फोटो सौजन्य- iStock
भारत आजच्या काळात अनेक ऑटोमोबाईल कंपन्याकडून कारचे निर्माण केले जाते. कार निर्माणामध्ये भारत अग्रेसर आहे. या निर्मितीसोबतच भारतातून निर्यात होणाऱ्या कारची संख्याही प्रचंड वाढत आहे. जून 2024 मध्ये भारतातून 76 हजाराहून जास्त कारची निर्यात झाली आहे. मारुती सुझुकी, होंडा, हुंडाय, टोयोटा, फोक्सवॅगन, टाटा, महिंद्रा, निसान अशा अनेक कंपन्यांच्या कारची निर्मिती होते. भारतात तर या कंपन्यांच्या कार्सना पसंती मिळते मात्र परदेशातही त्यांना मोठी मागणी आहे. भारतातून निर्यात होणाऱ्या टॉप 10 कार कोणत्या आहेत हे जाणून घेऊया
टॉप 10 निर्यात होणाऱ्या कार
जगभरात अनेक कार्सची मागणी आहे त्यातील मागणीचा महत्वाचा वाटा भारताकडून पुरविण्यात येतो. भारतातून सर्वात जास्त निर्यात होण्याऱ्या कारबाबत सांगायचे झाल्यास पहिल्या क्रमांकावर फोक्सवॅगन वर्चुस येते. या कारच्या तब्बल 6349 युनिट्स जूनमध्ये निर्यात झाल्या आहेत . 5970 निर्यातीसह दुसऱ्या क्रमांकावर निसान सनी आहे. तीसऱ्या क्रमाकावर हुडांईची वेरना आहे जिचे 5416 युनिट्स निर्यात केले गेले आहेत. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर मारुती सुझुकीची फ्रॉन्क्स आहे. मारुतीच्या बलेनो 4645 युनिट्सच्या निर्यातीसह पाचवे स्थानावर आहे. त्यासोबतच मारुतीच्याच डिजायरने सहावे स्थान मिळविले आहे. डिजायरच्या 4576 युनिट्सची निर्यात झाली आहे. सातव्या क्रमांकावरही मारुतीने स्थान मिळविले असून जिन्मी कारची 4121 युनिट्स निर्यात झाली आहे. त्यानंतर मात्र कंपनीमध्ये बदल झाला असून होडांची एलिवेट 4108 निर्यातीसह आठव्या क्रमांकावर आहे. नवव्या आणि दहाव्या क्रमांकावर अनुक्रमे हुंडाई ग्रॅंड आय 10 नियॉस आणि फोक्सवेगनची टाईगुन आहे. ग्रॅंड आय 10 नियॉसची 3704 युनिट्स आणि टाईगुनच्या 3122 युनिट्स निर्यात झाले आहेत.
टोप 10 चे विश्लेषण केल्यास परदेशात सर्वात जास्त मागणी असलेल्या कंपनीच्या कारमध्ये मारुती सुझुकीचे अव्वल स्थान आहे. मारुतीच्या तब्बल 5 कार्स या टॉप 10 मध्ये समाविष्ट आहेत. त्यामुळे मारुती सुझुकी कंपनी देश आणि परदेशातही लोकप्रिय ठरत आहे. हुडांई, होडा, फोक्सवेगन या कंपन्या परदेशातील असल्या तरी त्यांच्या कारचे उत्पादन भारतात होते आणि त्यांचे देशविदेशात पुरवठा केला जातो यावरुनच जगामध्ये भारतातील ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचे महत्व लक्षात येते.
या टॉप 10 कारबरोबरच मारुती सुझुकी ग्रेंड विटारा, एस प्रेसो, अर्टिगा, निसानची मॅग्नाईट आणि किआ, टोयोटा कंपन्याच्या कारही मोठ्या प्रमाणात निर्यात होत आहेत.






