Maharashtra breaking News Marathi
पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे पहाटे साडे तीन वाजता निधन झाले. ते 82 वर्षांचे होते. मंगळवार (दि.६) दुपारी दोनपर्यंत त्यांचे पार्थिव राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजता पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. (Former Pune MP Suresh Kalmadi passes away)
06 Jan 2026 06:42 PM (IST)
Mahaaryaman Scindia’s accident : मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष असलेले महाआर्यमन सिंधिया यांचा अपघात झालेची बातमी समोर आली आहे. मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचे पुत्र आणि मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष महाआर्यमन दोन दिवसांच्या शिवपुरी दौऱ्यावर असताना शिवपुरी भेटीदरम्यान अपघात झाला आहे. या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी कोलारस विधानसभा मतदारसंघातील युवा परिषदेत सहभागी झाले होते.
06 Jan 2026 06:37 PM (IST)
मुंबई /गुरुग्राम, 06 जानेवारी 2026: होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया (एचएमएसआय) ने डिसेंबर 2025 मध्ये एकूण 4,46,048 युनिट्सची विक्री नोंदवली. ही कामगिरी मजबूत मागणी आणि ग्राहकांसाठी सुरक्षित, स्वच्छ व अधिक सुलभ मोबिलिटी उपलब्ध करून देण्याच्या कंपनीच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे प्रतिबिंब आहे. यामध्ये 3,92,306 युनिट्सची देशांतर्गत विक्री आणि 53,742 युनिट्सची निर्यात समाविष्ट आहे.
06 Jan 2026 06:22 PM (IST)
कोल्हापूर: शहरातील शाहूनगर परिसरातील एका घराला मंगळवारी भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत घरातील प्रापंचिक साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झली नाही. ही आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
आग लागल्यानंतर काही वेळातच घरातील गॅस सिलिडरचा स्फोट झाला. त्यामुळे आगीने अधिक भयानक रूप धारण केले. आगीचे लोळ संपूर्ण घरभर पसरले. सिलिंडर स्फोटामुळे आगीची तीव्रता वाढल्याने घरातील फर्निचर, कपडे, इलेक्ट्रॉनिक साहित्य व इतर वस्तू जळून खाक झाल्या. काही क्षणातच संपूर्ण घर आगीच्या विळख्यात सापडले. दरम्यान, आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू असून, शॉर्टसर्किट, गॅसगळती किंवा अन्य कारणांमुळे आग लागली का, याचा शोध घेतला जात आहे.
06 Jan 2026 06:07 PM (IST)
सोनाजी गाढवे /पुणे: जागतिक राजकारणातील वाढते तणाव, अमेरिकेची आक्रमक धोरणे, ग्लोबल साऊथमधील घडामोडी, तसेच भारताच्या शेजारील देशांतील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर भारताचे परराष्ट्र धोरण अधिक महत्त्वाचे ठरत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे निर्णय, अमेरिका- भारत संबंध, रशिया- युक्रेन युद्ध, सार्क- बिम्स्टेकचा बदलता पट आणि भारत- चीन संबंधांवरील परिणाम याबाबत महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी 'नवराष्ट्र'शी सखोल संवाद साधला.
06 Jan 2026 05:50 PM (IST)
बाणेर येथे आयोजित “विजयी संकल्प सभा” या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सुस–म्हाळुंगे परिसरातील अनेक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षाला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश केला. यावेळी प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांनी सांगितले की, अमोल बालवडकर यांना उमेदवारी न देण्याच्या निर्णयामुळे परिसरातील कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. हा निर्णय अन्यायकारक असून कार्यकर्त्यांच्या भावना दुर्लक्षित करणारा आहे, अशी भावना सुस–म्हाळुंगे परिसरात व्यक्त होत आहे.
06 Jan 2026 05:40 PM (IST)
टी-२० विश्वचषकाला काही दिवस बाकी असताना सर्वच संघ या मोठ्या स्पर्धेसाठी चांगलेच तयारीला लागले आहे. अनेक संघांनी आपापले संघ देखील जाहीर केले आहेत. दरम्यान, काही काळापासून संघर्ष करत असलेला झिम्बाब्वे संघ येत्या टी-२० विश्वचषकात दमदार कामगिरी करून जागतिक क्रिकेटमध्ये आपले अस्तित्व पुन्हा स्थापित करू शकेल, असा विश्वास झिम्बाब्वे संघाचा कर्णधार सिकंदर रझाने व्यक्त केला आहे. ७ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत माजी विजेत्या ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यासोबत झिम्बाब्वेला गट ब मध्ये स्थान देण्यात आले आहे, तर आयर्लंड आणि ओमान देखील त्याच गटात आहेत.
