फोटो सौजन्य: iStock
कार विकत घेण्यापेक्षा तिला मेंटेन ठेवणे फार कठीण असते असे आपण नेहमी ऐकत असतो आणि हे खरे देखील आहे. जेव्हा कार नवीन असते तेव्हा तिच्याकडे आपण जास्त लक्ष देत नाही. पण एकदा का कार जुनी झाली की तिला वेळेवर सर्व्हिसिंग करावी लागते. काही वेळेस लोकं स्वतःच कारची सर्व्हिसिंग करतात. पण जर तुमच्या कारमध्ये लेदर सीट्स असेल तर अशावेळी तुम्ही त्याची स्वच्छता कशी कराल याबद्दल तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे.
कारमधील घाण आणि धूळ काढून टाकण्यापासून एअर फिल्टर बदलण्यापर्यंत अनेक प्रकारची सर्व्हिसिंगची कामे केली जातात. त्याच वेळी, जर तुमच्या कारमध्ये लेदर सीट असतील तर त्यांच्या देखभालीची जबाबदारी आणखी वाढते.
जेव्हा कारमधील सीट्स खराब होतात, तेव्हा कारचा आतील भाग पूर्णपणे कुरूप होतो. एवढेच नाही तर री-अपहोल्स्ट्रीची किंमत खूप जास्त असू शकते. हे लक्षात घेऊनच आज आपण कारमधील लेदर सीट्स मेन्टेन करण्यासाठी काही सोप्या टिप्स जाणून घेणार आहोत.
कारच्या लेदर सीटवर सूर्यप्रकाशाचा वाईट परिणाम होतो. त्यामुळे जेव्हाही तुम्ही कार पार्क कराल तेव्हा ती अशा ठिकाणी पार्क करा जिथे सूर्यप्रकाश पडणार नाही. कारच्या लेदर सीट्सची स्वछता राखण्यासाठी तुम्ही सीट कव्हर्स खरेदी करू शकता.