किया सोनेटने ५ लाख युनिट्स विक्रीचा टप्पा गाठला
मुंबई : भारतीय बाजारपेठेत किआ सोनेटला मोठी मागणी आहे. कंपनीने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, या लोकप्रिय एसयूव्हीने भारतीय बाजारपेठेत ५,००,००० युनिट विक्रीचा टप्पा ओलांडला आहे. सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही विभागात ही किआची सर्वाधिक विक्री होणारी कार आहे आणि कंपनीच्या एकूण देशांतर्गत विक्रीपैकी तिचा वाटा अंदाजे ३५% आहे. सोनेट २०२० मध्ये लाँच करण्यात आली होती आणि तेव्हापासून भारतीय बाजारपेठेत तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे.
किया इंडिया या देशातील आघाडीच्या मास-प्रीमियम ऑटोमेकर कंपनीने आज आपली लोकप्रिय सबकॉम्पॅक्ट एसयूव्ही किया सोनेटसाठी महत्त्वपूर्ण टप्प्याची घोषणा केली. जेथे भारतातील बाजारपेठेत ५ लाख वेईकल युनिट्स विक्रीचा टप्पा पार केला आहे. यासह ब्रँडने भारतातील ग्राहकांमध्ये मिळवलेला दृढ विश्वास आणि स्वीकृती अधिक दृढ झाली आहे.
किया इंडियाचे चीफ सेल्स ऑफिसर सनहॅक पर्क यांनी सांगितले की, “सोनेटसाठी ५ लाख युनिट्स विक्रीचा टप्पा पार करणे किया इंडियामध्ये आम्हा सर्वांसाठी अभिमानास्पद क्षण आहे. विक्री करण्यात आलेल्या प्रत्येक सोनेटमधून कियावर विश्वास दाखवलेला ग्राहक दिसून येतो आणि भारतातील ग्राहकांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरला आहे. या प्रवासाने देशभरातील ग्राहकांशी संलग्न झालेली अर्थपूर्ण डिझाइन, प्रगत तंत्रज्ञान आणि विश्वासार्ह कार्यक्षमता देण्यावरील आमचा विश्वास अधिक दृढ केला आहे. आम्ही या यशाचा महत्त्वपूर्ण भाग असण्यासाठी ग्राहकांचे आभार व्यक्त करतो.”
भारतातील आधुनिक, दूरगामी ग्राहकांच्या महत्त्वाकांक्षांची पूर्तता करण्यासाठी डिझाइन करण्यात आलेल्या किया सोनेटने सबकॉम्पॅक्ट एसयूव्ही श्रेणीमध्ये आकर्षक नवीन अभिव्यक्तीची भर केली. या वेईकलमध्ये विशिष्ट डिझाइन, प्रगत तंत्रज्ञान, प्रतिसादात्मक कार्यक्षमता आणि दैनंदिन व्यावहारिकतेचे संयोजन आहे. भारतात कियाच्या ‘मेक इन इंडिया, फॉर द वर्ल्ड’ दृष्टिकोनांतर्गत उत्पादित करण्यात आलेली सोनेट सतत ग्राहकांच्या विकसित होत असलेल्या अपेक्षांची पूर्तता करत आली आहे, पहिल्यांदा कार खरेदी करणाऱ्या मालकांपासून तरूणांपर्यंत सर्व ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे, तसेच देशातील सर्वात स्पर्धात्मक श्रेणीमध्ये नवीन मापदंड स्थापित करत आहे.
या टप्प्यामधून किया इंडियाचा ग्राहक-केंद्रित दृष्टिकोन दिसून येतो, जेथे सोनेट ब्रँडची प्रमुख आधारस्तंभ ठरली आहे आणि देशांतर्गत आकारमानांमध्ये जवळपास ३५ टक्के योगदान दिले आहे आणि संपूर्ण भारतात कियाची पोहोच वाढवत आहे. या वेईकलचे यश जागतिक स्तरावर देखील दिसून येते, जेथे एमईए, मध्य व दक्षिण अमेरिका, मेक्सिको आणि एपीएसी प्रांतासह जवळपास ७० बाजारपेठांमध्ये १००,००० हून अधिक युनिट्स निर्यात करण्यात आल्या आहेत. यासह भारतात डिझाइन करण्यात आलेल्या किया उत्पादनांवर आंतरराष्ट्रीय स्तरावरील दृढविश्वास दिसून येतो.
सोनेटप्रती ग्राहकांचा प्रतिसाद शहरी व उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये सतत उत्तम राहिला आहे. या वेईकलने सलग दोन वर्षांसाठी १ लाख युनिट्सच्या वार्षिक विक्रीचा टप्पा पार केला आहे, ज्यामधून ग्राहकांचा दृढविश्वास दिसून येतो. या वेईकलची पॉवरट्रेन पर्यायांची वैविध्यपूर्ण श्रेणी, ट्रान्समिशन पर्याय आणि वैशिष्ट्य-संपन्न ट्रिम्सनी ग्राहकांना विविध पर्यायांमधून निवड करण्यास सक्षम केले आहे, ज्यासह त्यांचा एकूण मालकीहक्क अनुभव अधिक चांगला झाला आहे. उच्च व्हेरिएण्ट्ससाठी स्थिर पसंतीमधून कनेक्टेड, सुरक्षित व प्रीमियम गतीशीलता सोल्यूशन्ससाठी वाढती मागणी दिसून येते. किया इंडिया आपला पोर्टफोलिओ वाढवत आहे, तसेच ३६९ शहरांमध्ये ८२१ टचपॉइण्ट्ससह ब्रँड उपस्थिती वाढवत आहे. सोनेट ग्राहक विश्वास, जागतिक प्रासंगिकता आणि कियाच्या नाविन्यता-नेतृत्वित, ग्राहक-केंद्रित विकासाचे महत्त्वपूर्ण प्रतीक आहे.






