'मुंबईला देवेंद्र फडणवीसांचे नाव माहिती नव्हते तेव्हापासून आम्ही....'; उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना डिवचले
“मुंबईचा कोस्टल रोड आम्ही केल्याचा दावा करत देवेंद्र फडणवीस हे नाव मुंबईला माहिती नव्हतं तेव्हापासून आम्ही कोस्टल रोडची तयारी सुरु केली होती, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना असा टोला लगावला. आम्ही मुंबईत विविध सेवा-सुविधा सुरू केल्या मुंबईच्या विकासात भाजपचा काडीचा संबंध नाही, अशा शब्दांत त्यांनी भाजपलाही धारेवर धरलं आहे. त्याचवेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची शिवसेना ही तर शाहसेना झाली आहे. भाजपला महाराष्ट्रातील मराठी मते फोडायची असल्यामुळेच त्यांनी शिंदेंना फोडल्याचे त्यांनी म्हटले आहे.
Mahayuti Mumbai Manifesto : महायुतीचा मुंबईसाठी जाहीरनामा प्रसिद्ध; मराठी माणसांसाठी केल्या
भाजपकडून विकास आणि मराठी माणसांच्या मुद्द्यावरून होत असलेल्या टीकेला उत्तर देताना शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. भाजप सध्या ज्या प्रकारचा विकास राबवत आहे, तो विकास नसून विनाश आहे, असा आरोप त्यांनी केला. उद्धव ठाकरे म्हणाले, “आम्हाला विकास नको असा आरोप केला जातो, तो चुकीचा आहे. आम्हाला विकास हवा आहे, पण नियोजनशून्य विकास मुंबईला विनाशाकडे घेऊन जात आहे.” तसेच, “शिवसेना नसती, तर भाजपला मंत्रालय दिसले असते का?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
भाजप आणि शिंदे गटावर हल्लाबोल करताना उद्धव ठाकरे म्हणाले, “देवेंद्र फडणवीस, अमित साटम यांच्यासारख्या नेत्यांना महापालिका आणि मंत्रालयाचा मार्ग शिवसेनेनेच दाखवला. मंत्रिपद कुणी दिलं? फडणवीस पहिल्यांदा कुणाच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री झाले?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. “आज यांच्या हातात जास्तीत जास्त सत्ता आहे. मात्र, त्यांनी मराठी माणसासाठी नेमकं काय केलं? मराठी माणसाला घर नाकारणारेच आता आम्हाला विचारत आहेत की आम्ही मराठी माणसांसाठी काय केलं?” अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपसह शिंदे गटाच्या शिवसेनेवरही जोरदार टीका केली.
West Bengal ED Raid: कोलकाताहून आय-पीएसीच्या गोवा कार्यालयात २० कोटी रुपये पोहोचले…
दरम्यान आज महायुतीचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला. महायुतीचा वचननामा सादर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना थेट ओपन चॅलेंज दिले. उद्धव ठाकरे यांच्या भाषणात विकासाचा मुद्दा दाखवून दिल्यास पाच हजार रुपये देईन, असे आव्हान फडणवीस यांनी यावेळी दिले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आमच्या भाषणांपैकी ९५ टक्के भाग विकासावर आधारित असतो. मात्र उद्धव ठाकरे विकास दाखवत नाहीत. हिंदुत्व हा आमचा मुद्दा आहे आणि त्यावर आम्हाला अभिमान आहे. त्यांनी लवकरच मला एक लाख रुपये पाठवावेत. कारण माझ्या भाषणात केवळ विकास असतो. हे पैसे मी लाडक्या बहिणींना देईन,” असेही त्यांनी नमूद केले.