06 Jan 2026 05:35 PM (IST)
गत काही दिवसांपासून आरमोरी शहर परिसरातील शेतातील मोटारपंप केबल चोरीचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. या वाढत्या घटनांमुळे शेतकऱ्यांचे आधिक नुकसान होत आहे. शेतकऱ्यांच्या यासंदर्भातील तक्रारी वाढल्या आहेत. यावरून तालुक्यात या अज्ञात चोरट्यांची टोळीच सक्रिय असल्याचे सिद्ध होत असताना टोळीचा पर्दाफाश करण्यात मात्र पोलिस दलाला अद्यापही यश आले नसल्याचे दिसून येत आहे. गडचिरोली शहरातील मंगरी नाल्यालगतच्या शेतशिवारातील काही शेतकऱ्यांच्या शेतातील सौरऊर्जा मोटारपंपाचे केबल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शनिवारी उघडकीस आली.
06 Jan 2026 05:30 PM (IST)
तालुक्यातील करबुडे-मासेबाव येथील तरुण रिक्षा मॅकेनिकला आरोग्य विभागात नोकरी लावण्याचे अमिष दाखवून ११ लाख ३९ हजार ५११ रुपयांच्ची तीन संशयितांना फसवणूक केली. तीन संशयितांविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्यामध्ये एका अनोळखी महिलेचा सामावेश आहे. समीर महस्के (पुर्ण नाव माहित नाही) जनता सहकारी बँक क्लार्क नगर ठाणे, येथील बैंक खातेधारक रोहीत प्रकाश म्हसकर व अन्य अनोळखी महिला असे संशयित आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी उमेश धनावडे (वय ३३, रा. रिक्षा मॅकेनिक, रा. करबुडे-मासेबाव, रत्नागिरी) संशयित समीर म्हस्के याने त्यांचा भाऊ तुषार धनावडे तसेच अन्य मित्र अजय विजय गोवळकर यांना आरोग्य विभागामध्ये नोकरीला लावतो, त्यासाठी पीस भरावयाचे लागतील असे सांगतिले.
06 Jan 2026 05:25 PM (IST)
बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा हा त्याच्या “इक्कीस” या नवीन प्रदर्शित झालेल्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. पदार्पणापासूनच तो घराघरात लोकप्रिय झाला आहे. सोशल मीडियावर त्याच्या अभिनयाचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. या चित्रपटात दिवंगत सुपरस्टार धर्मेंद्र देखील आहेत, ज्यामुळे चित्रपटाची चर्चा आणखी वाढली आहे. अलिकडेच एका मुलाखतीत अगस्त्य नंदा याने बच्चन आणि कपूर कुटुंबाचा वारसा पुढे नेण्याबद्दल भाष्य केले.
06 Jan 2026 05:20 PM (IST)
उत्तर प्रदेशात SIR च्या पहिल्या फेरीत मोठ्या संख्येने मतदार वगळण्यात आले आहेत. SIR पूर्वी, उत्तर प्रदेशात 15 करोड 44 लाख 30 हजार 92 मतदार होते. मात्र आता त्यांची संख्या कमी झाली आहे. आता मतदारांची संख्या 12 करोड 55 लाख 55 हजार 984 झाली आहे. एकूण २८.८७४ दशलक्ष (१८.७०%) नावे वगळण्यात आली आहेत. SIR नंतरची ही आकडेवारी वाचून सर्वांना आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
06 Jan 2026 05:15 PM (IST)
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची अॅशेस कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात, ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टीव्ह स्मिथने मोठा कारनामा केला आहे. पाचव्या कसोटीत इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या डावात शतक झळकावून स्मिथने भारताचा माजी कर्णधार दिग्गज राहुल द्रविडचा विक्रम मोडीत काढला आहे.
06 Jan 2026 05:10 PM (IST)
कसारा येथील सार्वजनिक जागेवर अनधिकृत बांधकाम केले असल्याचा दावा करत रेल्वे प्रशासनाने टपरीधारक व घरमालकांना वारंवार नोटीसा बजावल्या जात असल्याने स्थानिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. रेल्वे प्रशासनाने संरक्षण भिंत टाकून आपली हद्द निश्चित केली असल्याची समज टपरी धारकांना सतावत आहे. मग दुकान बांधकामे हटवण्याचा रेल्वे प्रशासनाचा अट्टाहास कशासाठी असा सवालही या निमित्ताने उपस्थित होत आहे. या निर्णयाने शेकडो कुटुंबे उघड्यावर येणार असल्याने तोंडचे पाणी पळाले आहे. मध्य रेल्वे परिसराच्या चारी बाजूने लोकवस्तीचा वेढा आहे.
