मुंबई : भारतातील नंबर वन युरोपियन ब्रँड, रेनोने (Renault) 50,000 वी रेनो कायगर (Renault Kiger) चेन्नईतील प्लांटमधून (Chennai Plant) बाजारात आणली आहे. रेनो कायगरचे यश वाढविण्याच्या आपल्या बांधिलकीवर ठाम राहून हा महत्वाचा टप्पा साजरा करण्यासाठी रेनो इंडियाने रेनो कायगर श्रेणीत एक नवीन स्टेल्थ ब्लॅक (New Stealth Black colour) बाह्य रंग सादर केला आहे.
रेनो इंडिया ऑपरेशन्सचे कंट्री सी.ई.ओ आणि मॅनेजिंग डायरेक्टर, वेंकटराम मामिलापल्ले यांच्या मते, “रेनो कायगरला आपल्या ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणात स्वीकृती मिळाली आहे त्याच्या खास डिझाइन, स्मार्ट फीचर्स, लीडिंग सेफ्टी, क्वालिटी आणि परफॉर्मन्सच्या बाबतीत जोमदार मूल्य प्रस्ताव प्रदान केल्यामुळे. भारतातील सर्वात स्पर्धात्मक कॉम्पॅक्ट एस.यू.व्ही सेगमेंटमध्ये तिने आपले कौशल्य सिद्ध केले आहे आणि महामारी व सध्या चालू असलेल्या सेमीकंडक्टर संबंधित अरिष्टानंतर सुद्धा, 50,000 वा उत्पादनाचा महत्वाचा टप्पा या आव्हानात्मक विभागात रेनो कायगरच्या यशाचा अजून एक पुरावा आहे. भारतातील आमच्या प्रगतीत या स्पोर्टी, स्मार्ट आणि जबरदस्त एस.यू.व्ही ने महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे आणि रेनोच्या पहिल्या पाच जागतिक बाजारपेठांमध्ये भारताला स्थान देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. आम्हाला विश्वास आहे की रेनो कायगर ही ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळवत राहील आणि भारत व परदेशात ब्रँडच्या वाढीस अजूनच बळकटी देईल.”
फ्रान्स आणि भारतातील डिझाइन टीम्स मधील सहकार्याचा परिणाम म्हणून रेनो कायगर ही अशी तिसरी जागतिक कार आहे जिला जागतिक पातळीवर सादर करण्याआधी प्रथम भारतात लॉन्च केले गेल होते. 2021 मध्ये भारतात यशस्वी पद्धतीने लाँच केल्यानंतर, सब-फोर मीटर बी-एस.यू.व्ही आता दक्षिण आफ्रिका, इंडोनेशिया, ईस्ट आफ्रिकन प्रदेश, (केनिया, मोझांबिक, झिम्बाब्वे, झांबिया) सेशेल्स, मॉरिशियस, नेपाळ, भूतान, बर्मुडा आणि ब्रुनेई येथे सुद्धा ग्राहकांना उपलब्ध आहे.
रेनोने अलीकडेच एम.वाय 22 आवृत्ती बाजारात आणून रेनो कायगरच्या मूल्य प्रस्तावात वाढ केलेली आहे. एम.टी आणि ईझी-आर ए.एम.टी ट्रान्समिशनमध्ये 1.0L एनर्जी इंजिन आणि एम.टी आणि एक्स-ट्रॉनिक सी.व्ही.टी ट्रान्समिशनमध्ये 1.0L टर्बो या दोन इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध असून रेनो कायगर वायरलेस स्मार्टफोन चार्ज आणि क्रूझ कंट्रोल फंक्शन्ससह ड्रायव्हिंगचा वाढीव अनुभव आणि आराम प्रदान करते.
रेनो कायगर एम.वाय 22 टर्बो श्रेणीत नवीन टेलगेट क्रोम इन्सर्ट, फ्रंट स्किड प्लेट, टर्बो डोअर डिकॅल्ससह रेड व्हील कॅप्ससह 40.64 सें.मी डायमंड कट अलॉय व्हील्स अशी वैशिष्ट्ये आहेत आणि ही बाह्य बाजूंना अधिक जबरदस्त आणि स्पोर्टी बनवतात. याव्यतिरिक्त, रेनो कायगर श्रेणी आता एक नवीन रंग – स्टील्थ ब्लॅक मध्ये उपलब्ध असेल आणि आर.एक्स.टी (0) आणि आर.एक्स.झेड व्हेरिएंट मध्ये दोन्ही इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध असणार आहे. रेनो कायगरमध्ये चार ड्युअल-टोन कॉम्बिनेशन्सच्या पर्यायासह सात आकर्षक रंग उपलब्ध करणारी प्रकारात- सर्वोत्कृष्ट (बेस्ट-इन-क्लास) कलर रेंज आहे.
रेनो कायगर ही कॉम्पॅक्ट एस.यू.व्ही सेगमेंटमध्ये सर्वात परवडण्याजोगी असून तिची देखभाल करणे किफायतशीर ठरते. रेनो कायगरला कॉम्पॅक्ट एस.यू.व्ही विभागात अनेक पुरस्कारांनी मान्यता मिळालेली आहे, ज्यामुळे भारतीय बाजारपेठेतील यशावर प्रकाश टाकण्यात आला आहे. जागतिक दर्जाच्या टर्बोचार्ज्ड 1.0लिटर पेट्रोल इंजिनद्वारे समर्थित, ही अधिक कार्यक्षमता आणि स्पोर्टी ड्राइव्ह तर प्रदान करतेच, पण त्यासोबतच तिच्यात 20.5 कि.मी/लिटर ची विभागातील-सर्वोत्कृष्ट (बेस्ट-इन-सेगमेंट) इंधन कार्यक्षमता सुद्धा आहे.
रेनो कायगर ही भारतीय बाजारपेठेसाठी सध्याच्या सर्व सुरक्षा आवश्यकतांचे पालन करून प्रवासी व पादचारी या दोघांचे संरक्षण करण्यासाठी त्यापलीकडे काळजी घेते. अलीकडेच, रेनो कायगरला ग्लोबल एन.सी.ए.पी या अग्रगण्य जागतिक कार मूल्यांकन कार्यक्रमाद्वारे ॲडल्ट ऑक्युपण्ट सेफ्टीसाठी 4-स्टार सेफ्टी रेटिंग देऊन सन्मानित करण्यात आले होते. ड्रायव्हर आणि पुढच्या प्रवाशाच्या सुरक्षिततेसाठी रेनो कायगर मध्ये चार एअरबॅग्ज आहेत – पुढे आणि बाजूला आणि त्यासोबत सीटबेल्ट्ससह प्री-टेन्शनर आणि लोड-लिमिटर (ड्रायव्हर प्रवाशासाठी) सुद्धा आहे. यात ई.बी.डी आणि रेयर पार्किंग सेन्सरसह ए.बी.एस सारखी अनेक सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत, जी रस्त्यावर वाहन चालवताना सुरक्षिततेची खात्री करतात. याव्यतिरिक्त, रेनो कायगरमध्ये इम्पॅक्ट सेन्सिंग डोअर अनलॉक, स्पीड सेंडिंग डोअर लॉक, ॲडजस्टेबल हेडरेस्टसह 60/40 स्प्लिट रेयर रो सीट आणि चाइल्ड सीटसाठी आयसोफिक्स अँकरेज सुद्धा आहे.






