• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Who And Rockefeller Foundation Announce This Major Initiative

दक्षिण आशियात उष्णतेच्या लाटेविरुद्ध जागतिक लढा! WHO आणि रॉकफेलर फाउंडेशनकडून ‘या’ मोठ्या उपक्रमाची घोषणा

दक्षिण आशियातील वाढत्या उष्णतेच्या तीव्रतेपासून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी WHO, WMO आणि रॉकफेलर फाउंडेशनने नवीन प्रादेशिक उपक्रमाची घोषणा केली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 20, 2026 | 04:21 PM
WHO आणि रॉकफेलर फाउंडेशनकडून 'या' मोठ्या उपक्रमाची घोषणा (Photo Credit- AI)

WHO आणि रॉकफेलर फाउंडेशनकडून 'या' मोठ्या उपक्रमाची घोषणा (Photo Credit- AI)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

 

  • दक्षिण आशियात उष्णतेच्या लाटेविरुद्ध जागतिक लढा!
  • WHO आणि रॉकफेलर फाउंडेशनकडून ‘या’ मोठ्या उपक्रमाची घोषणा
मुंबई | फेब्रुवारी 2026: मुंबई क्लायमेट वीकमध्ये, WHO-WMO क्लायमेट अँड हेल्थ संयुक्त उपक्रम, द रॉकफेलर फाउंडेशन आणि वेलकमने, ग्लोबल हीट हेल्थ इन्फर्मेशन नेटवर्क यांच्या सहकार्याने, दक्षिण आशिया उपखंडातील मानवी आरोग्य आणि आर्थिक स्थैर्यासाठी झपाट्याने वाढणारा गंभीर धोका ठरत असलेल्या उष्णतेपासून लोकांना तीव्र उष्णतेपासून संरक्षण देण्यासाठी दोन नवीन संयुक्त उपक्रमांची घोषणा केली. हे दोन नवे उपक्रम, द रॉकफेलर फाउंडेशन आणि वेलकम यांच्या निधीतून राबवले जाणार असून, दक्षिण आशियाची तीव्र उष्णता तसेच इतर हवामान आणि वातावरणाशी संबंधित आरोग्य परिणाम ओळखण्याची, त्यासाठी तयारी करण्याची आणि प्रभावी प्रतिसाद देण्याची क्षमता अधिक मजबूत करतील.

WHO–WMO क्लायमेट अँड हेल्थ जॉइंट प्रोग्रॅम अंतर्गत स्थापन करण्यात आलेला दक्षिण आशिया क्लायमेट–हेल्थ डेस्क, तसेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटिओरोलॉजी (IITM), इंडिया मेटिओरोलॉजिकल डिपार्टमेंट (IMD) आणि इतर भागीदारांच्या सहकार्याने राबवला जाणारा हा उपक्रम, हवामान आणि वातावरणविषयक माहितीचे आरोग्य संरक्षणासाठी कृतीत रूपांतर अधिक प्रभावीपणे करण्यास मदत करेल.

या कामाला प्रोत्साहन म्हणून, द रॉकफेलर फाउंडेशन यांच्या अनुदानातून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (IISER), पुणे यांच्या माध्यमातून समर्थित दक्षिण आशिया सायंटिफिक रिसर्च कन्सोर्टियम उष्णतेचा विविध लोकसमूहांवर कसा परिणाम होतो याबाबत प्रदेशातील वैज्ञानिक समज अधिक सखोल करणार आहे. हे प्रकल्प आरोग्यावर होणाऱ्या तीव्र उष्णतेच्या धोक्यांना सामोरे जाण्यासाठी तयार करण्यात आलेल्या अधिक व्यापक आणि महत्त्वाकांक्षी प्रादेशिक धोरणाचे पहिले दोन घटक आहेत.ग्लोबल हीट हेल्थ इन्फॉर्मेशन नेटवर्कच्या प्रादेशिक उपक्रमांसह वाढत्या संयुक्त उपक्रमांच्या मालिकेचा हा भाग असून, समुदायांचे संरक्षण करण्यासाठी सुनियोजित विज्ञानावर आधारित प्रयत्नांची ही सुरुवात आहे. या व्यापक आराखड्याबाबत लवकरच अधिक माहिती जाहीर केली जाणार आहे.

