Pune Railway News : पुणे रेल्वेच्या केटरिंग सेवेला प्रवाशांचा प्रतिसाद; महसूलात २६ टक्क्यांनी वाढ (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
हे देखील वाचा : Pune News : पुणेकरांची परदेशवारी सुसाट; मागील पाच वर्षांत पासपोर्ट अर्ज दुप्पट
विभागाच्या मासिक आकडेवारीनुसार काही महिन्यांत विक्रमी वाढ दिसून आली आहे. विशेषतः जुलै महिन्यात सर्वाधिक २०५.०९ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. २०२४-२५ मध्ये जुलै महिन्याचे उत्पन्न १२ लाख ४३ हजार ३२ रुपये होते, तर २०२५-२६ मध्ये ते वाढून ३७ लाख ९२ हजार ३३८ रुपयांपर्यंत पोहोचले. सप्टेंबर महिन्यातही १८२.६२ टक्क्यांची वाढ झाली असून उत्पन्न १७ लाख २४ हजार २७६ रुपयांवरून ४८ लाख ७३ हजार १८३ रुपयांपर्यंत गेले.
डिसेंबर महिन्यात १६७.२१ टक्के वाढ झाली असून उत्पन्न १२ लाख ८३ हजार ४५३ रुपयांवरून ३४ लाख २९ हजार ५०४ रुपयांवर पोहोचले. जानेवारी महिन्यात ११५.२२ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली, तर मार्च महिन्यात ७०.३१ टक्के वाढ झाली. जून महिन्यातही ४६.२७ टक्क्यांची वाढ झाल्याचे आकडेवारीत स्पष्ट झाले आहे.
मात्र काही महिन्यांत उत्पन्नात घटही झाली आहे. मे महिन्यात सर्वाधिक ६८.७५ टक्क्यांची घट नोंदवली गेली. ऑगस्ट महिन्यात ६०.०८ टक्के, नोव्हेंबरमध्ये ४४.३० टक्के आणि फेब्रुवारीमध्ये ४५.८९ टक्क्यांची घट झाली. एप्रिल महिन्यातही किरकोळ ०.७९ टक्क्यांची घट दिसून आली.
मध्य रेल्वेच्या पुणे विभागाला रेल्वे प्रशासनाकडून केटरिंग सेवेतून ३ कोटी ८० लाखांचे वार्षिक उद्दिष्टे देण्यात आले होते. दिलेल्या उद्दिष्टा पेक्षा १६ लाखांचे अधिकचे उत्पन्न पुणे विभागाने मिळवले.
मध्य रेल्वे पुणेचे जनसंपर्क अधिकारी हेमंत कुमार म्हटले की, पुणे विभागातील विविध स्थानकांवर खाद्यपदार्थ विक्री केंद्रांची वाढ, प्रवाशांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सुविधा आणि प्रवासी संख्येत झालेली वाढ यामुळे केटरिंग व्यवसायाला चालना मिळाली आहे. आगामी काळात प्रवाशांना अधिक दर्जेदार आणि स्वच्छ सेवा देण्यावर भर दिला जाणार आहे.






