फोटो सौजन्य: Instagram
आपल्याकडे नेहमीच चारचाकी गाडी असणं हे एक प्रतिष्ठेची गोष्ट मानली गेली आहे. कित्येक जण हे एका विशिष्ट मुहूर्तावर गाडी घेणं पसंत करतात. यामागे दोन प्रमुख कारणे असतात, एक म्हणजे त्या शुभ मुहूर्ताचे महत्व तर दुसरे त्या मुहूर्तावर मिळणाऱ्या सूट. आता लवकरच होंडा कंपनी आपल्या आगामी आणि नवीन अमेझ गाडीवर जबरदस्त सूट देणार आहे.
विक्री वाढवण्यासाठी होंडा इंडिया आपल्या मॉडेल्सवर नेहमीच आकर्षक सवलती आणि फायदे देत आली आहे. या महिन्यात (जुलै 2024) फायद्यांमध्ये रोख सवलत, लॉयल्टी, एक्सचेंज फायदे आणि कॉर्पोरेट योजनांचा समावेश देखील कंपनीने केला आहे. तसेच यावेळी कंपनीच्या अमेझ कारवर चांगली सूट मिळणार आहे.
होंडाची सर्वात लहान सेडान अमेझ या वर्षाच्या अखेरीस पूर्णपणे रिडिझाईन केली जाणार असून तिचे नवीन एडिशन लवकरच मार्केटमध्ये लाँच होणार आहे. ही कार दिवाळी 2024 पर्यंत विक्रीसाठी उपलब्ध होईल.
Honda ची सर्वात स्वस्त कार Amaze वर जुलै 2024 मध्ये सर्वाधिक सूट मिळत आहे. या कारची अनेक वर्षांपासून विक्री सुरू असून येत्या काही महिन्यांत याचे नवीन मॉडेल बाजारात येणार आहे. सध्या अमेझवरील उपलब्ध सवलत 66,000 ते 1.04 लाख रुपयांच्या दरम्यान आहे. जे ग्राहक सरकार मान्यताप्राप्त फिटमेंट सेंटरमधून निवडक व्हेरिएन्टमध्ये CNG किट बसवतात, त्यांना इंधन CNG मध्ये रूपांतरित केल्यावर 40,000 रुपयांचा परतावा मिळू शकतो.
नवीन अमेझ दिवाळी 2024 पर्यंत बाजारात येईल. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, सिटी आणि अमेझला बनवणाऱ्या प्लॅटफॉर्ममध्ये काही बदलांसह आगामी अमेझ कारमध्ये वापरले जाईल.
असे सांगितले जात आहे की सिटीचा 2,600 mm आणि अमेझचा 2,650 mm व्हीलबेस कमी केला जाऊ शकतो, ज्यामुळे अमेझची एकूण लांबी चार मीटरपेक्षा कमी असू शकते. सध्या अमेझचा व्हीलबेस 2,470 mm इतका लांब आहे. सध्या तरी तो सिटी गाडीपेक्षा 130 mm ने कमी आहे. यामुळे होंडाला भारतात आपल्या कार बनवण्यासाठी दोन प्लॅटफॉर्मऐवजी एक प्लॅटफॉर्म वापरण्यास मदत होईल. यामुळे कंपनीचा खर्च सुद्धा कमी होण्यास मदत होईल.