• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Assembly Election 2022 »
  • Utpal Parrikar To Fight Without Any Party Support In Panji Big Shock To Bjp Nrsr

उत्पल पर्रीकर यांची अखेर बंडखोरी, पणजीतून तिकिट मिळाले नसल्याने भाजपा सोडून अपक्ष लढणार – भाजपाच्या अडचणीत वाढ

गुरुवारी भाजपाची ३४ उमेदवारांची यादी जाहीर (BJP Goa Candidates List) झाल्यानंतर, पर्रीकर यांच्यापुढे दोन मतदारसंघांचे पर्याय दिल्याचीही चर्चा होती,  हे दोन्ही मतदारसंघ उत्पल यांनी फेटाळले होते. Utapal Parrikar To Fight Individualy Without Any paryt Support)आज अखेरीस त्यांनी आपली भूमिका जाहीर करत, अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय उत्पल पर्रीकर (Utapal Parrikar) यांनी घेतला आहे.

  • By साधना
Updated On: Jan 21, 2022 | 07:59 PM
utpal parrikar
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पणजी: माजी संरक्षण मंत्री, गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांचे पुत्र उत्पल पर्रीकर (Utapal Parrikar) यांनी भाजपाशी बंडखोरी केली आहे. पणजीतून (Panji) भाजपाने तिकिट न मिळाल्याने नाराज झालेल्या उत्पल यांनी भाजपाला रामराम केला आहे. पणजीच्या जागेवरुन मनोहर पर्रीकर हे निवडणूक लढवीत असत. मात्र भाजपाने गुरुवारी जाहीर केलेल्या ३४ उमेदवारांच्या यादीत उत्पल यांचे नाव नव्हते. पर्रीकरांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी बाबूश मेन्सोरात यांना या मतदारसंघातून भाजपाने तिकिट दिले आहे. त्यामुळे उत्पल पर्रीकर नाराज झाले होते. आता त्यांनी अपक्ष लढणार असल्याचे जाहीर (Utapal Parrikar To Fight Individualy Without Any paryt Support) केले आहे.

गुरुवारी भाजपाची ३४ उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर, पर्रीकर यांच्यापुढे दोन मतदारसंघांचे पर्याय दिल्याचीही चर्चा होती,  हे दोन्ही मतदारसंघ उत्पल यांनी फेटाळले होते. आज अखेरीस त्यांनी आपली भूमिका जाहीर करत, अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. पणजी मतदारसंघातील मतदारांचा आपल्याला पाठींबा असून, तेच आपल्या भाग्याचा फैसला करतील, असेही उत्पल यांनी सांगितले आहे. कार्यकर्ते आणि नागरिकांचा आपल्याला पाठिंबा आहे, हे भाजपा नेत्यांना समजावले. मात्र तरीही भाजपाने आपल्यावर अन्याय केला, अशी भावना उत्पल पर्रीकर यांची आहे.

केजरीवाल यांनीही दिली होती ऑफर
भाजपाची यादी जाहीर झाल्यानंतर आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनीही उत्पल यांना आपमध्ये येऊन पणजीतून निवडणूक लढवण्याची ऑफर दिली होती. भाजपाच्या वापरा आणि फेकून द्या, या भूमिकेमुळे गोवेकर नाराज असल्याचेही केजरीवाल यांनी ट्विटमध्ये म्हटले होते.

उत्पल यांचा निर्णय भाजपाला धक्का
मनोहर पर्रीकर यांचे गोव्यात मोठे नाव होते. त्यांनी भाजपासाठी आपले आयुष्य वेचले. अशा स्थितीत त्यांच्या मुलानी घेतलेला निर्णय हा भाजपासाठी मोठा धक्का मानण्यात येतो आहे. निवडणुकांआधी त्यांच्या या निर्णयाने भाजपाला राज्यात फटका बसण्याची चिन्हे आहेत. उत्पल हे बंडखोरी करणार नाहीत, अशी भाजपाला आशा होती.

उत्पल यांना गोव्यातील भविष्य असे भाजपाकडून पाहिले जात होते. यावेळी जरी ते निवडणूक हरले असते तरी त्यांना पक्षात चांगली जबाबदारी देण्यात येणार होती, अशी माहिती पक्षाच्या सूत्रांनी दिली आहे. चार वर्षांनंतर २०२७ साली उत्पल यांचे मोठे लॉन्चिंग करण्याची भाजपाची योजना होती. मात्र आता उत्पल यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे गोव्यातील निवडणूक भाजपासाठी अधिक अडचणीची झाली असेच म्हणावे लागेल.

[read_also content=”ट्रेनमध्ये जोरजोरात बोलणाऱ्यांवर आणि मोठ्याने गाणी ऐकणाऱ्यांवर उगारला जाणार कारवाईचा बडगा, रेल्वेच्या नव्या नियमावलीतील नियम वाचा एका क्लिकवर https://www.navarashtra.com/india/indian-railway-new-guidelins-for-train-passengers-nrsr-225886.html”]

मनोहर पर्रिकरांचा मुलगा म्हणून तिकीट मागायचे असते तर मागच्यावेळीच मागितलं असतं. मात्र मागच्यावेळी पार्टीने जे सांगितलं तेच मी केलं. वडील सक्रिय असताना मी कधीच पुढे पुढे केलं नाही. वडिलांचं वजन वापरलं नाही. आता पक्षाने पणजीत असा उमेदवार दिला त्यावर बोलायला लाज वाटते. त्यामुळे मला पर्याय राहिला नाही मी निवडणूक लढत आहे. माझ्या वडिलांसोबतचे सर्व कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत, असा दावा उत्पल त्यांनी केला.

