फोटो सौजन्य - Social Media
भारताचा सार्वजनिक प्रसारक प्रसार भारतीमध्ये नोकरी करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. प्रसार भारतीकडून मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह पदांसाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार असून, यासाठी मर्यादित कालावधी देण्यात आला आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत दूरदर्शन केंद्र (DDK), आकाशवाणी तसेच कमर्शियल ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस (CBS) अंतर्गत विविध शहरांमध्ये पदे भरली जाणार आहेत. यामध्ये रायपूर, जालंधर, पटना, मुंबई, भोपाळ, रांची यांसारख्या शहरांचा समावेश आहे. अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्या आत अर्ज करणे आवश्यक आहे.
ही भरती मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह पदांसाठी असून, प्रसार भारतीच्या विविध युनिट्समध्ये उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. मीडिया, जाहिरात आणि विक्री क्षेत्रात काम करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी ही चांगली संधी मानली जात आहे.
शैक्षणिक पात्रता
मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मॅनेजमेंट संस्थेतून MBA / MBA (Marketing) किंवा PG Diploma in Management / Marketing असणे आवश्यक. यासोबतच किमान १ वर्षाचा कामाचा अनुभव आवश्यक आहे. ज्यांना मीडिया संस्थांमध्ये डायरेक्ट सेलिंगचा अनुभव आहे, अशा उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे. उमेदवाराचे वय ३५ वर्षांपेक्षा कमी असावे तसेच वयोमर्यादेची गणना भरती अधिसूचनेच्या तारखेपर्यंत केली जाणार आहे.
अर्ज प्रक्रिया (स्टेप बाय स्टेप)
अर्ज करताना कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास उमेदवार avedanhelpdesk@gmail.com या ई-मेल आयडीवर आपल्या समस्येचा स्क्रीनशॉट पाठवून संपर्क साधू शकतात. मीडिया आणि मार्केटिंग क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी प्रसार भारतीची ही भरती सुवर्णसंधी मानली जात आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अंतिम तारखेची वाट न पाहता वेळेत अर्ज करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.






