फोटो सौजन्य: iStock
सध्या अनेक गोष्टींवर सामान्य नागरिक कर भरताना दिसत आहे. यातीलच एक गोष्ट म्हणजे कार. आपल्या प्रत्येकाचे स्वप्न असते की आपली एखादी कार असावी. पण अनेकदा ज्यांना नवीन कार घेणे परवडत नाही. त्यामुळे कित्येक जण सेकंड हँड कार विकत घेतात. पण आता जुनी कार विकत घेणे अधिकच महाग होऊन बसणार आहे. याचे कारण म्हणजे जुन्या कारवरील वाढलेला जीएसटी.
21 डिसेंबर रोजी राजस्थानमधील जैसलमेर येथे 55 वी जीएसटी कौन्सिलची बैठक झाली. तेव्हापासून कॅरामलाइज्ड पॉपकॉर्नवरील वाढीव कर, जुन्या आणि वापरलेल्या वाहनांवर 18% जीएसटी यावर लोकांच्या प्रतिक्रिया दिसून येत आहेत. जीएसटी कौन्सिलने इलेक्ट्रिक कारसह सर्व जुन्या आणि वापरलेल्या वाहनांवर 18% जीएसटी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी वेगवेगळे दर आकारले जात होते. तेव्हापासून ते प्रसारमाध्यमांचे केंद्रबिंदू ठरले आहे. जुन्या गाड्यांवर जीएसटी लागू करण्याची ही घोषणा अनेकांना समजलेली नाही. त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड संभ्रम निर्माण झाला आहे.
नवीन Skoda Superb भारतात मारणार एंट्री, Bharat Mobility Global Expo 2025 मध्ये होणार सादर
जुन्या कारवर म्हणजेच सेकंड हँड कारवर किती जीएसटी लावला जातो. याचा फटका कोणाला बसणार? त्याच वेळी, लोकांना कार विकण्यावर सुद्धा जीएसटी भरावा लागेल का? किंवा कार तोट्यात विकली गेली तरी त्यांना कर भरावा लागेल. त्याच वेळी, जुन्या गाड्यांवर लादलेले नवीन जीएसटी नियम कोणाला लागू होतील? असे प्रश्न लोकांच्या मनात निर्माण होत आहेत. हे पाहता, वापरलेल्या कार्सवर लावण्यात आलेल्या नवीन जीएसटी नियमाबाबतचा हा संभ्रम आज आपण सोप्या भाषेत दूर करण्याचा प्रयत्न करूयात.
जीएसटी कौन्सिलच्या बैठकीनंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले होते की, वापरलेल्या आणि जुन्या गाड्यांवरील जीएसटी 12 टक्क्यांवरून 18 टक्के करण्यात आला आहे. यामध्ये 1200cc किंवा त्याहून अधिक क्षमतेच्या कार, 4000cc किंवा त्याहून अधिक लांबीची, पेट्रोल आणि डिझेल वाहने आणि 1500cc किंवा त्याहून अधिक इंजिन क्षमता असलेल्या गाड्यांचा समावेश आहे. ईव्ही आणि इतर वाहनांवरही हे नवे नियम लागू करण्यात आले आहेत.
लवकरच लाँच होईल Maruti e-Vitara, जाणून घ्या किमंत आणि अॅडव्हान्स फीचर्स
जुन्या वाहनांच्या विक्रीवरील जीएसटीच्या नव्या नियमाचा सर्वसामान्यांवर काय परिणाम होणार हा सर्वात मोठा प्रश्न उपस्थित सामन्यांकडून उपस्थित केला जात आहे. जीएसटीमध्ये झालेली वाढ फक्त जुन्या गाड्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठीच लागू होतील. याचा सरळ अर्थ असा आहे की जर एखाद्या सामान्य नागरिकाने त्याची वापरलेली कार किंवा जुनी कार विकले तर त्यावर कोणताही जीएसटी (वापरलेले कार मार्जिन टॅक्स) लागू होणार नाही. 18% चा GST फक्त GST नोंदणीकृत व्यावसायिक हेतूने विक्री करणाऱ्या लोकांवर लागू होईल.
समजा एखाद्या व्यक्तीने 5 लाख रुपयांची कार खरेदी केली आणि तिची देखभाल चांगली केली. यानंतर त्याने ती ग्राहकाला 6 लाख रुपयांना विकली, तर त्याला त्या कारवर 1 लाख रुपयांचा नफा होईल. अशा परिस्थितीत, त्याला 1 लाख रुपयांवर 18% जीएसटी भरावा लागेल, संपूर्ण 6 लाख रुपयांवर नाही. जर त्याने 5 लाख रुपयांची कार खरेदी केली आणि ती 4 लाख रुपयांना विकली. तर या व्यव्हारामध्ये त्यांचे एक लाख रुपयांचे नुकसान होणार आहे. ज्यावर त्याला कोणताही जीएसटी भरावा लागणार नाही.