फोटो सौजन्य: Freepik
पूर्वी कार किंवा बाईक घेताना अनेक जण त्याचे मायलेज आणि किंमतीवर जास्त लक्ष केंद्रित करायचे. पण आजचा ग्राहक वाहनांच्या विविध पार्ट्सवर लक्ष देताना दिसतो. यातीलच एक महत्वाचा पार्ट म्हणजे वाहनाचे इंजिन.
जर तुम्ही नीट लक्ष दिले असेल तर कार किंवा बाईक खरेदी करताना शोरुममधील व्यक्ती आपल्याला हे बीएस 6 इंजिन आहे असे आवर्जून सांगताना दिसते. पण बीएस म्हणजे काय?
बीएस (भारत स्टेज) नॉर्म्स हे भारतातील वाहन उत्सर्जन मानकांचा एक संच आहे, जे केंद्र सरकारने प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी लागू केले आहे. वाहनांमधून उत्सर्जित होणाऱ्या प्रदूषणाची पातळी किती असावी हे नॉर्म्स ठरवतात. बीएस नॉर्म्स युरोपियन उत्सर्जन मानकांवर आधारित आहेत आणि वायू प्रदूषण कमी करण्यासाठी वेळोवेळी ते अपडेट केले जातात.
BS1: 2000 मध्ये लागू.
BS2: 2005 मध्ये लागू.
BS3: 2010 मध्ये लागू.
BS4: 2017 मध्ये लागू.
BS6: 1 एप्रिल 2020 पासून लागू झाला. (BS5 वगळण्यात आले होते)
BS6 मधील नियमांनी नायट्रोजन ऑक्साईड्स (NOx), हायड्रोकार्बन्स (HC), पार्टिक्युलेट मॅटर (PM) आणि वाहनांमधून उत्सर्जित कार्बन मोनोऑक्साइड (CO) चे स्तर पूर्वीपेक्षा अधिक कडक केले आहेत. या नियमानुसार, डिझेल वाहनांसाठी पार्टिक्युलेट मॅटर उत्सर्जन 80% आणि NOx उत्सर्जन 70% ने कमी झाले आहे.
ब्स७ नॉर्म्सच्या शक्यतेबद्दल बोलताना, त्याच्या अंमलबजावणीबाबत सरकारने अद्याप तरी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. पण आज पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने वाढती पावले लक्षात घेता, भविष्यात BS7 मानकांची शक्यता नाकारता येत नाही.
वाहनांमधून उत्सर्जित होणारे प्रदूषण नियंत्रित करणे. तसेच पर्यावरणातील हानिकारक वायूंचे उत्सर्जन कमी करणे हा बीएस नियमांचा मुख्य उद्देश आहे.बीएस इंजिन तुमच्या कारला अधिक कार्यक्षम आणि पर्यावरणास अनुकूल बनवतात. ज्यामुळे तुमची कार किंवा बाईक पर्यावरणपूरक होईल.
BS7 नियमांकडे जाण्यापूर्वी, सरकार आणि वाहन उत्पादक कंपनीज तांत्रिकदृष्ट्या तयार होण्याचा प्रयत्न करत आहेत, जेणेकरून जेव्हा हे नियम लागू केले जातील तेव्हा त्यांच्यानुसार कार्स आणि बाईक्स बनवता येतील.