06 Jan 2026 05:05 PM (IST)
आशिया खंडातील कांद्याची अग्रेसर बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या बाजारभावात मोठी घसरण झाली असून, याचा थेट फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत कांद्याच्या दरात सुमारे ६०० रुपयांची घसरण झाली असून, मागील पंधरा दिवसांत तब्बल १ हजार रुपयांनी बाजारभाव खाली आले आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे.
06 Jan 2026 05:00 PM (IST)
उल्हासनगर मध्ये भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी शिवसेनेवर हल्लाबोल करतांना उल्हासनगर मधून शिवसेनेचा सुपडासाफ करू असं व्यक्तव्य केलं होतं . नरेंद्र पवारांच्या या वक्तव्याला उत्तर देताना श्रीकांत शिंदे यांयुतीतील नेत्यांनी बोलताना भान ठेवलं पाहिजे, असं श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं.
06 Jan 2026 04:50 PM (IST)
नेरळ रेल्वे गेट क्रमांक २१ तांत्रिक कामासाठी सलग चार दिवस बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. ६ जानेवारी रोजी रात्री १० वाजेपासून ते ९ जानेवारी सकाळी ८ वाजेपर्यंत हे रेल्वे फाटक सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहणार आहे. मात्र, रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे स्थानिक नागरिकांमध्ये आणि वाहनचालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.दरम्यान वाहतुकीचा खोळंबा आणि पर्यायी रस्त्यांची स्थिती अत्यंत बिकट आहे. वाहनचालकांना आता दामत रेल्वे गेट ते आंबिवली रेल्वे गेट असा वळसा घालून प्रवास करावा लागणार आहे. विशेष म्हणजे, या पर्यायी मार्गांवर सध्या रस्त्यांची कामे सुरू असल्याने मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळणार आहे.
06 Jan 2026 04:39 PM (IST)
वसईत महानगरपालिकेच्या पाईपलाईनचे काम सुरू असताना कंत्राटदारांची गंभीर लापरवाही समोर येत आहे.कामाच्या ठिकाणी कोणताही संपर्क क्रमांक लावलेला नाही, तसेच ट्रॅफिक नियंत्रणासाठी ना कर्मचारी दिसत आहेत ना सूचनाफलक. परिणामी या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत असून, साधारण तासभर उशिराने वाहतूक सुरळीत होत असल्याचे चित्र आहे.
06 Jan 2026 03:50 PM (IST)
तुम्ही आजवर सोशल मिडियावर अनेक व्हायरल व्हिडिओज पाहिले असतील. पण आता इथे जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्यातील दृश्ये तुमचे होश उडवतील. अलिकडेच इंटरनेटवर एका चोराच्या फजितीचा मजेशीर व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात त्याची वाईटरित्या फजिती झाल्याचे दिसून येते. तो चोरी करायला आला खरा पण आपण रचलेल्या डावात तो स्वत:च अडकला. शेवटी ज्याच्या घरी तो चोरी करायला गेला त्यांनाच चोराला या परिस्थितीतून बाहेर काढावं लागलं. चोराच्या फजितीचा हा मजेदार व्हिडिओ आता सोशल मिडियावर चांगलाच शेअर केला जात असून लोक यातील दृश्ये पाहून पोट धरुन हसत आहेत. चला नक्की काय घडलं याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
06 Jan 2026 03:20 PM (IST)
हातकणंगले : सोशल मीडियावरील मैत्री आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि हातकणंगले शहरातील 14 वर्षीय अल्पवयीन युवती थेट आपल्या रायबरेली उत्तर प्रदेश येथील मित्राकडे जायाला निघाली. या घटनेने हातकणंगले शहरात सोमवारी सकाळी चांगलीच खळबळ उडाली. हातकणंगले येथे पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या एका मध्यमवर्गीय कुटुंबातील 14 वर्षीय अल्पवयीन युवती शहरातीलच एका शाळेमध्ये शिक्षण घेते.
