फोटो सौजन्य: iStock
2024 च्या वर्षात अनेक उत्तम इलेक्ट्रिक कार्स लाँच झाल्या. या कार्सना ग्राहकांनी सुद्धा चांगला प्रतिसाद दिला आहे. येणारा काळ हा इलेक्ट्रिक वाहनांचा असणार आहे हे समजून अनेक ऑटो कंपन्या आता इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनावर लक्षकेंद्रित करत आहे. वाढते पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमुळे ग्राहक इलेक्ट्रिक कार्सना एक उत्तम आणि पर्यावरणपूरक पर्याय मानत आहे.
‘स्कूटर बोले तो अॅक्टिव्हा’ म्हणत होंडाने लाँच केली नवीन 2025 Activa 125
2025 हे वर्ष भारतीय इलेक्ट्रिक कार मार्केटसाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहे. मारुती सुझुकी आणि ह्युंदाई मोटर या भारतीय कार बाजारातील दोन कंपन्यांकडून प्रत्येकी दोन भारतीय बनावटीच्या कार पुढील वर्षी भारतीय बाजारात दाखल होतील. याशिवाय देशातील आघाडीची कार कंपनी महिंद्रा अँड महिंद्राच्या आणखी दोन ई-कार, पूर्णपणे भारतीय बाजारपेठेला डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात आलेल्या आहेत. याशिवाय, JSW MG Motor India आणि Kia Motors कडून प्रत्येकी एक इलेक्ट्रिक कार देखील आणली जाईल, जी भारतीय ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करेल. या गाड्यांच्या किंमती 20 ते 40 लाखांच्या दरम्यान असतील असे मानले जात आहे.
या कंपन्यांचे म्हणणे आहे की, सध्या भारतीय कार बाजारात प्रीमियम श्रेणीतील कार लाँच केल्या जातील. मारुती सुझुकीची पहिली ई-विटारा सादर करेल तर Hyundai तिच्या सर्वात लोकप्रिय क्रेटाचे इलेक्ट्रिक व्हर्जन सादर करणार आहे. या दोन्ही कार्स जानेवारी 2025 मध्ये होणाऱ्या भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पोमध्ये लाँच केल्या जातील आणि त्यानंतर लवकरच त्यांची विक्री सुरु होईल. उल्लेखनीय बाब म्हणजे या दोन्ही गाड्या त्यांच्या कंपन्यांनी जागतिक बाजारपेठेला लक्षात घेऊन डिझाइन केल्या आहेत. त्यांची एक्स-शोरूम किंमत 25-25 लाख रुपये असेल असा अंदाज आहे.
Tata Harrier च्या बेस व्हेरियंटसाठी 3 लाखांचे Down payment केल्यास किती असेल EMI?
दक्षिण कोरियाची कार कंपनी Kia Motors India ची तयारी वेगळी दिसत आहे कारण ती भारतात सुमारे 15 लाख रुपयांची इलेक्ट्रिक कार लाँच करण्याच्या तयारीत आहे. दुसरीकडे, इलेक्ट्रिक क्रेटाच्या रणनीतीबद्दल, ह्युंदाई मोटर इंडियाचे पूर्णवेळ संचालक आणि सीईओ तरुण गर्ग म्हणतात की, जर मजबूत आणि विश्वासार्ह ब्रँडला सोयीस्कर आणि सहज उपलब्ध असलेल्या चार्जिंग सुविधेची जोड दिली गेली, तर ते ईव्ही बाजाराला चांगले प्रोत्साहन देईल. खरंतर, 2025 मध्ये भारतात ईव्ही चार्जिंग सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा होण्याची चिन्हे आहेत. डिसेंबर 2024 मध्ये देशात सुमारे 25,200 सार्वजनिक चार्जिंग सुविधा आहेत, परंतु डिसेंबर 2025 पर्यंत त्यांची संख्या किमान 69 हजारांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. Tata Motors, Smart Charge EV, Glida यांसारख्या कंपन्या वेगाने नवीन चार्जिंग स्टेशन्स बसवण्याची तयारी करत आहेत. पुढील वर्षी शहरांव्यतिरिक्त राष्ट्रीय महामार्गांवरही ईव्हीसाठी चार्जिंग स्टेशन बसवले जात असल्याचे दिसून येईल.