात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. कोविड-19 (Covid-19) विषाणूचा धोका अजुनही टळलेला नाही. जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, युरोपमध्ये गेल्या सहा आठवड्यांमध्ये कोरोना संसर्ग (Corona Spread) तिपटीने वाढला आहे. हे प्रमाण जगभरातील कोरोना संसर्गाच्या ५० टक्के आहे. रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्यादेखील दुप्पट झाली आहे. या सगळ्या वातावरणात दिलासादायक बाबा इतकीच आहे की, अतिदक्षता विभाग (ICU) भरती होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी आहे.
[read_also content=”आम्ही हाडाचे शिवसैनिक मग अपात्र का ठरवता ? दिपक केसरकरांचा सवाल https://www.navarashtra.com/maharashtra/dipak-kesarkar-statement-about-shivsena-and-shinde-group-nrsr-306802.html”]
जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) युरोपचे संचालक डॉ. हंस क्लूज (Dr. Hans Kluge) यांनी युरोपमधील वाढत्या कोरोना रुग्णांविषयी चिंता व्यक्त केली आहे. डॉ. हंस क्लूज म्हणाले की, कोरोना भयानक घातक आजार आहे. या आजाराकडे दुर्लक्ष करु नका, असं आवाहन मी करतो. युरोपमध्ये गेल्या दीड महिन्यांमध्ये कोरोना रुग्णांचे प्रमाण तीन पटीनं वाढलं आहे. युरोपातील आरोग्य व्यवस्थेची चिंता वाढली आहे.
जागतिक आरोग्य संघटना (WHO) युरोपचे संचालक डॉ. हंस क्लुगे यांनी युरोपमधील लोकांना कोरोनाबाबत सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. लोकांनी कोरोना आजाराकडे दुर्लक्ष न करता याला गांभीर्याने घेण्याचं आवाहन केलं आहे. डॉ. क्लुगे म्हणाले की, ओमायक्रॉनच्या उपप्रकारांमुळे कोरोनाची नवी लाट आली आहे. वारंवार होणारे संक्रमण दीर्घकाळ कोरोनाचं कारण बनू शकते. वाढत्या रुग्णसंख्येमुळे रूग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही सातत्याने वाढ होत असल्याचं दिसत आहे. रुग्णसंख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. यामुळे आरोग्य व्यवस्थेसमोर मोठे आव्हान असेल.