06 Jan 2026 03:20 PM (IST)
मुंबई पोलिसांनी बॉलीवूडमधील प्रसिद्ध सेलिब्रिटी आणि क्रिकेटपटूंची बनावट ओळख निर्माण करून कंपन्यांना फसवणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यामध्ये अथिया शेट्टी, अर्शद वारसी आणि क्रिकेटर केएल राहुल या तिघांचे नाव समोर आले आहे. या प्रकरणात कारवाई करत पोलिसांनी तिघांवर भारतीय दंड संहितेच्या अनेक कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे आणि या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
06 Jan 2026 03:10 PM (IST)
हातकणंगले : सोशल मीडियावरील मैत्री आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि हातकणंगले शहरातील 14 वर्षीय अल्पवयीन युवती थेट आपल्या रायबरेली उत्तर प्रदेश येथील मित्राकडे जायाला निघाली. या घटनेने हातकणंगले शहरात सोमवारी सकाळी चांगलीच खळबळ उडाली. हातकणंगले येथे पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या एका मध्यमवर्गीय कुटुंबातील 14 वर्षीय अल्पवयीन युवती शहरातीलच एका शाळेमध्ये शिक्षण घेते.
06 Jan 2026 03:04 PM (IST)
मार्तंड मल्हारी, भैरोबा आणि ज्योतिबा हे शंकराचा अवतार असलेली महाराष्ट्रातील देवस्थानं प्रसिद्ध आहेत. अनेक कुटुंबांचं हे कुलदैवत असल्याने यांचं महात्म्य तसं प्रचलित आहे. मात्र या सगळ्यात असं एक देवस्थान आहे ज्याचं सत्व अजूनही आहे मात्र काळाच्या ओघात हे देवस्थान दुर्लक्षित झालं, कोणतं आहे हे मंदिर चला तर मग जाणून घेऊयात.
या मंदिरातील शिवपिंडीबरोबर आणखी एक दुर्मिळ प्रतीमा भाविकांचं लक्ष वेधून घेते. ती म्हणजे अग्नीवृषाची.पंचमहाभूतांना हिंदू धर्मात मोठं महत्व आहे. या पंचतत्वांपैरकी एक म्हणजे अग्नीतत्व. पुराणातील वेद आपल्याला माहित आहेतच त्यातील एक ऋग्वेद. ऋग्वेदामध्ये केलेलं अग्नीदेवतेचं वर्णन वैदिक साहित्य, या सगळ्याचा हा एक उत्तम नमुना आहे. या मंदिरातील खास आकर्षण म्हणजे अग्नीवृष किंवा अग्निवृषभाची प्रतिमा. या अत्यंत दुर्मिळ अशा प्रतीमा आहेत.
06 Jan 2026 02:59 PM (IST)
Simple Energy 400 km range scooter In Marathi : इंधनाचे वाढते दर आणि प्रदूषणामुळे अनेकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढत आहे. सध्या बाजारात विविध फीचर्स असलेल्या इलेक्ट्रिक स्कूटर्स, कार्स पाहायला मिळत आहे. यामध्ये काही वाहनांमध्ये खास तंत्रज्ञानाचा वापर केला गेला आहे. दरम्यान सिंपल एनर्जीने त्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटरचे नवीन पिढीचे मॉडेल, सिंपल वन जेन २, भारतात लाँच केले आहे. त्याची सुरुवातीची किंमत ₹१.३९ लाख (प्रारंभिक, एक्स-शोरूम) आहे. नवीन सिंपल वन जेन २ मध्ये अधिक आकर्षक डिझाइन आणि नवीन बॉडी ग्राफिक्स आहेत. ही स्कूटर तीन नवीन रंग पर्यायांमध्ये उपलब्ध असून यामध्ये सोनिक रेड, एरो एक्स आणि अॅस्फाल्ट एक्स याचा समावेश आहे.कंपनी तिच्या सर्व स्कूटरवर बॅटरी आणि मोटरवर आजीवन वॉरंटी देखील देत आहे. ही स्कूटर ओला आणि एथरच्या लांब पल्ल्याच्या स्कूटरशी स्पर्धा करेल.
06 Jan 2026 02:55 PM (IST)
ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला रणधुमाळीत कोथरुड विधानसभा मतदारसंघात शिवसेना गटाला सुरूंग लागला आहे. प्रभाग क्रमांक ९ आणि ११ मधील ठाकरे गटाच्या अधिकृत आणि बंडखोर उमेदवारांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत या उमेदवारांनी पक्षप्रवेश केल्याची माहिती आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला हा मोठा धक्का असला तरी भाजपची मात्र ताकद वाढली आहे.