“इंडिया मेटिऑरॉलॉजिकल डिपार्टमेंट (IMD) चे डायरेक्टर जनरल ऑफ मेटिऑरॉलॉजी आणि वर्ल्ड मेटिऑरॉलॉजिकल ऑर्गनायझेशन (WMO) चे भारताचे कायम प्रतिनिधी डॉ. मृत्युंजय मोहापात्रा म्हणाले की, “दक्षिण आशियामध्ये तीव्र उष्णता ही जीवित आणि उपजीविकेसाठी वाढता धोका ठरत आहे,” ते पुढे म्हणाले, “साउथ एशिया क्लायमेट-हेल्थ डेस्क अंतर्गत IITM सोबतच्या या भागीदारीचे IMD स्वागत करते, ज्यामुळे विज्ञान ते सेवा हा दुवा अधिक बळकट होईल, आरोग्यासाठी लवकर इशारा देणारी प्रणाली अधिक सक्षम होईल, आणि तीव्र उष्णतेच्या काळात समाजाचे संरक्षण करण्यासाठी निर्णयकर्त्यांना वेळेवर कृती करता येतील.”

जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या दक्षिण आशियात या उष्णतेचा आरोग्यावर मोठा परिणाम होत असल्याने संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी जगभर वाढत चाललेल्या तीव्र उष्णतेच्या धोक्याला तोंड देण्यासाठी तातडीने जागतिक स्तरावर कृती करण्याचे आवाहन केले आहे. WMO च्या माहितीनुसार, आशिया खंड जागतिक सरासरीपेक्षा जवळपास दुप्पट वेगाने तापत आहे. त्यामुळे अतिवृष्टी, उष्णतेच्या लाटा यांसारख्या तीव्र हवामान घटनांत वाढ होत असून, प्रदेशातील जीवनमान, उपजीविका, आरोग्य व्यवस्था, अर्थव्यवस्था आणि पर्यावरणावर ताण वाढत आहे, विशेषतः सर्वाधिक असुरक्षित आणि उघड्यावर राहणाऱ्या समुदायांसाठी हा धोका अधिक गंभीर ठरत आहे.

Recipe : आनंदाच्या प्रसंगी काही खास होऊन जाऊद्यात, घरी बनवा गोडसर ‘सीताफळ फिरनी’

भारत आणि पाकिस्तानमध्ये मान्सूनपूर्व काळात तापमान नियमितपणे 50°C पेक्षा जास्त वाढते, आणि या प्रदेशात उष्णतेशी संबंधित मृत्यूंची संख्या दरवर्षी 2 लाखांहून अधिक आहे. त्याच वेळी, तीव्र उष्णतेमुळे आर्थिक स्थैर्य आणि उत्पादकतेवरही परिणाम होत आहे. एकट्या 2024 मध्ये, भारतात उष्णतेच्या संपर्कामुळे 247 अब्ज संभाव्य कामगारांचे कमाईचे तास गमावले गेले – त्यामुळे काम करण्याची क्षमता कमी झाल्याचे आणि अंदाजे 194 अब्ज डॉलर्स इतके उत्पन्नाचे नुकसान झाल्याचे लॅन्सेट काउंटडाउनच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

वर्ल्ड मेटिऑरॉलॉजिकल ऑर्गनायझेशन यांच्या सचिव-जनरल प्रोफेसर सेलेस्ट साउलो म्हणाल्या, “दक्षिण आशियाइतका तीव्र उष्णतेचा परिणाम फारच कमी प्रदेशांमध्ये जाणवतो, आणि या परिस्थितीला तोंड देण्यासाठी दाखवलेला ठाम निर्धार मी स्वागतार्ह मानते. आपल्याला माहीत आहे की, अतिउष्णतेमुळे होणारा प्रत्येक मृत्यू टाळता येऊ शकतो, आणि हीट हेल्थ अ‍ॅक्शन प्लॅनमुळे जीव वाचत आहेत,” त्या पुढे म्हणाल्या की, “विज्ञान, सरकारी नेतृत्व आणि पाठबळ, तसेच समुदायांच्या कृती यांना एकत्र आणून देश या आव्हानांना प्रभावीपणे सामोरे जाऊ शकतो हे लक्षात येते.”

