राज्यांत वाहनसंख्या 5 कोटींच्या घरात; 2024-25 मध्ये 28.90 लाख वाहनांची झाली नोंद (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
परभणी : राज्यात नवीन वाहनांच्या संख्येत वेगाने वाढ होत असून, ३१ मार्च २०२५ पर्यंत राज्यातील एकूण वाहनांची संख्या ४ कोटी ९५ लाख ३७ हजार ३०२ वर पोहोचली आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार, सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात राज्यात तब्बल २८ लाख ९० हजार ४९७ नवीन चवाहनांची नोंदणी झाली आहे.
राज्यातील औद्योगिक, शहरी भागांसोबतच ग्रामीण भागातही दुचाकी, चारचाकीसह अन्य १५ ते २० प्रकारातील वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. विशेष म्हणजे, मार्च २०२५ नंतर वाहनांच्या संख्येत अजून मोठी भर पडली आहे. त्यामुळे राज्याच्या दळणावळणाची गती सुसाट बनली आहे. वाहनांच्या संख्येत पुणे विभागाने संपूर्ण राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे. पुणे विभागातील एकूण वाहन संख्या १ कोटी २ लाख २२ हजार २९१ झाली असून, गेल्या वर्षात येथे ६ लाख ४० हजार ०४३ नवीन वाहने रस्त्यावर आली आहेत. त्याखालोखाल ग्रेटर मुंबईत एकूण ५१ लाख ३४ हजार ४६६ वाहने आहेत.
मुंबईत २०२४-२५ दरम्यान २ लाख ९४ हजार ९४० नवीन वाहनांची नोंदणी झाली. मुंबईतील बोरिवलीमध्ये सर्वाधिक ७८ हजार २०१ तर मुंबई (सेंट्रल) मध्ये ८२ हजार ७७४ नवीन वाहने दाखल झाली आहेत.
फक्त 4.59 लाखांच्या कारमध्ये लक्झरीचा फील
टाटा मोटर्स २८ मे रोजी आपली नवीन टियागो आणि टियागो ईव्ही लॉन्च केली आहे. यापूर्वी, कंपनीने दोन्ही गाड्यांच्या बाह्य भागाचा व्हिडिओ टीझर प्रसिद्ध केला होता. आता, कंपनीने त्यांच्या अंतर्गत भागाची झलक दाखवली आहे. खरे तर, कंपनीने टियागो आयसीईच्या (ICE) अंतर्गत भागाचा व्हिडिओ टीझर प्रसिद्ध केला आहे. या नवीन टीझरमध्ये त्याच्या पुन्हा डिझाइन केलेल्या डॅशबोर्ड, अद्ययावत सेंटर कन्सोल आणि अनेक नवीन वैशिष्ट्यांचा तपशील समोर आला आहे.






