जर यंदा कार घेण्याचा विचार केलाच असेल तर बजेट बनवताना लक्षात ठेवा या गोष्टी
सणासुदीचा काळ हा एक असा काळ असतो जेव्हा आपण आपल्या प्रियजनांना भेटतो. त्यांना सणाच्या शुभेच्छा देतो. काही जण या शुभ काळात नवी सुरुवात करत असतात. तर काही आपली ड्रीम कार विकत घेतात. अनेक ऑटो कंपनीज सुद्धा या काळात आपल्या कार्सवर आकर्षक सूट देत असतात. त्याचबरोबर या ऑफर्स पाहून अनेकजण नवीन कार खरेदी करतात, पण कार खरेदी करणे म्हणजे कार शोरूममधून बाहेर काढणे नव्हे. कारचा मालक होण्याबरोबरच अनेक जबाबदाऱ्याही येतात. त्यामुळे कार खरेदी करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.
भारतासारख्या देशात आजही कित्येक जण कार घेताना एक बजेट तयार करत असतात. अहो एवढेच काय, तर अनेक जण महिन्याच्या जमा खर्चाची नोंद सुद्धा ठेवत असतात. अशावेळी जर तुम्ही कार घेण्याचा विचार करत असाल तर पुढील 5 मुद्द्यांचा नक्की विचार करा.
हे देखील वाचा: कावासाकीकडून ‘या’ बाईकचे नवे एडिशन लॉंच, रॉयल एनफील्डशी होणार जोरदार टक्कर
नवीन कारला नेहमीच सर्व्हिसिंग करावे लागते, जे तिच्या संपूर्ण परफॉर्मन्ससाठी खूप महत्वाचे असते. या सर्व्हिसिंगचा खर्च कारचे मॉडेल आणि कंपनीच्यानुसार वेगवेगळा असतो. जशी कार जुनी होत जाते तसे कारचे पार्टस खराब होण्यास सुरुवात होते. ज्यामुळे तुमचा खर्च वाढू शकतो.
नेहमी कारची सर्व्हिसिंग करताना ती अधिकृत सर्व्हिस सेंटर मधूनच करा. हे तुम्हाला थोडे महाग वाटू शकते, पण यामुळे तुम्हाला तुमची कार उत्तमप्रकारे सर्व्हिस झाली आहे याची हमी सुद्धा मिळेल.
हे देखील वाचा: EV पॉलिसीची टेस्लाला अडचण? काय आहे EV पॉलिसी? जाणून घ्या
कार चालते ते तिच्या आतील असणाऱ्या उत्तम पार्टसमुळे, जे कधी ना कधी खराब होणारच. या खराब झालेल्या पार्टसला दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला अधिक पैसे मोजावे लागू शकतात.
तुम्ही कुठल्या ठिकाणी राहतात याचा सुद्धा विचार कार घेताना करणे खूप महत्वाचे आहे. जर तुमच्या एरियातील रस्ते खराब असतील तर याचा कारच्या परफॉर्मन्सवर परिणाम होऊ शकतो.
नवीन असो की जुनी दोन्ही कारचा विमा असणे फार महत्वाचे आहे. जर तुमच्या कारचा अपघात झाला तर अशावेळी कारचा विमा तुमच्या नुकसानाची भरपाई करून देतो. तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार वेगवेगळे विमा ऑप्शन निवडू शकता.