तीव्र उष्णतेला तोंड देण्यासाठी एकत्रित प्रयत्न आणि विविध क्षेत्रांच्या सहभागातून एकत्रित कृती आवश्यक आहे. हा एकात्मिक प्रयत्न सरकार, सार्वजनिक सेवा यंत्रणा, समुदाय आणि आरोग्य व्यवस्था यांना टाळता येणारे आजार रोखण्यासाठी आणि जीव वाचवण्यासाठी आवश्यक, कृतीयोग्य माहिती उपलब्ध करून देतो या संयुक्त उपक्रमाअंतर्गत दोन महत्त्वाचे उपक्रम समाविष्ट आहेत:

1. पहिल्यांदा सुरु होणारा साउथ एशिया क्लायमेट–हेल्थ डेस्क

संयुक्त उपक्रमाचा भाग म्हणून हवामान आणि आरोग्य क्षेत्रातील संशोधन व विकास (R&D) आणि कार्यान्वयन क्षेत्रांमध्ये सुरु होणाऱ्या पहिल्या युनिट्सपैकी एकाचे प्रतिनिधित्व करत, हे युनिट विविध भागधारकांच्या क्षमता बळकट करेल, जेणेकरून ते आरोग्यासंबंधी आणि उद्दिष्टानुसार योग्य हवामान व दिर्घकालीन हवामान माहिती सह-निर्मित, प्रमाणित आणि सामायिक करू शकतील. त्यामुळे समुदाय, आरोग्य प्राधिकरणे आणि आरोग्य सेवा गंभीर उष्णता निर्माण होण्याआधी व दरम्यान तसेच इतर हवामान-संबंधित आरोग्य धोके जसे की, त्यासंबंधित वाढणारे आजार यांचेशी प्रभावीपणे सामना करू शकतील आणि लवकर कृती करू शकतील.

2. दक्षिण एशिया वैज्ञानिक संशोधन संघटन

IISER पुणेच्या नेतृत्वाअंतर्गत, MS स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशन आणि IITM यांसह या संशोधन संस्थांच्या संघटनेद्वारे दक्षिण आशियातील लोकांवर उष्णतेचा प्रभाव कसा पडतो याचा सखोल अभ्यास केला जाईल — ते कुठे राहतात, कोणते काम करतात, आणि कोणत्या वेगवेगळ्या परिस्थितींचा सामना करतात या सर्वांचा त्यात समावेश असेल. सानुकूल उष्णता-धोका मर्यादा विकसित करून, या संघटनेचा उद्देश उष्णता कृती योजना, लवकर इशारा देणारी प्रणाली आणि तयारीच्या प्रयत्नांना अखेरीस बळकटी देणे हा आहे, ज्यामुळे समुदाय आणि संस्था जगातील सर्वात जास्त उष्णतेला संवेदनशील असलेल्या प्रदेशांमध्ये वाढत्या तापमानाला अधिक चांगल्या प्रकारे सामोरे जाऊ शकतील.

द रॉकफेलर फाउंडेशन आणि वेलकम यांनी WHO-WMO क्लायमेट अँड हेल्थ जॉइंट प्रोग्रॅमसाठी $11.5 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक केली असून, असुरक्षित प्रदेशांमध्ये हवामान-आधारित आरोग्य कृतीचा विस्तार करण्याचा त्यामागील उद्देश आहे. या दोन परोपकारी संस्थांनी आरोग्य क्षेत्रातील भागीदार आणि हवामान विभागांमध्ये विज्ञानाधारित सहकार्याची नवी मॉडेल्स विकसित करण्यासाठी हा निधी दिला आहे. यामुळे आरोग्य यंत्रणांना समुदायांचे संरक्षण आणि जीव वाचवण्यासाठी आवश्यक असलेली महत्त्वाची हवामान माहिती उपलब्ध होईल आणि दोन्ही क्षेत्रांतील दरी कमी होण्यास मदत होईल.

या उपक्रमांच्या स्थापनेद्वारे, दक्षिण आशिया संशोधन, हवामान निरीक्षण व अंदाज, आणि आरोग्य प्रतिसाद यांना जोडणाऱ्या या एकात्मिक हवामान-आरोग्य दृष्टिकोनाची अंमलबजावणी करण्यास आघाडीवर आहे, ज्यामुळे लोकांना हवामानातील बदल आणि अस्थिरतेमुळे होणाऱ्या आरोग्यधोक्यांपासून संरक्षण मिळू शकते.

