फोटो सौजन्य- iStock
आता ताशी 130 किलोमीटरच्या पुढे वेगाने गाडी चालविल्यास वाहनचालकावर FIR दाखल केली जाणार आहे. गुरुवार 1 ऑगस्टपासून हा नियम अमलांत आणला जाणार आहे. कर्नाटकात कुठेही 130 किमी प्रतितास पेक्षा जास्त वेगाने वाहन चालविल्यास एफआयआर दाखल करण्यात येणार आहे. असे एका वरिष्ठ वाहतूक पोलिस अधिकाऱ्याने सांगितले आहे. जास्त वेगाने चालविलेल्या गांड्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होतात त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
अतिरिक्त पोलीस महासंचालक (वाहतूक आणि रस्ता सुरक्षा) आलोक कुमार म्हणाले की, “1 ऑगस्टपासून, निष्काळजीपणाने आणि धोकादायक ड्रायव्हिंगच्या आरोपाखाली कर्नाटकात कुठेही 130 किमी प्रतितास पेक्षा जास्त वेगाने वाहन चालवणाऱ्यांवर FIR दाखल केली जाणार आहे,” पीटीआयशी बोलताना, आलोक कुमार यांनी स्पष्ट केले की, भारतीय न्याय संहिता (BNS) – 281 अंतर्गत रॅश आणि निष्काळजीपणे ड्रायव्हिंगसाठी, एकदा वेग मर्यादा 120 किमी प्रतितास ओलांडली की ते रॅश किंवा धोकादायक ड्रायव्हिंग होते.
या महिन्याच्या सुरुवातीला कर्नाटकातील NICE (नंदी इन्फ्रास्ट्रक्चर कॉरिडॉर एंटरप्राइझ) रस्त्यावर झालेल्या अपघाताबाबत सांगताना ते म्हणाले की, या अपघातात तीन लोकांचा मृत्यू झाला होता, अपघातातील वाहन ताशी 160 किमी वेगाने चालवले जात होते. त्यांच्या म्हणण्यानुसार, सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ते सुरक्षेवरील देखरेख समितीने अपघाताची दखल घेतली आणि राज्य सरकारला कळवले की वाहने वेगाने चालवणे वाढले आहे आणि त्यामुळे जीवितहानी होत आहे.
ते म्हणाले, “वर्ष 2022 मध्ये, कर्नाटकात 90 टक्के (अपघातात) मृत्यू हे अतिवेगामुळे (अपघात) होतील.अलीकडेच, सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेख समितीने आम्हाला याबाबत प्रभावी अंमलबजावणी करण्यास सांगितले. या दिशेने आम्ही हा नियम आणला आहे. ताशी 130 किमीपेक्षा जास्त वेगाने वाहन चालवणाऱ्यांविरुद्ध एफआयआर दाखल करणे हे खरे आव्हान असेल, परंतु आम्ही ते करण्याचा प्रयत्न करू.”
नियमाच्या परिणामाबाबत कुमार म्हणाले की, “नवीन नियमाचा सर्वांवर परिणाम होईल आणि ते फक्त महामार्गांपुरते मर्यादित असणार नाही. इतर ठिकाणीही आम्ही स्पीड लेजर गनचा उपयोग करत आहोत. आम्ही 155 स्पीड गन वितरित केले आहेत .”