06 Jan 2026 02:50 PM (IST)
स्टीव्ह स्मिथ, अॅशेसमध्ये सर्वाधिक शतके करणारा दुसरा फलंदाज : अॅशेस मालिकेचा शेवटचा सामना सध्या सुरू आहे. या मालिकेमध्ये आतापर्यत ऑस्ट्रेलियाचा दबदबा पाहायला मिळाला. ऑस्ट्रेलियाने या मालिकेमध्ये तिसऱ्या सामन्यामध्येच विजय मिळवला होता पण त्यानंतर चौथ्या सामन्यामध्ये इंग्लडने मालिकेमध्ये एक सामना नावावर केला. पाचवा सामना हा सिडनीमध्ये खेळवला जात आहे. हा सामना हाय स्कोरींग सामना झाला. यामध्ये फलंदाजांची चांगली बॅट चालली.
06 Jan 2026 02:45 PM (IST)
दोन वेळा ऑलिंपिक पदक विजेता भालाफेक स्टार नीरज चोप्रा यांनी जेएसडब्ल्यू स्पोर्ट्सशी दशकांपूर्वीचे संबंध तोडले आहेत आणि आता तो स्वतःची अॅथलीट मॅनेजमेंट फर्म, वेल स्पोर्ट्स सुरू करणार आहे. चोपडा २०१६ मध्ये जेएसडब्ल्यू स्पोर्ट्समध्ये सामील झाले. २७ वर्षीय चोप्रा यांनी एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, गेल्या दशकातील आमचा प्रवास वाढ, विश्वास आणि कामगिरीने भरलेला आहे. जेएसडब्ल्यू स्पोर्ट्सने माझ्या कारकिर्दीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे आणि त्यांच्या पाठिंब्यासाठी आणि दृष्टिकोनासाठी मी नेहमीच आभारी राहीन. हा अध्याय संपवत असताना, मी माझ्या प्रवासाच्या पुढील टप्प्यात तीच मूल्ये घेऊन जात आहे.
06 Jan 2026 02:34 PM (IST)
मुंबई पोलिसांनी बॉलीवूडमधील प्रसिद्ध सेलिब्रिटी आणि क्रिकेटपटूंची बनावट ओळख निर्माण करून कंपन्यांना फसवणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यामध्ये अथिया शेट्टी, अर्शद वारसी आणि क्रिकेटर केएल राहुल या तिघांचे नाव समोर आले आहे. या प्रकरणात कारवाई करत पोलिसांनी तिघांवर भारतीय दंड संहितेच्या अनेक कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे आणि या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
06 Jan 2026 02:21 PM (IST)
चीन स्मार्टफोन कंपनी Oppo ने एक नवीन आणि पावरफुल स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने लाँच केलेल्या या लेटेस्ट स्मार्टफोनमध्ये अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. कंपनीने हा स्मार्टफोन Oppo A6 Pro 5G या नावाने लाँच केला आहे. कंपनीने लाँच केलेला हा स्मार्टफोन या लाईनअपमधील लेटेस्ट एडिशन आहे. फोनमध्ये पावरफुल 7,000mAh बॅटरी देण्यात आली आहे. ज्यामुळे यूजर्सना सतत स्मार्टफोन चार्ज करावा लागणार नाही. कंपनीने दावा केला आहे की, Oppo A6 Pro 5G स्मार्टफोन 40 दिवसांपर्यंत स्टँडबाय टाईम ऑफर करतो.
06 Jan 2026 02:17 PM (IST)
विजय हजारे ट्रॉफीचे सामने सध्या सुरू आहेत. सोशल मिडियावर सध्या अनेक खेळाडूंनी कमालीची कामगिरी केली आहे. आयपीएलमध्ये देशांतर्गत सामन्यामधील कामगिरी पाहून लिलावामध्ये पैशांचा पाऊस पाडला होता. लवकरच आयपीएलचा नवा सिझन येणार आहे यामध्ये अनेक नवे युवा खेळाडू खेळताना दिसणार आहेत. २१ वर्षीय फलंदाजाने २०२५-२६ च्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये धुमाकूळ घातला.
06 Jan 2026 02:12 PM (IST)
मराठी मनोरंजनसृष्टीत मानधनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अभिनेता शशांक केतकर याने त्याच्याबाबतीत झालेल्या अन्यायाची वाचा फोडली आहे. शशांकने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. मालिका संपून पाच वर्षे झाली तरी मंदार देवस्थळींनी पाच लाख रूपये दिले नाहीत. गेल्या पाच वर्षापासून शशांक या गोष्टीचा पाठपुरावा करत असल्याचे पुरावेही त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. गेल्या कित्येक वर्षापासून मंदार देवस्थळी कारणं देत असून आज, उद्या पैसे देतो हेच सांगत आला आहे असं स्पष्ट शशांक केतकरने सांगितले.
