आता एआय एअर होस्टेस फ्लाइटमध्ये करणार तुमचं स्वागत! भेट जगातल्या पहिल्या AI Airhostess ला

AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स जगभरात नवनवीन चमत्कार दाखवत आहे. आता कतार एअरवेजने जगातील पहिली एआय आधारित एअर होस्टेस लाँच केली आहे. त्यातून प्रवाशांना अनेक प्रकारची माहिती मिळणार आहे. ज्यामध्ये प्रवास आणि विमान सुरक्षेशी संबंधित माहिती असेल.

  जगभरात आपण दररोज एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या चमत्कारांबद्दल ऐकत असतो. आता असे कोणतेही क्षेत्र शिल्लक राहणार नाही ज्यामध्ये AI वापरला जात नाही. हे लोकप्रिय तंत्रज्ञान आता डिजिटल मानवी केबिन क्रूच्या रूपात वापरले जात आहे.  कतारच्या सरकारी विमान कंपनीने SAMS 2.0 सादर केले आहे. ही जगातील पहिली AI आधारित एअर होस्टेस (World’s First AI Airhostess) आहे. त्याचे नाव समा असं ठेवण्यात आलं आहे.

  कतार एअरवेजने एआय एअर होस्टेस

  कतार एअरवेजने वेब समिट कतारमध्ये एआय-आधारित एअर होस्टेसचे प्रदर्शन केले. मात्र, मानवी एअर होस्टेसच्या नोकऱ्यांना कोणताही धोका होणार नाही. या एआय एअर होस्टेसला अतिरिक्त वैशिष्ट्य म्हणून विमानात ठेवले जाईल. यामुळे जगातील इतर विमान कंपन्यांनाही चालना मिळेल. शिवाय प्रवाशांचा अनुभवही चांगला राहील.

  एआय एअर होस्टेसमध्येची वैशिष्ट्यं

  आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित सनामध्ये अनेक वैशिष्ट्ये आहेत. एआय सामाची ही अपडेटेड आवृत्ती रिअल टाइम उत्तरे देऊ शकते. डेस्टिनेशन, सपोर्ट टिप्स व्यतिरिक्त, यात इतर माहिती प्रदान करण्याची वैशिष्ट्ये देखील आहेत.

  क्यूवर्स कतार एअरवेजच्या डिजिटल प्लॅटफॉर्म आणि अधिकृत ॲपद्वारे एआय एअरहोस्टेसची सेवा आपल्याला घेत येते. कतार एअरवेज आणि UneeQ यांनी संयुक्तपणे AI आधारित मॉडेल SAMAA विकसित केले आहे. प्रवाशांना अधिक चांगला अनुभव आणि सेवा देणे हा याला लॉन्च करण्यामागचा उद्देश असल्याचे कंपनीने म्हटले आहे.