द रॉकफेलर फाउंडेशनमध्ये हेल्थचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. नवीन राव म्हणाले की, “भारत आणि संपूर्ण दक्षिण आशियामध्ये गेल्या दहा वर्षांत होत चाललेल्या अत्यंत घातक उष्णतेच्या लाटांनंतर, पारंपरिक सार्वजनिक आरोग्य पद्धती आता पुरेशा नाहीत हे स्पष्ट झाले आहे. भारतातील सर्वात असुरक्षित समुदायांचे संरक्षण करण्यासाठी, आपण आरोग्य सेवा कशा पुरवतो आणि आघाडीवरील प्रदात्यांना व रुग्णांना आज तातडीने आवश्यक उपाययोजना कशा पुरवतो याबद्दल नव्याने विचार करण्याची गरज आहे,” ते पुढे म्हणाले की, “आमच्या संयुक्त उपक्रमाला दिलेल्या पाठिंब्याद्वारे, आम्ही आधुनिक विज्ञानाचा प्रत्यक्ष परिणामात वापर होऊ शकतो आणि भारतासह परिसरातील आरोग्य व्यवस्था हवामान बदलासाठी तयार करण्यास मदत करू इच्छितो.”

वेलकम क्लायमेट अँड हेल्थ विभागाचे संचालक डॉ. ऍलन डँगॉर म्हणाले की, “हवामान बदलामुळे तापमान वाढणे म्हणजे सार्वजनिक आरोग्याला धोका आहे, आणि जगभर लोकांचे जीवन आणि उपजीविका धोक्यात आणत आहे. दक्षिण आशियामध्ये, अत्यंत उष्णतेमुळे समुदायांना मोठा परिणाम होत आहे – विशेषतः मुलं, गर्भवती महिला, वृद्ध, बाहेर काम करणारे कामगार आणि ज्यांच्याकडे उपजिवीकेसाठी कमी साधने आहेत असे समुदाय.” ते पुढे म्हणाले की, “आपल्याला अशा विज्ञानावर आधारित उपाययोजनांमध्ये गुंतवणूक करणे गरजेचे आहे, जे प्रदूषण कमी करतात आणि तणाव सहन करण्याची क्षमता वाढवतात, आणि त्यात सार्वजनिक आरोग्य निर्णय प्रक्रियेचा मुख्य भाग असावा. दक्षिण आशियामधील भागीदार आणि समुदायांसोबत काम करत असल्याचा वेलकमला अभिमान आहे, जेणेकरून पुरावे, साधने आणि उपाययोजना विकसित करता येतील, ज्यामुळे शेवटी आरोग्य सुधारेल आणि प्राण वाचतील.”

22 वर्षाच्या मुलीची मासिक पाळी झाली बंद, Pregnancy शक्य आहे का? कमी वयात MC न येण्याची कारणं; तज्ज्ञांचे मत

Web Title: Who and rockefeller foundation announce this major initiative

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2026 | 04:21 PM

Topics:  

  • lifestyle news
  • WHO

संबंधित बातम्या

द्रविड वास्तुकलेने समृद्ध, समुद्रकिनारी उभे असलेले भारताचे प्राचीन मंदिर; 8 व्या शतकात केली उभारणी…
1

द्रविड वास्तुकलेने समृद्ध, समुद्रकिनारी उभे असलेले भारताचे प्राचीन मंदिर; 8 व्या शतकात केली उभारणी…

तुम्हीही ही एक चूक करताय? मग थांबा, फाटलेल्या दुधाचं पाणी आहे खूप कामाचं…. जाणून घ्या याचा स्मार्ट वापर
2

तुम्हीही ही एक चूक करताय? मग थांबा, फाटलेल्या दुधाचं पाणी आहे खूप कामाचं…. जाणून घ्या याचा स्मार्ट वापर

पालकांनो दुर्लक्ष करू नका! वारंवार ताप, वजन घटतंय?, मुलांमधील कॅन्सरची ‘ही’ असू शकतात सुरुवातीची लक्षणं
3

पालकांनो दुर्लक्ष करू नका! वारंवार ताप, वजन घटतंय?, मुलांमधील कॅन्सरची ‘ही’ असू शकतात सुरुवातीची लक्षणं

