फोटो सौजन्य: iStock
लवकरच सणासुदीचा काळ चालू होणार आहे. या काळात अनेक ब्रँड्स आपल्या ग्राहकांसाठी आकर्षित ऑफर्स आणत असतात. या काळात अनेक जण नवीन बाईक किंवा स्कुटर खरेदी करत असतात. जर तुम्ही सुद्धा येणाऱ्या काळात स्कुटर किंवा बाईक घेण्याचा विचार करत असाल पण योग्य ऑफरची वाट पाहत आहात तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.
जपानी दुचाकी उत्पादक कंपनी Yamaha भारतीय बाजारपेठेत विक्रीसाठी अनेक उत्कृष्ट बाईक आणि स्कूटर उपलब्ध करून देत असते. सणासुदीचा काळ सुरू होण्यापूर्वी कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी खास ऑफर जाहीर केली आहे. चला या ऑफरबद्दल अधिक जाणून घेऊया.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, यामाहाच्या एफझेड सीरिजच्या सर्व बाईकवर कॅशबॅक आणि कमी डाउन पेमेंटची सुविधा दिली जाईल. FZ-FI, FZ-S FI V3 आणि V4 बाईकवर 7,000 रुपयांचा कॅशबॅक दिला जात आहे. यासोबतच या बाईक 7999 रुपयांच्या डाउन पेमेंटवर तुम्ही घरी आणू शकतात.
बाईक्ससोबतच कंपनी आपल्या स्कूटरवरही ऑफर देत आहे. माहितीनुसार, कंपनी Fascino 125 आणि Ray ZR हायब्रीड स्कूटरवर कॅशबॅक आणि कमी डाउन पेमेंट सुविधा देत आहे. या स्कूटर्स 2999 रुपये डाऊनपेमेंट आणि 4,000 रुपयांच्या कॅशबॅकसह खरेदी केल्या जाऊ शकतात.
हे देखील वाचा: करोडोंची कार नाही तर फक्त 1 लाखाची इलेक्ट्रिक स्कूटर अर्जुन कपूरने केली खरेदी
Yamaha ने ऑफर केलेल्या FZ FI ची एक्स-शोरूम किंमत 1.16 लाख रुपये आहे. तर FZ-S FI V3 बाईकची एक्स-शोरूम किंमत 1.22 लाख रुपये आहे आणि याचे V4 व्हर्जन 1.29 लाख रुपयांना खरेदी केले जाऊ शकते. तर Yamaha Fascino स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 79900 रुपये आणि Ray ZR ची किंमत 85030 रुपये आहे.
यामाहाच्या एफझेड सीरिजच्या बाईक्स 150 सीसी सेगमेंटमध्ये ऑफर केल्या जातात. या सेगमेंटमध्ये ती बजाज पल्सर, टीव्हीएस अपाचे, हिरो एक्स्ट्रीम, होंडा युनिकॉर्न यांसारख्या बाईक्सशी स्पर्धा करते. तर स्कूटर सेगमेंटमध्ये ऑफर केलेले Fascino आणि Ray ZR 125 cc सेगमेंटमध्ये आणले आहेत. या सेगमेंटमध्ये या स्कूटर्स Honda Activa 125, Suzuki Access 125, Hero Destini 125, TVS NTorq 125 सोबत स्पर्धा करतात.