फोटो सौजन्य- iStock
सणासुदीच्या काळामध्ये प्रत्येक कार उत्पादक कंपन्याकडून ग्राहकांसाठी उत्तमोउत्तम ऑफर्स दिल्या जात आहेत. महिंद्रा कंपनीने त्यांच्या कारवर जबरदस्त सवलतीची ऑफर उपलब्ध करुन दिली आहे. कंपनीने मर्यादित कालावधीच्या ऑफरचा भाग म्हणून या काळात महिंद्रा थारवर 1.6 लाख रुपयांपर्यंतच्या सवलतीच्या ऑफरची घोषणा केली आहे. रेट्रो-स्टाईल ऑफ-रोडर एडिशन कारवर डीलर्सच्या सवलतींसोबत, ग्राहकांना 25,000 रुपयांची मोफत महिंद्रा ऍक्सेसरी किट देखील मिळू शकते.

फोटो सौजन्य- सोशल मीडिया
महिंद्रा थार एडिशन्स आणि सवलत (Mahindra Thar)
थार अर्थ या एडिशनवर सर्वाधिक 1.6 लाख रुपयांची सूट देण्यात आली आहे. थारच्या AX आणि LX लाइन-अपला 1.3 लाख रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्स अशा दोन्ही पर्यायांसाठी ही सूट उपलब्ध आहे. हार्डटॉपसह X डिझेल-मॅन्युअल 2WD लाही सवलत उपलब्ध केली आहे. हार्डटॉपसह थार LX पेट्रोल-ऑटोमॅटिक 2WD आणि हार्डटॉपसह LX डिझेल-मॅन्युअल 2WD वर 1.25 लाख रुपयांच्या श्रेणीत सूट मिळते.
महिंद्रा थार अर्थ आवृत्ती (Mahindra Thar earth )
महिंद्रा थार अर्थ ही एडिशन 4WD सह येते. ही कार पेट्रोल आणि डिझेल इंजिन पर्यायांसह उपलब्ध आहे. ही कार मॅन्युअल किंवा ऑटोमॅटिक ट्रांसमिशन पर्यायांसह खरेदी केले जाऊ शकते. थार अर्थ एडिशन ही एका खास मॅट शेडमध्ये आहे ज्यास कंपनी ‘डेझर्ट फ्युरी’ म्हणते आणि बी-पिलर आणि मागील फेंडर्सवर विशेष ‘अर्थ एडिशन’ बॅज देखील मिळतात. यात बेज आणि काळ्या रंगात तयार केलेल्या लेदरेट अपहोल्स्ट्रीसह आतील भागात ड्युअल-टोन शेड आहे.डेसर्ट-प्रेरित थीममध्ये रेखा कला आहे जी हेडरेस्टवरील ढिगाऱ्यांच्या आकाराची प्रतिकृती बनवते. स्टीयरिंग व्हीलवरील महिंद्राचा लोगो, कपहोल्डर्स, गियर नॉब आणि गियर कन्सोल सारख्या घटकांवर गडद क्रोम फिनिश देखील पाहिले जाऊ शकते.
महिंद्रा थार अर्थची किंमत (Mahindra Thar earth )
महिद्रा थार अर्थच्या कारची एक्स शो रुम किंमत ही 15 लाख 40 हजार रुपये आहे. त्यामुळे ग्राहकांसाठी ही लोकप्रिय कार सवलतीमध्ये उपलब्ध असल्याने खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे. मागील दोन महिन्यात थारच्या दोन मॉडेल महिंद्रानेे लॉंच केल्या आहेत. ज्याला ग्राहकांकडून प्रचंड प्रतिसादही मिळत आहे.






