नवी दिल्ली : पंजाब विधानसभा निवडणूक २०२२ (Punjab Assembly Election 2022) साठी सगळेच पक्ष तयारीला लागले आहेत. लुधियाना रोड शोमध्ये (Ludhiana Road Show) अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी नवज्योत सिंह सिद्धू (Navjyot Singh Siddhu) आणि विक्रम मजीठीयांबाबत (Vikram Majithia) मोठं विधान केलं आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही आरोप केले आहेत. केजरीवाल यांनी अमृतसरच्या जागेवर नवज्योत सिंह सिद्धू आणि मजीठीया निवडणुकीमध्ये हरतील,असं म्हटलं आहे.
प्रधानमंत्री लोकसभा में झूठ बोलते हैं, प्रधानमंत्री यहां आकर झूठ बोलते हैं। गृह मंत्री ग़लत आरोप लगाते हैं, भाजपा और कांग्रेस देश की आंतरिक सुरक्षा के साथ खिलवाड़ कर रही है: आम आदमी पार्टी के राष्ट्रीय संयोजक व दिल्ली के मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, लुधियाना, पंजाब pic.twitter.com/9nyPqsqXua
— ANI_HindiNews (@AHindinews) February 15, 2022
आम आदमी पार्टीचे (Aam Aadmi Party) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं आहे की, आम्ही अमृतसरमधल्या मतदारसंघाचा सर्व्हे केला. या सर्व्हेमध्ये सिद्धू आणि मजीठीया हारण्याची शक्यता आहे. इथून आम आदमी पार्टी जिंकण्याची शक्यता जास्त आहे कारण सिद्धू साहेबांनी गेल्या ५-१० वर्षांमध्ये मतदारसंघातल्या कोणाची ना भेट घेतली ना कोणाचे फोन उचलले आहेत. त्यांनी अमृतसरमध्ये एकही काम केलेले नाही.
[read_also content=”शिर्डीतील साईबाबा मंदिर दहशतवाद्यांच्या रडारवर, तीन दहशतवादी गुजरात एटीएसच्या ताब्यात https://www.navarashtra.com/maharashtra/khandesh/ahmednagar/saibaba-temple-in-shirdi-on-the-radar-of-terrorists-three-terrorists-in-the-possession-of-gujarat-ats-nraa-238679/”]
केजरीवाल यांनी सांगितलं की, पंतप्रधान लोकसभेत खोटं बोलत आहेत. ते इथे येऊनही सगळ्या खोट्या गोष्टी सांगत आहेत. गृहमंत्री चुकीचे आरोप करत आहेत. भाजपा आणि काँग्रेस देशाच्या अंतर्गत सुरक्षेशी खेळत आहेत. त्यांनी सांगितलं की, पंजाबच्या सगळ्या लोकांना मी आश्वासन देतो की यावेळी आपचं सरकार आलं तर तुमच्या सुरक्षेची जबाबदारी आमची असेल. राष्ट्रीय आणि अंतर्गत सुरक्षेच्या बाबतीत आम्ही कोणतेही राजकारण करणार नाही.