काय घडलं नेमकं?
या घटनेत मृत्यू झालेल्या अल्पवयीन मुलांचे नावे समोर आली आहेत. सागर गहाणे (वय 16) आणि प्रणय गहाणे (वय 13) अशी नावे आहेत. धूलिवंदन सणानिमित्त गावात आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं. दुपारी रंगात नाहून सागर आणि प्रणय हे अंघोळीसाठी तलावात गेले होते. अंघोळ करतांना पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. पाण्याचा अंदाज न आल्याने ही घटना घडली.
ही घटना ग्रामस्थांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत या घटनेची माहिती डुग्गीपार पोलिसांना कळवली. पोलीस या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठलं. पोलिसांनी मुलांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले. पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरु केला आहे. या घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.
10 दिवसांच्या बाळाची विक्री, डॉक्टरचा टोकाचा निर्णय; गोंदिया प्रकरणाने राज्यात खळबळ
गोंदिया येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका गरीब दाम्पत्याचं बाळ एका डॉक्टरने भंडाऱ्यात विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. अवघ्या १० दिवसाच्या चिमुकलीचे तीन लाखात भंडाऱ्यात डॉक्टरनेच विक्री केल्याने खळबळ उडाली. या प्रकरणातील मुख्य आरोपी डॉक्टरचे नाव नितेश बाजपेयी असे आहे. मुख्य आरोपी डॉक्टर बालाजी हॉस्पिटल मध्ये कार्यरत होता. आता त्या डॉक्टरने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
स्वतःवरच ब्लेडनं केलं वार
मध्यप्रदेशच्या कटंगी येथून भंडाऱ्याकडे येत असताना रात्रीच्या सुमारास तुमसर ते नाकाडोंगरी मार्गावर हा प्रकार घडला. स्वतःच्या वाहनातून येत असताना डॉक्टरने स्वतःच्या पोटावर ब्लेडने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही बाब लक्षात येताच कारच्या चालकाने डॉक्टरला तातडीने तुमसर येथील उपासना रुग्णालयात दाखल केलं. मात्र प्रकृती अत्यवस्था असल्यानं तेथील डॉक्टरनं पुढील उपचाराकरिता भंडारा येथील एका खाजगी रुग्णालयात रेफर केलंय. त्याची प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांनी माहिती दिली आहे. मात्र या प्रकरणाने मोठी खळबळ उडाली आहे.
Ans: गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यात.
Ans: एक 16 वर्षांचा आणि दुसरा 13 वर्षांचा होता.
Ans: आकस्मित मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला.