अपक्ष निवडणूक लढत आहात, तर तुम्ही भाजप सोडणार का? असे विचारले असता उत्पल म्हणाले की, माझ्या मनात भाजप रोज असणार. भाजपने मला सोडलंय का ते तुम्ही त्यांनाच विचारा, असं सांगत उत्पल यांनी भाजपच्या कोर्टात चेंडू टाकला.

Web Title: Utpal parrikar to fight without any party support in panji big shock to bjp nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 21, 2022 | 07:53 PM

Topics:  

  • Goa Assembly Election 2022

ताज्या बातम्या

पुढे वाचा
कला केंद्रातील बैठकीची खोली आता रंगमंचावर, “संगीत बारी ते वारी” संगीत नाटक प्रेक्षकांच्या भेटीस

कला केंद्रातील बैठकीची खोली आता रंगमंचावर, “संगीत बारी ते वारी” संगीत नाटक प्रेक्षकांच्या भेटीस

Free Fire Max: फ्री फायर मॅक्स खेळाडूंना सरप्राईज, इन-गेम रिवॉर्ड्स जिंकण्याची संधी! 29 सप्टेंबरचे रिडीम कोड जाहिर

Free Fire Max: फ्री फायर मॅक्स खेळाडूंना सरप्राईज, इन-गेम रिवॉर्ड्स जिंकण्याची संधी! 29 सप्टेंबरचे रिडीम कोड जाहिर

Photo : Asia Cup 2025 ट्राॅफीशिवाय टीम इंडियाच्या खेळाडूंनी शेअर केले फोटो! पाकिस्तानची उडवली खिल्ली

Photo : Asia Cup 2025 ट्राॅफीशिवाय टीम इंडियाच्या खेळाडूंनी शेअर केले फोटो! पाकिस्तानची उडवली खिल्ली

चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग कमी करण्यासाठी १० रुपयांच्या तुरटीचा ‘या’ पद्धतीने करा वापर, त्वचेवर येईल चमकदार तेज

चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग कमी करण्यासाठी १० रुपयांच्या तुरटीचा ‘या’ पद्धतीने करा वापर, त्वचेवर येईल चमकदार तेज

IND vs PAK : पाकिस्तानला मिर्ची झोंबली! ‘हा’ तर लष्करप्रमुख असीम मुनीर यांचा अपमान’; आदिल राजा भडकलेे

IND vs PAK : पाकिस्तानला मिर्ची झोंबली! ‘हा’ तर लष्करप्रमुख असीम मुनीर यांचा अपमान’; आदिल राजा भडकलेे

Shardiya Navratri 2025: नवरात्रीमध्ये सप्तमीच्या दिवशी करा कालरात्री देवीची पूजा, जाणून घ्या पद्धत, मंत्र आणि महत्त्व

Shardiya Navratri 2025: नवरात्रीमध्ये सप्तमीच्या दिवशी करा कालरात्री देवीची पूजा, जाणून घ्या पद्धत, मंत्र आणि महत्त्व

प्रेम, लग्न, घटस्फोट आणि पुन्हा लग्नाचा प्रवास… पण लग्नाआधीच आढळला अर्धवट जळालेला मृतदेह! काय घडलं नेमकं?

प्रेम, लग्न, घटस्फोट आणि पुन्हा लग्नाचा प्रवास… पण लग्नाआधीच आढळला अर्धवट जळालेला मृतदेह! काय घडलं नेमकं?

व्हिडिओ

पुढे बघा
Nashik Flood : गोदावरीला महापूर अनेक दुकाने गेली पाण्याखाली, मोठे नुकसान

Nashik Flood : गोदावरीला महापूर अनेक दुकाने गेली पाण्याखाली, मोठे नुकसान

Kolhapur News :  नवरात्रोत्सवाच्या आजच्या सहाव्या माळेला करवीर निवासिनी आई अंबाबाईची थाटात पूजा

Kolhapur News : नवरात्रोत्सवाच्या आजच्या सहाव्या माळेला करवीर निवासिनी आई अंबाबाईची थाटात पूजा

Thane News : ठाण्यात बंजारा समाज आक्रमक, अनुसूचित जमातीत समावेशाची मागणी जोरात

Thane News : ठाण्यात बंजारा समाज आक्रमक, अनुसूचित जमातीत समावेशाची मागणी जोरात

Karjat : पावसामुळे कर्जत तालुक्यातील भातशेती भुईसपाट

Karjat : पावसामुळे कर्जत तालुक्यातील भातशेती भुईसपाट

NAGPUR : धम्मचक्रप्रवर्तन दिनानिमित्त शांती मार्च, प्रदर्शनी व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

NAGPUR : धम्मचक्रप्रवर्तन दिनानिमित्त शांती मार्च, प्रदर्शनी व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

NAGPUR: जनप्रतिनिधी म्हणून जबाबदारी पार पाडली, खासदार बर्वे यांचे स्पष्टीकरण

NAGPUR: जनप्रतिनिधी म्हणून जबाबदारी पार पाडली, खासदार बर्वे यांचे स्पष्टीकरण

Beed : पंधरा गावातील सर्वच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली,जनजीवन विस्कळीत

Beed : पंधरा गावातील सर्वच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली,जनजीवन विस्कळीत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.