कसा घातला गंडा ?
फिर्यादी महिला ही ४३ वर्षाची आहे. तिने आपली आर्थिक फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली आहे. १५ जून ला महिलेसोबत अनुरूप या विवाह संस्थेच्या साइटवरून एका अज्ञात व्यक्तीची ओळख झाली. त्याने महिलेचा विश्वास संपादन करून तिच्या कडून वारंवार पैशाची मागणी केली आणि जवळपास २६ लाख रुपयाला त्याने महिलेका गंडा घातला आहे. जेव्हा तिच्या लक्षात आल की आपली आर्थिक फसवणूक झाली आहे, तेव्हा तिने एरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ज्या नंबर वरून तिला संपर्क करण्यात आला त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र त्याने केलेली पैशाची मागणी कशासाठी केली होती? याचा तपास सध्या पोलीस करत आहेत. पोलीसांनी गुन्हा दाखल करत असताना आमिष दाखवल्याचा उल्लेख केला आहे.
कारण ऐकून व्हाल थक्क
ज्या महिलेने आधी फिर्याद दिल आहे. तीच आधी लग्न झालं होत. त्या नंतर तिने घटस्फोट घेतला होता. ती दुसर लग्न करण्यासाठी शोधत असताना तिने विवाह संस्थेवर तिला संपर्क मिळाला. त्यांनी संपर्क केल्यानंतर भविष्यात गुंतवणूक करू म्हणून प्लाट आणि सिक्यूरीटी डिपॉझिट साठी पैसे मागितले तिने वारंवार पैसे दिले. पण तिची फसवणूक झाल्याचं लक्षात येताच तिने पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. आता पोलीसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. महिलेला पण चौकशीला बोलावल आहे. ज्या नंबर वरून संपर्क झाला आहे त्यांचा तपास आता सुरू केला आहे.
Ans: 43 वर्षीय घटस्फोटित महिला.
Ans: मॅट्रिमोनियल साइटवरून ओळख करून विश्वास संपादन केला आणि पैशांची मागणी केली.
Ans: सुमारे 26 लाख 50 हजार रुपये.






