(फोटो सौजन्य: Instagram)
काय घडलं व्हिडिओत?
सोशल मीडियावर एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये स्मशानभूमीत अंत्यसंस्काराची चिता जाळताना दिसत आहे, जिथे काही लोक पत्ते खेळताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये असा दावा केला आहे की पुतण्याने त्याच्या काकांचा छंद त्याच्या मृत्यूनंतरही जिवंत ठेवला. ज्या काकांची चिता जळत आहे ते कुटुंबातील सदस्य होते आणि त्यांना पत्ते खेळण्याची खूप आवड होती. त्यांच्या मृत्यूनंतर, पुतण्याने स्मशानभूमीत पत्त्यांचा खेळ मांडला, ज्यामध्ये संपूर्ण कुटुंब आणि मित्र पत्ते खेळण्यासाठी बसले होते. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
हा व्हिडिओ @sandeep_beniwal_98133 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘माझ्या मोठ्या काकांचे आज निधन झाले. त्यांना पत्ते खेळण्याची खूप आवड होती, म्हणून त्यांनी शेवटचे पत्ते खेळून श्रद्धांजली वाहिली’. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “वेळ कोणाचाही मित्र नाही, पार्थ” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “त्यांची आत्मा हे सगळं पाहत असेल” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “सांभाळा नाय तर काकांची आत्मा पण पत्ते खेळायला यायची”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






