‘स्कूटर बोले तो अॅक्टिव्हा' म्हणत होंडाने लाँच केली नवीन 2025 Activa 125
होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया (एचएमएसआय)ने आज नवीन आकर्षक रंग व अत्याधुनिक फीचर्स असलेली नवीन ओबीडी२बी-प्रमाणित अॅक्टिव्हा 125 लाँच केली आहे. चला स्कूटरबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.
अॅक्टिव्हा १२५ मध्ये आता अनेक नवीन सुधारित फीचर्स आहेत, जे ग्राहकांचा राइडिंग अनुभव अधिक उत्साहित करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहेत. ही बाईक १२३.९२ सीसीची आहे. यात सिंगल-सिलिंडर पीजीएम-एफआय इंजिन, जे आता ओबीडी२बी प्रमाणित आहे आणि ६.२० केडब्ल्यू शक्ती व १०.५ एनएम टॉर्कची निर्मिती करते. तसेच या स्कूटरमध्ये प्रगत इडलिंग स्टॉप सिस्टम देखील आहे, जी होंडाच्या शाश्वत तत्त्वाशी संलग्न राहत इंधन कार्यक्षमता वाढवते.
फीचर्सच्या संदर्भात, अॅक्टिव्हा १२५ मध्ये नवीन ४.२-इंच टीएफटी डिस्प्लेसह ब्ल्यूटूथ कनेक्टीव्हीटी आहे. तसेच स्कूटरमध्ये होंडा रोडसिंक अॅप आहे, जे नेव्हिगेशन व कॉल/मॅसेज अलर्ट्स सारखे फंक्शन्स देते, ज्यामुळे राइडर्सना स्कूटर राइडिंग करताना देखील कनेक्टेड राहता येते. अॅक्टिव्हा १२५ मध्ये यूएसबी टाइप-सी चार्जिंग पोर्ट आहे, ज्यामुळे राइडर्सना स्कूटर राइडिंग करताना डिवाईसेस चार्ज करता येतात.
ब्रँडवर लाखो ग्राहकांच्या असलेल्या विश्वासाप्रती बांधील राहत अॅक्टिव्हा १२५ मध्ये प्रतिष्ठित सिल्हूट कायम ठेवण्यात आले आहे, पण विरोधाभासी ब्राऊन-रंगाच्या सीट्स व अंतर्गत पॅनेल्स आहे, ज्यामुळे स्कूटरची व्हिज्युअल आकर्षकता अधिक वाढली आहे. ही स्कूटर दोन व्हेरिएण्ट्समध्ये येईल, डीएलएक्स आणि स्मार्ट, तसेच सहा रंगांचे पर्याय देखील आहेत. हे रंग आहेत – पर्ल इग्निअस ब्लॅक, मॅट अॅक्सिस ग्रे मेटलिक, पर्ल डीप ग्राऊंड ग्रे, पर्ल सिरेन ब्ल्यू, रिबेल रेड मेटलिक आणि पर्ल प्रीशियस व्हाइट.
‘या’ आहेत देशातील सर्वात जास्त मायलेज देणाऱ्या 5 कार्स, किंमत कमी आणि फीचर्स जास्त
नवीन २०२५ होंडा अॅक्टिव्हा 125 ची किंमत 94,422 रूपयांपासून सुरू होते. तसेच मॉडेल व्हेरियंटची किंमत म्हणजेच अॅक्टिव्हा १२५ डीएलएक्सची किंमत 94,422 रूपये आहे तर स्मार्टची किंमत 97,146 रूपये आहे.
ओबीडी२बी अॅक्टिव्हा 125 लाँच करत होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक, अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी त्सुत्सुमू ओटनी म्हणाले, “आम्हाला नवीन ओबीडी२बी-प्रमाणित अॅक्टिव्हा १२५ च्या लाँचची घोषणा करताना आनंद होत आहे. लाँच करण्यात आलेल्या या अपडेटेड मॉडेलमधून ग्राहक समाधानाप्रती आमची कटिबद्धता दिसून येते. १२५ सीसी स्कूटर सेगमेंटमधील टीएफटी डिस्प्ले आणि ब्ल्यूटूथ कनेक्टीव्हीटी सारख्या प्रगत वैशिष्ट्यांसह आमचा ग्राहकांसाठी राइडिंग अनुभव नव्या उंचीवर नेण्याचा मनसुबा आहे. आम्हाला विश्वास आहे की, ही नवीन स्कूटर तिच्या विभागात बेंचमार्क स्थापित करेल.”