तुम्ही "फास्ट अँड फ्युरियस 7" पहिला आहे का? त्यामध्ये विन डिझेल आणि पॉल वॉकरने एका इमारतीवरून दुसऱ्या इमारतीत उडी मारलेली Lykan HyperSport हायपरकार तुम्हाला आठवतच असेल. हीच कार एका लोकप्रिय भारतीय यूट्यूबरने केवळ 13 लाख रुपये खर्चून ही स्वत: तयार केली आहे. या यूट्यूबरने हा व्हिडिओ युट्युबवर टाकला आहे. या कारच्या वास्तविक किंमतीबद्दल बोलायचे तर त्याची किंमत तब्बल 30 कोटी रुपये आहे.
युटूबर तन्ना धवलने बनवली लक्झरी कार (फोटो सौजन्य: Social Media)
युटूबर तन्ना धवल याने ही अनोखी कार तयार केली असून, त्यांच्या टीमनेही या कामात त्याला मदत केली आहे. तन्ना धवल देखील आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर या कारचे व्हिडिओ शेअर करत आहे.
धवलने या कारचा व्हिडिओ युटूबवर पोस्ट केला आहे. त्याच्या या भन्नाट कामगिरीमुळे त्याचे आणि त्याचे टीमचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.
धवलने जी कार बनवली आहे त्याचे नाव Lykan Hypersport असे आहे. या कारची किंमत अंदाजे 30 कोटी रुपये आहे. जी युट्युबरने फक्त 13 लाखात बनवली आहे. चला या कारबद्दल जाणून घेऊया.
या कारमध्ये कार्बन फायबर बॉडीसह मजबूत डिझाइन, एक्सक्लुजिव्ह बाह्य रंग योजना आणि होलोग्राफिक डिस्प्ले आहे जो परस्पर गती आणि स्पर्श संवेदन प्रदान करतो.
ही कार फक्त लिमिटेड प्रमाणातच उत्पादित केली जाते. ही कार लक्झरी तर आहेच पण त्यासोबत यामध्ये अत्याधुनिक सेफ्टी फीचर्स सुद्धा समाविष्ट करण्यात आले आहे.