प्रसिद्ध हॉलीवूड अभिनेता एरिक डेन यांचा वयाच्या ५३ व्या वर्षी ALS आजारामुळे मृत्यू! जाणून घ्या गंभीर आजाराची लक्षणे आणि उपाय
हॉलिवूड मनोरंजन सृष्टीत दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे प्रसिद्ध अभिनेते एरिक डेन (Eric Dane) यांचे वयाच्या ५३ व्या वर्षी निधन झाले. त्यांची ‘यूफोरिया’ ही गाजलेली मालिका होते. त्यात त्यांनी ‘कॅल जॅकोब्स’ची भूमिका साकारून जागतिक स्तरावर आपले नाव मोठे केले. त्यांच्या अचानक जाण्यामुळे संपूर्ण हॉलिवूड मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे. एरिक डेन यांच्या निधनाचे वृत्त त्यांच्या कुटुंबीयांनी दिले. मागील काही दिवसांपासून ते एमियोट्रोफिक लॅटरल स्क्लेरोसिस या दुर्मिळ आणि गंभीर आजाराने त्रस्त होते. २०२५ मध्ये त्यांना आजाराची लागण झाली आणि त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र गंभीर आजाराशी त्यांची झुंज अयशस्वी ठरली.(फोटो सौजन्य – istock)
एरिकच्या कुटुंबाने त्यांच्या निधनानंतर एका निवेदनात म्हटले आहे की, “एरिक डेन यांचे गुरुवारी (१९ फेब्रुवारी) एएलएसमुळे निधन झाल्याची घोषणा आम्ही जड अंतःकरणाने करत आहोत. त्यांनी त्यांचे शेवटचे दिवस मित्र, त्यांची पत्नी आणि त्यांच्या दोन मुली (बिली आणि जॉर्जिया) यांच्याभोवती घालवले, ज्या त्यांच्यासाठी सर्वकाही होते.” असेसांगितले. चला तर जाणून घेऊया अमियोट्रॉफिक लॅटरल स्क्लेरोसिस आजार कशामुळे होतो? आजाराची लक्षणे आणि उपाय काय? याबद्दल जाणून घेऊया सविस्तर माहिती.
अमियोट्रोफिक लेटरल स्क्लेरोसिस हा एक अतिशय दुर्मिळ आणि गंभीर आजार आहे. या आजाराची लागण झाल्यानंतर मज्जासंस्थेचे गंभीर नुकसान होते. तसेच हा एक घातक न्यूरोलॉजिकल आजार आहे. एएलएसची लागण झाल्यानंतर मेंदू आणि पाठीच्या कण्यातील मोटर न्यूरॉन्स नष्ट होऊन जातात.मोटर न्यूरॉन्स मेंदूमधून पाठीतील स्नायूंना सिग्नल पाठवतात. पण हेच न्यूरॉन्स नष्ट होण्यास सुरुवात झाल्यानंतर मेंदू स्नायूंवरील नियंत्रण गमावू लागतो. त्यानंतर चालण्याची, बोलण्याची, चव ओळखण्याची आणि श्वास घेण्याची क्षमता कमी होऊन जाते.
हात किंवा पायांच्या स्नायूंमध्ये कमकुवतपणा, जडपणा जाणवणे
हात, पाय, खांदे किंवा जिभेच्या स्नायूंमध्ये वारंवार पेटके येणे
आवाजात स्पष्टता नसणे
वस्तू पकडताना किंवा हात लावताना तोल जाणे.
अनियंत्रितपणे हसणे किंवा रडणे,याशिवाय हा आजार शरीरात पसरल्यानंतर श्वास घेण्यास सुद्धा खूप जास्त अडचण निर्माण होते.
अचानक उभं राहताच चक्कर येते? ‘ऑर्थोस्टेटिक हायपोटेन्शन’चा असू शकतो इशारा
अमियोट्रोफिक लेटरल स्क्लेरोसिस सहसा 40 ते 70 वर्षे वयोगटातील लोकांना प्रभावित करतो. हा आजार असलेले बहुतेक लोक २ ते ५ वर्षे जगतात. जागतिक स्तरावर, प्रत्येक 100,000 लोकांपैकी सुमारे 2 ते 5 लोक या आजाराने ग्रस्त आहेत. अमियोट्रोफिक लेटरल स्क्लेरोसिससारख्या गंभीर आजाराची लागण झाल्यानंतर वेळीच लक्षणे ओळखून औषध उपचार करणे आवश्यक आहे. योग्य उपचार पद्धतीने गंभीर आजारापासून सुटका मिळवू शकतो. शारीरिक थेरपी, व्यावसायिक थेरपी, भाषण थेरपी ने तुम्ही आजारावर मात करू शकता.
Ans: सुरुवातीला हात किंवा पायांच्या स्नायूंमध्ये कमकुवतपणा, जडपणा किंवा कडकपणा.
Ans: Riluzole आणि Edaravone सारखी औषधे आजाराची प्रगती काही प्रमाणात मंदावू शकतात. स्नायूंचे पेटके कमी करण्यासाठी औषधे दिली जातात.
Ans: मज्जासंस्थेचा एक प्रगतीशील आजार आहे, जो स्नायूंवर नियंत्रण ठेवणाऱ्या पेशी नष्ट करतो.