06 Jan 2026 02:05 PM (IST)
अभिनेता अर्जुन बिजलानीच्या सासऱ्याचे अलिकडेच निधन झाले, ज्यामुळे कुटुंब शोकाकुल झाले. २०२६ ची सुरुवातच अर्जुन बिजलानी आणि त्यांची पत्नी नेहा यांच्यासाठी दुःखद गेला आहे. अर्जुन आपल्या सासऱ्यांच्या बिघडत्या तब्येतीची बातमी कळताच दुबईहुन घरी परतला. वडिलांच्या निधनाने नेहा निराश झाली आणि अर्जुन बिजलानी देखील निराश झाला. आता, त्याने आपल्या सासऱ्यांच्या आठवणीत एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. अर्जुनने आपल्या सासऱ्यांना वचन दिले आहे की तो त्यांच्या मुलीची आणि नातवाची काळजी घेईल आणि त्यांनी काळजी करू नये.
06 Jan 2026 01:55 PM (IST)
राज्यभरात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे, प्रचारसभांचा धडाका सुरू आहे, राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरीमुळे दिवसेंदिवस वातावरण तापू लागले आहे. मुंबईत ठाकरे बंधू विरूद्ध महायुती अशी लढत पाहायला मिळणार आहे. या सगळ्यात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी दोन व्यक्तींना बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी लाथा-बुक्क्यांनीसह पक्षाच्या झेंड्यांनीही मारहाण केल्याचा व्हिडीओ सध्या सगळीकडे व्हायरल होत आहे. मारहाण करणाऱ्या शिंदे गटाच्या ८-१० कार्यकर्त्यांच्या विरोधात मध्यरात्री HMB पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
06 Jan 2026 01:45 PM (IST)
महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू होताच प्रचारात विकासाचा अजेंडा मागे पडत चालला असून प्रचाराची दिशा थेट व्यक्तिगत पातळीवरील टीकेकडे वळल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे. शहराच्या भविष्यासंदर्भातील धोरणात्मक चर्चा, मूलभूत सुविधांचे आराखडे आणि नागरी विकासाचे मुद्दे बाजूला सारून राष्ट्रीय पक्षांचे नेतेमंडळी एकमेकांची उणीदुणी काढण्यातच अधिक धन्यता मानताना दिसत आहेत. त्यामुळे प्रचाराची पातळी घसरली की काय, असा सवाल सुरुवातीलाच मतदारांमधून उपस्थित केला जात आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवार पायाला भिंगरी लावून आपापल्या प्रभागांमध्ये प्रचार करत आहेत.
06 Jan 2026 01:35 PM (IST)
सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षण व्यवस्थेबाबत सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमधील (ईडब्ल्यूएस) उमेदवार जे सामान्य श्रेणीच्या कट-ऑफपेक्षा जास्त गुण मिळवतात ते सामान्य श्रेणीच्या जागांवर सरकारी नोकऱ्यांसाठी पात्र असतील. या निर्णयाचे भारतातील सरकारी नोकऱ्या आणि सरकारी शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशासाठी दूरगामी परिणाम होतील. सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय आरक्षण श्रेणीत येणाऱ्या गुणवंत उमेदवारांसाठी एक मोठा विजय मानला जात आहे.
06 Jan 2026 01:25 PM (IST)
मुंबई महानगरपालिका (BMC Election 2026) निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (MNS) मोठा धक्का बसला आहे. राज ठाकरे यांचे जवळचे विश्वासू आणि मनसेचे वरिष्ठ नेते संतोष धुरी यांनी मनसेचे साथ सोडण्याचा निर्णय घेतला असून आता भाजपमध्ये सामील होत आहेत.संतोष धुरी हे मुंबई शहर मनसे प्रमुख संदीप देशपांडे यांचे जवळचे विश्वासू मानले जात होते. आज (6 जानेवारी 2026) दुपारी १ वाजता औपचारिकपणे भाजपमध्ये सामील होतील, जिथे त्यांचे स्वागत भाजप नेते अमित साटम करतील. ही घटना मनसेसाठी एक मोठा धक्का आहे, कारण १५ जानेवारी रोजी बीएमसी निवडणुका होणार आहेत आणि त्याचा थेट परिणाम युतीच्या रणनीतीवर होऊ शकतो.
