पणजी :सध्याच्या घडीला गोव्यामध्ये (Goa) काँग्रेस (Congress) आणि भाजप (BJP) यांच्यात काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. (Goa Assembly Election Results 2022) ४० जागांच्या विधानसभेत बहुमताचा आकडा गाठण्यासाठी २२ जागा आवश्यक आहेत. परंतु, सध्या काँग्रेस आणि भाजप पक्ष १५ जागांच्या आसपास घुटमळत आहेत. क्षणाक्षणाला हे कल बदलत आहेत. गोवा विधानसभा निवडणुकांचा पहिला निकाल हाती आला आहे. वाळपई मतदारसंघातून आरोग्यमंत्री विश्वजित राणे विजयी झाले आहेत.(Vishwjeet Rane) विश्वजित राणे हे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांचे चिरंजीव आहेत.
[read_also content=”गोव्यात काँग्रेस आणि भाजपमध्ये अटीतटीचा सामना, उत्पल पर्रिकर आणि प्रमोद सावंत पिछाडीवर https://www.navarashtra.com/election-results-2022/election-results-2022/goa-assembly-election-results-2022-congress-and-bjp-have-same-place-nrsr-252389.html”]
पणजीत भाजपचे बाबुश मोन्सेरात हे आघाडीवर आहेत. त्यामुळे उत्पल पर्रिकर यांना पराभवाचा धक्का बसण्याची शक्यता आहे. अद्याप संपूर्ण निकाल यायला बराच वेळ बाकी आहे. त्यामुळे ही परिस्थिती बदलूही शकते. तर गोव्यातील निवडणुकीत नशीब आजमवणाऱ्या शिवसेनेचा एकही उमेदवारी सध्या तरी विजयी होण्याच्या स्थितीत दिसत नाही. सुरुवातीच्या कलांनुसार भाजप १६, काँग्रेस १५ जागांवर आघाडीवर आहे. तर मगोप-तृणमूल काँग्रेस आघाडी सात जागांवर आघाडीवर आहे.