फोटो सौजन्य; YouTube
आजकालच्या तरुणाईला आपल्या बाईकमध्ये उत्तम फीचरसह एक स्टायलिश लूक सुद्धा हवा असतो. याच तरुणाईच्या मागणीचा विचार करत ट्रायम्फ कंपनी मार्केटमध्ये आकर्षित लूक असणाऱ्या बाईक्स मार्केटमध्ये लाँच करत असतात.
नुकतेच ट्रायम्फने आपल्या बाईकवरील डिस्काउंट ऑफर आणखी एक महिन्याने वाढवली आहे. यापूर्वी ट्रायम्फ स्पीड 400 आणि स्क्रॅम्बलर 400 वर सूट होती मात्र आता या ऑफरची अंतिम मुदत ३१ ऑगस्टपर्यंत करण्यात आली आहे. रॉयल एनफिल्डच्या या प्रतिस्पर्धी बाईक्सवर दहा हजार रुपयांची सूट दिली जात आहे. त्यामुळे नक्कीच ग्राहक या बाइक्सकडे आकर्षित होताना दिसत आहे.
नुकतेच रॉयल एनफिल्डने गुरिल्ला 450 लाँच केली होती. या लॉन्चिंगच्या पार्श्वभूमीवर, ट्रायम्फने ऑगस्टमध्ये आपली डिस्काउंट ऑफर सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रॉयल एनफील्ड गुरिल्ला 450 ट्रायम्फ स्पीड 400 ला चांगलीच टक्कर देत आहे. चला जाणून घेऊया नेमक्या कोणत्या बाईक्सवर ही डिस्काउंट ऑफर मिळत आहे.
ट्रायम्फ स्पीड 400 मध्ये TR-सिरीजचे लिक्विड कूल्ड, 4 व्हॉल्व्ह, DOHC, सिंगल सिलेंडर इंजिन लावण्यात आहे. या बाईकला असिस्ट क्लचसह 6-स्पीड गिअर बॉक्स देखील देण्यात आला आहे. या बाईकमध्ये बसवलेले इंजिन 8,000 rpm वर 39.5 bhp ची पॉवर देते आणि 6,500 rpm वर 37.5 Nm टॉर्क जनरेट करते. सध्या कंपनी या बाइकवर 10 हजार रुपयांचा डिस्काउंट देत आहे. या डिस्काउंट ऑफरमुळे ट्रायम्फ स्पीड 400 ची एक्स-शोरूम किंमत 2.24 लाख रुपये आहे.
ट्रायम्फ स्क्रॅम्बलर 400 X ला ट्रायम्फ स्पीड 400 सारखेच इंजिन दिले आहे. ही बाइक तीन कलर व्हेरियंटमध्ये बाजारात उपलब्ध आहे. या बाइकमध्ये DRLs सोबत एलईडी डे-टाइम रनिंग लाइट्स दिले आहेत. बाईकची टाकी क्षमता १३ लीटर आहे. या ऑफरमुळे स्क्रॅम्बलर 400 X ची एक्स शोरूम किंमत 2.54 लाख रुपये आहे.