06 Jan 2026 01:15 PM (IST)
फूड डिलीव्हरी प्लॅटफॉर्म Zomato चे को-फाउंडर दीपिंदर गोयल यांचा एक पॉडकास्ट सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. खरं तर या पॉडकास्टमध्ये दीपिंदर गोयल यांच्याकडे एक अनोखं गॅझेट पाहायला मिळालं. हे गॅझेट नक्की काय आहे, त्याचा वापर कसा केला जाऊ शकतो, याबाबत आता बरीच चर्चा सुरु झाली आहे. यूट्यूबर राज शमानी यांनी आपल्या पॉडकास्टमध्ये दीपिंदर गोयल यांनी आमंत्रित केलं होतं. आता हा व्हिडीओ युट्यूबवर शेअर करण्यात आला आहे. यावेळी दीपिंदर गोयल यांच्या कान आणि डोळ्यांच्या मध्ये एक अनोखं गॅझेट पाहायला मिळालं. या गॅझेटबाबत आता सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे.
06 Jan 2026 01:10 PM (IST)
पुण्याचे माजी खासदार आणि कॅंाग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश कलमाडी यांचे आज दुःखद निधन झाले. ना. पाटील यांनी आज सुरेश कलमाडी यांच्या कोथरुड येथील निवासस्थानी अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली. पुण्याच्या सामाजिक आणि सार्वजनिक जडणघडणीत सुरेश कलमाडी यांचे योगदान महत्त्वाचे होते. ‘पुणे फेस्टिव्हल’च्या माध्यमातून पुण्याच्या सांस्कृतिक वैभवात त्यांनी भर घातली. तसेच, बालेवाडी क्रीडा संकुलाच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्रासाठी भरीव योगदान दिले. त्यांच्या निधनाने सामाजिक आणि सांस्कृतिक जडणघडणीतील दूरदर्शी व्यक्तिमत्व हरपले, अशा शब्दांत ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी श्रद्धांजली वाहिली. दरम्यान, भारतीय जनता पक्ष पुणे शहराच्या वतीने शहर कार्यालयात सुरेश कलमाडी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांच्यासह भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

06 Jan 2026 01:00 PM (IST)
मुंबई- अमरावती या विमानसेवेच्या वेळापत्रकात पु्न्हा एकदा बदल होणार आहे. ही विमानसेवा आठवड्यातून चार दिवस सुरु असणार आहे.घनदाट धुक्याच्या समस्येमुळे १ ते १५ डिसेंबर या कालावधीत ही विमानसेवा बंद ठेवण्यात आली होती.
06 Jan 2026 12:50 PM (IST)
लातूरच्या जवाहर नवोदय विद्यालयात सहावीतील हुशार विद्यार्थिनीचा वसतिगृहात मृत्यू आढळला. मृत्यू आत्महत्येचा की घातपाताचा, याबाबत संशय असून नातेवाईकांनी आरोप केल्याने पोलीस सखोल तपास करत आहेत.
06 Jan 2026 12:40 PM (IST)
बुलढाणा–छत्रपती संभाजीनगर महामार्गावर धाड गावाजवळ एसटी बस व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर नांदुरा–बुऱ्हाणपूर मार्गावर टॅक्सी पलटी होऊन 10 जण जखमी झाले.
06 Jan 2026 12:30 PM (IST)
नांदेडमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका ६० वर्षीय नराधमाकडून ८ वर्षाच्या चिमुकलीचा विनयभंग केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
06 Jan 2026 12:26 PM (IST)
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया (पीटीआय)च्या वृत्तानुसार, मंगळवारी सकाळी त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. सोनिया गांधी गेल्या काही काळापासून आजारी असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या डॉक्टरांचे एक विशेष पथक त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
06 Jan 2026 12:25 PM (IST)
इराणचे माजी राजकुमार रेझा पहलवी यांनी एक खळबळजनक विधान केले आहे. त्यांनी जनतेला आवाहन केले आहे की, खामेनी सरकार कमकुवत असनू त्याचा अंत करण्याची गरज आहे. हे बाह्य हस्तक्षेपाशिवाय होऊ शकते.
06 Jan 2026 12:20 PM (IST)
सोलापूरच्या 20 वर्षीय स्नेहा बनसोडेचा अक्कलकोटमध्ये प्रियकर आदित्य चव्हाणने गळा चिरून खून केला. घटनेनंतर आरोपीने स्वतःवरही वार केले. प्रेमसंबंधातून हा प्रकार घडल्याचा संशय असून आरोपीवर उपचार सुरू आहेत.
