Hero MotoCorp कडून 'शुभ मुहूरत आया, हिरो साथ लाया' नावाची फेस्टिव्ह कॅम्पेन लाँच
हिरो मोटोकॉर्प या जगातील मोटरसायकल्स व स्कूटर्सच्या सर्वात मोठ्या उत्पादक कंपनीने नाविन्यपूर्ण फेस्टिव्ह कॅम्पेनची घोषणा केली आहे, जी भारतातील सणासुदीच्या काळाच्या शुभारंभाला साजरे करते आणि देशाचा संपन्न वारसा व परंपरांचे प्रतीक दर्शविते.
‘शुभ मुहूरत आया, हिरो साथ लाया’ हिरो मोटोकॉर्पच्या ग्रँड इंडियन फेस्टिवल ऑफ ट्रस्टच्या तिसऱ्या पर्वाला सादर करते, जेथे ग्राहकांना त्यांची आवडती हिरो मोटोकॉर्प उत्पादने खरेदी करत सण साजरीकरणामध्ये अधिक उत्साहाची भर करण्याची उत्साहवर्धक संधी मिळते.
इंडस्ट्री-फर्स्ट दृष्टिकोनासह हिरो मोटोकॉर्प उल्लेखनीय जेन-एआय कॅम्पेन ‘शुभ मुहुर्त साथी’ लाँच करत आहे, ज्यामध्ये युथ आयकॉन्स व कलाकार दिव्येंदू शर्मा आणि हंसिका मोटवानी आहेत. उत्साहवर्धक एआय फीचरच्या माध्यमातून सेलिब्रिटीज वैयक्तिकृत व्हिडिओ संदेशामध्ये पाहायला मिळतील, जेथे ते त्यांच्या खरेदी प्रवासाद्वारे दोन दशलक्षहून अधिक ग्राहकांना मार्गदर्शन करतील. ही जाहिरात इंग्रजी, हिंदी, बंगाली, तमिळ, कन्नड आणि इतर अनेक भाषांमध्ये सादर केली जाईल.
या उत्साहामध्ये अधिक भर करत हिरो मोटोकॉर्पने दोन नवीन ब्रँड जाहिराती लाँच केल्या आहेत, एका जाहिरातीमध्ये राम चरण ग्लॅमर ओजीबाबत मार्गदर्शन करेल आणि एक्स्ट्रीम कमर्शियलमध्ये क्रिकेट आयकॉन विराट कोहली आहे, जेथे स्टायलिश एक्स्ट्रीम १२५आर व एक्स्ट्रीम १६०आर पाहायला मिळतील.






