या पार्श्वभूमीवर 11 जानेवारी रोजी होणारी मुंबईतील जाहीर सभा निर्णायक ठरणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. या सभेत शासनाच्या उदासीन भूमिकेचा निषेध करण्यात येणार असून पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे.
शासनाने तात्काळ निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर 11 जानेवारी रोजी होणारी मुंबईतील जाहीर सभा शासनाला जागृत करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
यापूर्वी 26 जानेवारी 2022 रोजी नितिन जाधव यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्पस्थळी एक दिवसाचे उपोषण करण्यात आले होते. त्यानंतर मुख्य अभियंत्यांनी भेट देऊन द्वितीय सुधारित सुप्रमा तयार करण्याचे आदेश दिले. मात्र कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होऊनही मंत्रिमंडळाच्या निर्णयाअभावी फाईल सात महिन्यांपासून प्रलंबित आहे. आमदार मंत्री योगेश कदम तसेच खासदार सुनील तटकरे
यांच्या उपस्थितीत आढावा बैठक होऊनहीं ठोस निर्णय न झाल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये असंतोष वाढत आहे. शासन दरबारी केलेल्या पत्रव्यवहारालाही अद्याप उत्तर मिळालेले नाही. दरम्यान, 26 जानेवारी 2026 रोजी धरणाच्या भिंतीवर आत्मदहन करण्याचा टोकाचा निर्णय नितिन जाधव यांनी जाहीर केला असून ग्रामस्थांनी त्यांना माघार घेण्याची विनंती केली आहे.