06 Jan 2026 12:15 PM (IST)
Honor Power 2 Launched: कंपनीने लाँच केलेल्या नव्या स्मार्टफोनमध्ये मोठी बॅटरी, AMOLED डिस्प्ले आणि मीडियाटेकचा लेटेस्ट प्रोसेसर देण्यात आला आहे. या स्मार्टफोनचा लूक प्रिमियम आयफोनसारखाच आहे. याचे फीचर्स देखील कमाल आहेत.
06 Jan 2026 12:10 PM (IST)
नाशिकच्या नांदगाव तालुक्यात दारूच्या व्यसनातून निर्माण झालेल्या वादातून मुलानेच जन्मदात्या वडिलांचा लोखंडी पाईपने झोपेत निर्घृण खून केला. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून तो पोलिसांच्या ताब्यात आहे.
06 Jan 2026 12:05 PM (IST)
भाजप नेते नवनीत राणा यांच्या चार मुले असल्याच्या विधानावर असदुद्दीन ओवैसी यांनी टीका केली. ओवैसी यांनी आरएसएस प्रमुख मोहन भागवत आणि चंद्राबाबू नायडू यांच्या अधिक मुले असल्याच्या विधानांवरही निशाणा साधला.प्रचारसभेत बोलताना ओवेसी म्हणाले, ‘मोहन भागवत म्हणतात दोनपेक्षा जास्त मुले जन्माला घाला, राणा म्हणतात, चार मुले जन्माला घाला. मी सांगतो, तुम्ही चार नाही तर आठ मुले जन्माला घाला, आम्हाला त्याचं काही देणघेण नाही.
06 Jan 2026 12:02 PM (IST)
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लातूरमध्ये माजी मुख्यमंत्री आणि दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्याबाबत वक्तव्य केले. विलासराव देशमुख यांच्या आठवणी आता पुसल्या जातील असे वक्तव्य रवींद्र चव्हाण यांनी केल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. कॉंग्रेस नेत्यांनी जोरदार हल्लाबोल केला असून टीका केली आहे.
06 Jan 2026 11:55 AM (IST)
अमरावती महापालिका निवडणुकीत चुरस वाढली आहे. भाजप आणि रवी राणा यांच्या युवा स्वाभिमानी पक्षातच जुंपली आहे. राणा यांनी 32 जागांवर उमेदवार उभे करून भाजपच्या तोंडचं पाणी पळवलं आहे. बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्याला टोला लगावला आहे. ते म्हणाले की, निवडणुकीत रवी राणा यांच्या विरोधात भाजपचे तुषार भारतीय उभे होते त्याचा डाव पत्नी म्हणून नवनीत राणा काढत आहेत. नवनीत राणा जरी भाजपच्या असल्या तरी त्यांच्यासाठी पती महत्त्वाचा आहे. पतिव्रता काय असली पाहिजे नवनीत राणा यांनी पुन्हा स्पष्ट केलं आहे. माझ्या पतीच्या विरोधात तुम्ही लढाल तर हिंदू शेरनी भाजपच्या विरोधातील लढायला तयार आहे हे नवनीत राणा यांनी दाखवून दिले. मला नवनीत राणा आणि रवी राणा यांचं कौतुक कराव वाटतं. हिंदू शेरनी असताना नवनीत राणा यांनी भाजपच्या विरोधात दंड थोपटले आहे पत्नीचा धर्म त्या निभावत आहे. भाजप कसा आमच्या खिशात आहे जे रवी राणा यांनी सिद्ध केलं आहे, असा टोला त्यांनी भाजपला लगावला.
06 Jan 2026 11:45 AM (IST)
मनसे नेत्याचे निष्ठावंत आणि राज ठाकरे यांचे निकटवर्तीय संतोष धुरी यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. संतोष धुरी हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. याबाबत प्रतिक्रिया देताना धुरी म्हणाले की, नक्कीच हे खरे आहे की मनसेमध्ये माझी कदर केली गेली नाही. याबाबत मी दुपारी सविस्तर बोलेल. पण मनसेमधून माझ्याशी कोणीही संपर्क साधला नाही, अशी खदखद संतोष धुरी यांनी व्यक्त केली आहे.
06 Jan 2026 11:25 AM (IST)
बोरिवली आणि कांदिवली स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. यामुळे मंगळवार आणि बुधवारी २१५ लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून प्रवाशांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.






