महिला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात दोन्ही संघांमधील लढती नेहमीच चुरशीच्या झाल्या आहेत. आतापर्यंत एकूण ४४ सामने खेळवले गेले आहेत. यात ऑस्ट्रेलियाने २३ तर इंग्लंडने २१ सामन्यांत (सुपर ओव्हरसह) विजय मिळवला आहे. इंग्लंडने मायदेशात खेळलेल्या १७ सामन्यांपैकी ११ सामने जिंकले आहेत, तर ऑस्ट्रेलियाला केवळ ६ सामन्यांत विजय मिळवता आला आहे. टी-२० विश्वचषकात दोन्ही संघ ७ वेळा आमनेसामने आले आहेत, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने ५ तर इंग्लंडने २ सामने जिंकले आहेत. इंग्लंडला आपल्या घरच्या मैदानावर खेळण्याचा आणि प्रेक्षकांच्या पाठिंब्याचा मोठा फायदा मिळू शकतो.
डॅनी व्याट-हॉज: चालू विश्वचषकात तिने सर्वाधिक २९४ धावा कुटल्या असून ती तुफान फॉर्मात आहे.
नॅट सायव्हर-ब्रंट: कर्णधार नॅट सायव्हर-ब्रंट बॅट आणि बॉल दोन्हीने सामन्याचा नूर पलटवण्यात पटाईत आहे.
सोफी एक्लेस्टोन आणि चार्ली डीन: या फिरकी जोडीने स्पर्धेत प्रत्येकी ९-९ विकेट्स घेत इंग्लंडला फायनलमध्ये पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
एलिस पेरी: ऑस्ट्रेलियाकडून तिने या स्पर्धेत सर्वाधिक १८५ धावा केल्या आहेत. पेरीला मोठ्या सामन्यांमधील मॅचविनर खेळाडू मानले जाते.
सोफी मोलिनक्स: कर्णधार सोफी मोलिनक्सने शानदार गोलंदाजीचे प्रदर्शन करत आतापर्यंत १० विकेट्स चटकावल्या आहेत.
इतर मॅचविनर्स: ॲशले गार्डनर, बेथ मूनी आणि ॲनाबेल सदरलँड या कोणत्याही क्षणी सामन्याचे चित्र बदलू शकतात.
इंग्लंड महिला संघ: डॅनी व्याट-हॉज, ॲमी जोन्स (विकेटकीपर), नॅट सायव्हर-ब्रंट (कर्णधार), ॲलिस कॅप्सी, हीथर नाईट, फ्रेया केम्प, डॅनी गिब्सन, चार्ली डीन, सोफी एक्लेस्टोन, लिन्से स्मिथ, लॉरेन बेल.
ऑस्ट्रेलिया महिला संघ: बेथ मूनी (विकेटकीपर), जॉर्जिया व्होल, फोबी लिचफिल्ड, एलिस पेरी, ॲशले गार्डनर, जॉर्जिया वेरहॅम, ॲनाबेल सदरलँड, निकोला केरी, सोफी मोलिनक्स (कर्णधार), किम गार्थ, लुसी हॅमिल्टन.






