Hero Passion+ Disc ची दमदार एन्ट्री! स्टायलिश लूक आणि दमदार मायलेजने वेधलं लक्ष... खरेदीपूर्वी जाणून घ्या सर्व माहिती
पॅशन+ डिस्क एक नवीन अवतार आणि आधुनिक डिझाईनसह लाँच करण्यात आली आहे. सध्याच्या काळाताली लोकांची पसंती लक्षात ठेऊन हि बाईक डिझाईन करण्यात आली आहे. आधुनिक डिझाईन असली तरी देखील ही बाईक पॅशन सिरीजचा त्यांचा जुना आणि खास अंदाज टिकवून ठेवते. ही बाईक आणखी प्रिमियम बनवण्यासाठी यामध्ये डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर देण्यात आला आहे. तसेच ही बाईक खरेदी करणाऱ्या ग्राहकांना भरपूर आणि कनेक्टेड राइडिंगचा अनुभव मिळावा यासाठी यामध्ये एक एडवांस इंटरफेस देखील देण्यात आला आहे. (फोटो सौजन्य – Hero)
नवीन पॅशन+ डिस्कमध्ये फ्रंट डिस्क ब्रेक दिला आहे. हे विविध प्रकारच्या रस्त्यांच्या परिस्थितीत अचूक, जलद आणि सुरक्षित ब्रेकिंगची कामगिरी देते. यामध्ये अनेक अॅडव्हांस फीचर्स देखील समाविष्ट आहेत. जसे रियल टाइम माइलेज इंडिकेटर, कॉल-एसएमएस अलर्टसह ब्लूटूथ कनेक्टिविटी, सर्विस रिमाइंडर, लो फ्यूल इंडिकेटर, ट्रिप मीटर, स्पीडोमीटर आणि ओडोमीटर रीडिंग.
या सेगमेंटमध्ये पहिल्यांदा बाईकमध्ये पावरफुल एलईडी प्रोजेक्टर हेडलँप देण्यात आला आहे. जो रात्रीचा प्रवास आणि कमी प्रकाश असलेल्या ठिकाणी अधिक चांगली विजिबिलिटी दर्शवतो. राईडरची सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी यामध्ये इंजिन कट-ऑफसह साइड स्टँड इंडिकेटर दिले आहे, जे साईड स्टँड लागल्यानंतर बाईक पुढे जाऊ देत नाही.
यामध्ये 100cc चे इंजिन दिले आहे, जे BS-VI आणि OBD-2 फेज A मानकांनुसार आहे. हे इंजिन 8000rpm वर 5.9kW पॉवर आणि 6000rpm वर 8.05Nm टॉर्क निर्माण करते. ही बाईक कंपनीच्या पेटंटेड i3s तंत्रज्ञानाने सुसज्ज असून 71kmpl ची मायलेज देते. रोज प्रवास करणाऱ्या लोकांसाठी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.
रोजच्या जीवनातील प्रवास अधिक सोपा व्हावा यासाठी नव्या पॅशन+ डिस्कमध्ये एक आरामदायक सीट देण्यात आली आहे, जी चालक आणि मागे बसणाऱ्या दोघांनाही चांगला अनुभव देते. याचा आरामदायी रायडिंग ट्रँगल थकवा कमी करतो, ज्यामुळे शहरातील लांबचा प्रवासही आरामदायक होतो. यात एक मोठा स्टोरेज कंपार्टमेंट आणि प्रवासात कनेक्टेड राहण्यासाठी इन-बिल्ट यूएसबी चार्जिंग पोर्ट देखील आहे.
बजाज ऑटो दक्षिण भारतात उभारणार नवे प्लांट! तामिळनाडू आणि तेलंगणा पहिल्या नंबरवर!
पॅशन+ डिस्क हेवी ग्रे, नेक्सॉन ब्लू, डार्क इंडस्ट्रियल ग्रे आणि पर्ल रेड या रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. हे नवीन व्हेरिअंट देशभरात 84,128 रुपयांच्या एक्स शोरूम किंमतीत उपलब्ध आहे.






