शेव्हींग करणं पडलं महागात; रेझरचा एक कट आणि तरुणीनं गमावला तिचा पाय!

समुद्रकिनाऱ्यावर गेल्यावर त्याच्या कटात फ्लॅश खाणारे बॅक्टेरिया शिरले होते, त्यामुळे हा संसर्ग झाल्याचे आढळून आले. त्यामुळे शेवटी डॉक्टरांनी तिचा पाय कापण्याचा निर्णय घेतला.

  तरुणींना कायम सुंदर आणि निटनेटकं दिसावं असं वाटतं. अनेकदा बाहेर जाताना वॅक्सींग केलं नसेल, पार्लरमध्ये जाण्यासाठी वेळ नसेल तर मुली  हेअर रिमूव्हवर क्रिमने किंवा रेझरने केस हातापायावरील केस काढतात. पण असं घाईघाईत केलेल्या शेव्हींगमुळे (Sheving) एका मॅाडेलला तिचा पाय गमवावा लागल्याची घटना उघडकीस आली आहे. अटलांटा येथील तरुणी जेनिफर बार्लोने रेझरचा वापर करत पायावरील केस काढले. मात्र, शेव्हींग करताना तिच्या पायाला जखम झाली आणि जखमेमध्ये संसर्ग होऊन तिला तिचा पाय कापवा लागला आहे. नेमकं काय आहे प्रकरण, जाणून घ्या.

  नेमकं प्रकरण काय?

  जेनिफर एक अमेरिकन मॉडेल आहे, जी समुद्र किनारी फिरण्यासाठी गेली होती. यावेळी तिने पायाचं शेव्हींग केलं. पण घाईघाईत शेव्हींग करताना तिच्या पायाल रेझरचा कट लागला. यानंतर ती बीचवर एन्जॉय करायला गेलीय पण हळूहळू  त्या जखमेमध्ये संसर्ग झाल्याने तिला त्रास सुरू झाला. संसर्ग वाढत गेल्याने डॅाक्टरांना तिचा  पाय कापावा लागला आहे.

  पायामध्ये झाला संसर्ग

  एका मुलाखतीदरम्यान या मॉडेलने सांगितले की, मी रेझरने पायाचे केस काढले. त्यावेळी पायावर छोटीसी जखम झाली. तिचा पाय दुखू लागला. पायावर  सूजनही आली. ‘माझ्या गुडघ्याचा आकार कमीत कमी तीनपट मोठा झाला होता’, यानंतर मी डॉक्टरांकडे गेले, त्यांनी दिलेल्या औषधाने बरी होईल असे वाटले. पण जखम वाढत गेली आणि त्याच्यात संसर्ग झाल्याचं लक्षात आलं.
  एक दिवस जेनिफर किचनमध्ये काम करत असताना ती अचानक कोसळली. त्याचवेळी घरी उपस्थित तिच्य कुटुंबियानी तिल रुग्णालयात दाखल केले. समुद्रकिनाऱ्यावर गेल्यावर त्याच्या कटात फ्लॅश खाणारे बॅक्टेरिया शिरले होते, त्यामुळे हा संसर्ग झाल्याचे आढळून आले. यानंतर, बार्लोची काही आठवडे तपासणी करण्यात आली. डॉक्टर त्यांचा पाय वाचवण्याचा प्रयत्न करत होते, मात्र त्यांच्या पायाची प्रकृती बिघडत चालली होती. शेवटी डॉक्टरांनी तिचा पाय कापण्याचा निर्णय घेतला.