फोटो सौजन्य: Freepik
भारतात रॉयल एनफिल्डचे अनेक चाहते आहेत. हल्ली या कंपनीच्या बाईक्सची क्रेज इतकी आहे की आपल्याला गल्ली बोळात सुद्धा अनेकांच्या दारासमोर बुलेट पार्क केलेली दिसते. ग्राहकांचे हेच प्रेम पाहता कंपनी सुद्धा मार्केटमध्ये दमदार आणि स्टयलिश बाईक्स लाँच करत असते.
आता नुकतेच कंपनी आपल्याला आगामी रॉयल एनफील्ड क्लासिक 350 वर काम करत आहे. ही बाईक टेस्टिंग दरम्यान लाँच झाली आहे. बॉबर असे या बाईकचे नाव ठेवण्यात आले आहे. ही बाईक रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 वर आधारित आहे. तसेच हँगर हँडलबार, खोल स्कूप्ड सीट आणि व्हाईट वॉल टायरमुळे बॉबर स्टायलिश वाटत आहे. या आगामी बाईकमध्ये कोणते फिचर्स दिसले ते जाणून घेऊया.
बॉबर स्टाईल बाईक ही मुळात सिंगल सीट बाईक आहे, परंतु स्पॉट केलेल्या बाईकमध्ये पर्यायी पिलियन सीट जोडलेली दिसत आहे. कदाचित हे बाईकचे व्यावहारिकता सुधारण्यासाठी आहे. हा असा पर्याय रॉयल एनफील्ड शॉटगन 650 मध्ये देखील दिला जात आहे.
या नवीन बाईकच्या इंजिनबद्दल बोलायचे झाले तर ते Classic 350 सारखेच दिसू शकते. यात 349cc, एअर-कूल्ड इंजिन दिले जाऊ शकते, जे 100rpm वर 20.2bhp आणि 4,000rpm वर 27Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. इंजिनला पाच-स्पीड गिअरबॉक्ससह जोडलेले आहे. बाईकमध्ये दोन्ही बाजूंना टेलिस्कोपिक फोर्क आणि मागील बाजूस ट्विन शॉक अब्जोर्बर असलेली क्रॅडल फ्रेम आहे. दोन्ही चाकांना डिस्क ब्रेक देण्यात आला आहे.
ही बाईक अनेक उत्कृष्ट कलर ऑप्शनसह ऑफर केली जाऊ शकते. कंपनीने नुकतेच Classic 350 चे अपग्रेड केलेले मॉडेल नवीन रंगात सादर केले होते. असे म्हटले जात आहे की क्लासिक 350 बॉबर या वर्षाच्या अखेरीस लाँच केली जाऊ शकते. त्याची एक्स-शोरूम किंमत सुमारे 2 लाख रुपये असेल.