
कारमधील मित्र दिल्लीहून हरिद्वारच्या दिशेने जात होते. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. सर्व मृतांची ओळख पटली आहे.
मुझफ्फरनगर : ऐन सणासुदीच्या दिवसात गेल्या 24 तासात अनेक दुर्घटना घडल्या असून या दुर्घटनेत अनेक लोकांनी जीव गमावला आहे. सोमवारी हैदराबादमधील नामपल्ली परिसरात केमिकलमुळे लागलेल्या आगीत तब्बल नऊ जणांचा मृत्यू झाला. आता उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये भीषण रस्ता अपघात झाला असून त्यात ६ जणांचा मृत्यू (6 Friends Died In Accident at Delhi Dehradun road) झाला आहे. दिल्ली-डेहराडून महामार्गावर हा अपघात झाला. सर्व मृतांची ओळख पटली आहे असून हे सहाही जण मित्र असल्याची माहिती समोर आली आहे.
मित्र हरिद्वारला जात होते
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली-डेहराडून महामार्गावरील छप्पर पोलीस स्टेशन हद्दीतील शाहपूर कटजवळ मंगळवारी पहाटे ४.०० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. सीओ विनय गौतम यांनी सांगितले की, सियाझ कार नियंत्रणाबाहेर गेली आणि मागून मुझफ्फरनगरहून हरिद्वारकडे जाणाऱ्या ट्रकला धडकली, ज्यात कारमध्ये प्रवास करणाऱ्या सर्व सहा तरुणांचा जागीच मृत्यू झाला.
योगेंद्र त्यागीचा मुलगा शिवम, दीपक शर्माचा मुलगा पारश, नवीन शर्माचा मुलगा कुणाल, धीरज, विशाल आणि आणखी एक मित्र अशी मृतांची नावे आहेत, सर्वजण शाहदरा, दिल्लीचे रहिवासी आहेत. मृतांच्या नातेवाइकांना माहिती दिल्यानंतर छापर पोलीस ठाण्याने मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.