Shivaji Maharaj Jayanti 2026 Wishes: छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या उत्स्फूर्त प्रेरणादायी शुभेच्छा
4

Shivaji Maharaj Jayanti 2026 Wishes: छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या उत्स्फूर्त प्रेरणादायी शुभेच्छा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
दक्षिण आशियात उष्णतेच्या लाटेविरुद्ध जागतिक लढा! WHO आणि रॉकफेलर फाउंडेशनकडून ‘या’ मोठ्या उपक्रमाची घोषणा

दक्षिण आशियात उष्णतेच्या लाटेविरुद्ध जागतिक लढा! WHO आणि रॉकफेलर फाउंडेशनकडून ‘या’ मोठ्या उपक्रमाची घोषणा

Feb 20, 2026 | 04:21 PM
पवारांसाठी प्रियांका चतुर्वेदींचा पत्ता कट करण्याची संजय राऊतांची चाल; भाजपच्या नेत्याचा निशाणा

पवारांसाठी प्रियांका चतुर्वेदींचा पत्ता कट करण्याची संजय राऊतांची चाल; भाजपच्या नेत्याचा निशाणा

Feb 20, 2026 | 04:19 PM
Oceanographic Research 2026: धोक्याची घंटा! हिंद महासागरात वाहतेय गोडे पाणी, शास्त्रज्ञ चिंतेत

Oceanographic Research 2026: धोक्याची घंटा! हिंद महासागरात वाहतेय गोडे पाणी, शास्त्रज्ञ चिंतेत

Feb 20, 2026 | 04:11 PM
IND vs SA, T20 World Cup 2026 : सूर्या आर्मी सुपर 8 मध्येही विजयीरथ कायम ठेवणार? दक्षिण आफ्रिका आणि भारत हेड-टू-हेड रेकॉर्ड

IND vs SA, T20 World Cup 2026 : सूर्या आर्मी सुपर 8 मध्येही विजयीरथ कायम ठेवणार? दक्षिण आफ्रिका आणि भारत हेड-टू-हेड रेकॉर्ड

Feb 20, 2026 | 04:10 PM
Income Tax Department: बनावट राजकीय देणगी प्रकरणात ११ सीए दोषी; आयसीएआय शिस्तपालन मंडळाचा मोठा निर्णय

Income Tax Department: बनावट राजकीय देणगी प्रकरणात ११ सीए दोषी; आयसीएआय शिस्तपालन मंडळाचा मोठा निर्णय

Feb 20, 2026 | 04:09 PM
Youth Congress at Bharat Mandapam : ‘भारत मंडपम’मध्ये युवक काँग्रेसचे आंदोलन; कार्यकर्त्यांनी शर्ट काढून घातला जोरदार गोंधळ

Youth Congress at Bharat Mandapam : ‘भारत मंडपम’मध्ये युवक काँग्रेसचे आंदोलन; कार्यकर्त्यांनी शर्ट काढून घातला जोरदार गोंधळ

Feb 20, 2026 | 04:07 PM
पोलिस होण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार! ‘या’ जिल्ह्यात होणार भरती; 87 पदांसाठी हजारो अर्ज दाखल

पोलिस होण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार! ‘या’ जिल्ह्यात होणार भरती; 87 पदांसाठी हजारो अर्ज दाखल

Feb 20, 2026 | 04:02 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Feb 20, 2026 | 03:36 PM
Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Feb 20, 2026 | 03:26 PM
Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Feb 20, 2026 | 03:19 PM
Beed : शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ; चक्क मंडप टाकून दहावीचे पेपर

Beed : शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ; चक्क मंडप टाकून दहावीचे पेपर

Feb 20, 2026 | 03:13 PM
Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Feb 19, 2026 | 07:59 PM
Nalasopara : आता लोकलमध्ये चढण्यासाठी लावावी लागणार रांग; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

Nalasopara : आता लोकलमध्ये चढण्यासाठी लावावी लागणार रांग; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

Feb 19, 2026 | 07:48 PM
Pimpri Chinchwad :  लहान वस्तूंवर साकारल्या शिवरायांच्या सूक्ष्म मनोहारी प्रतिमा

Pimpri Chinchwad : लहान वस्तूंवर साकारल्या शिवरायांच्या सूक्ष्म मनोहारी प्रतिमा

Feb 19, 2026 | 07:45 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.