• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Tata Motors Has Announced The Starting Prices Of The Harrier Ev

Tata Harrier EV च्या किमती जाहीर, तुमच्या बजेटमध्ये येईल का कार? जाणून घ्या किंमत आणि बरचं काही एका क्लिकवर   

कंपनीने नुकतीच टाटा हॅरियर ईव्ही सादर केली. आतापर्यंत फक्त त्याच्या एंट्री लेव्हल व्हेरियंटच्या किंमती जाहीर करण्यात आल्या होत्या. आता कंपनीने तिच्या रिअल व्हील ड्राइव्ह सिस्टमसह येणाऱ्या सर्व व्हेरियंटच्या किंमती जाहीर

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 25, 2025 | 03:30 AM
Tata Harrier EV च्या किमती जाहीर, तुमच्या बजेटमध्ये येईल का कार? जाणून घ्या किंमत आणि बरचं काही एका क्लिकवर

Tata Harrier EV च्या किमती जाहीर, तुमच्या बजेटमध्ये येईल का कार? जाणून घ्या किंमत आणि बरचं काही एका क्लिकवर

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
मुंबई : टाटा मोटर्सने अलीकडेच त्यांची नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही टाटा हॅरियर ईव्ही अधिकृतपणे विक्रीसाठी लाँच केली आहे. टाटा मोटर्स या भारतातील सर्वात मोठ्या चार-चाकी इव्ही उत्पादकाने आज (24 जून) भारतात बनलेल्या सर्वात दमदार एसयूव्ही हॅरियर इव्हीच्या  किंमतींची घोषणा केली. केवळ या उद्योगातच नाही, तर जगात नवीन असलेली इनोव्हेशन्स आणि बॅटरी पॅकवर आजीवन वॉरंटीसह सुलभ मालकी प्रदान करण्याबाबतची कंपनीची वचनबद्धता दर्शविणाऱ्या हॅरियर.इव्हीने केवळ आपली विश्वासार्हता मजबूत केलेली नाही, तर सुपर-कार सारखा परफॉर्मन्स, कुठेही घेऊन जाऊ शकणारी ऑफ-रोड क्षमता, आकर्षक टेक्नॉलॉजी आणि आलीशान आरामदायकता प्रदर्शित करून भविष्याची अल्टीमेट एसयूव्ही म्हणून प्रस्थापित केले आहे.

Sanjay Kapur च्या Sona Comstar ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी कंपनीचा नवा चेअरपर्सन, 30 हजार कोटीचा व्यवसाय कोण सांभाळणार

काय आहे किंमत?

२ जुलै पासून हॅरियर.इव्हीचे बुकिंग सुरू होत आहे. रियर-व्हील ड्राइव्ह (आरडब्ल्यूडी) द्वारा संचालित प्रकारासाठीच्या प्रारंभिक किंमती २१.४९ लाखांपासून सुरु होत आहेत. हॅरियर.इव्ही अॅडव्हेंचर ६५ची किंमत २१.४९ लाख रुपये, अॅडव्हेंचर एस ६५ ची किंमत २१.९९ लाख रुपये, फियरलेस+ ६५ ची किंमत २३.९९ लाख रुपये, फियरलेस+ ७५ ची किंमत २४.९९ लाख रुपये आणि एम्पॉवर्ड ७५ ची किंमत २७.४९ लाख आहे.
हॅरियर.इव्हीच्या स्पर्धात्मक किंमती ठेवण्याच्या धोरणाविषयी टिप्पणी करताना टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडचे चीफ कमर्शियल ऑफिसर विवेक श्रीवास्तव म्हणाले, “हॅरियर.इव्ही सह एका सुपरकार प्रमाणे बेजोड परफॉर्मन्स देण्याची, कुठेही ऑफ रोड जाण्याची, आलिशान आरामदायकता देण्याची एका एसयूव्हीची खरी क्षमता उघड करण्याची आमची इच्छा आहे. हॅरियर.इव्हीमध्ये लक्षणीय असे काय आहे, तर हे वाहन या सर्वच गोष्टी प्रदान करते आणि तेही आयसीई संचालित वाहनांच्या किंमतीत.आणि परफॉर्मन्स, कार्यक्षमता, टेक्नॉलॉजी आणि सुरक्षा या बाबतीत मात्र हॅरियर.इव्ही आयसीई संचालित वाहनांना मागे टाकते.
तसेच आज या वाहनाच्या किंमती जाहीर करताना आम्ही भारतात ई-मोबिलिटीला पुढे घेऊन जाण्याच्या दिशेने एक लक्षणीय पाऊल उचलत आहोत आणि त्याचबरोबर पारंपरिक आयसीई संचालित वाहनांना एक दमदार पर्याय देऊ करत आहोत. आम्हाला खात्री आहे की, हॅरियर.इव्ही एसयूव्ही या उद्योगात एसयूव्हीच्या नवीन युगाची सुरुवात करेल. या युगात वाहनाला शक्ती कुठून मिळते हे नाही, तर वाहन कशी शक्ती प्रदान करते हे महत्त्वाचे असेल.”

हॅरियर.इव्हीची ठळक वैशिष्ट्ये

  • सुपरकारसारखा परफॉर्मन्स अनुभवा
  • पुढच्या बाजूस १५८ पीएस (११६ केडब्ल्यू)ची ड्युअल मोटर शक्ती आणि मागील बांजून २३८ पीएस (१७५ केडब्ल्यू)
  • ड्युअल मोटर सेटअपमधून ५०४ एनएम टॉर्क
  • ६.३ सेकंदात ०-१०० किमी प्रति तास सेगमेन्ट मध्ये सर्वश्रेष्ठ
  • या एसयूव्हीसह कुठेही ऑफ-रोड जाण्याच्या क्षमतेचा आनंद अनुभवा
  • क्वॉड व्हील ड्राइव्ह सिस्टमसह अप्रतिम ऑफ-रोड अनुभव मिळवा
  • सहा टेरेन मोड असल्यावर काहीच अशक्य नाही, यामुळे कुठेही बिनधास्त जाण्याचा विश्वास मिळतो
  • ५४० अंश सराऊंड व्ह्यू सह आसपासचे आणि खालचे देखील बघू शकता
  • सेव्हर इंडल्जंट टेक्नॉलॉजी आणि पूर्वी कधीही नव्हती इतकी आरामदायकता
  • असामान्य हाताळणी आणि चालवण्याच्या कम्फर्टसाठी फ्रिक्वन्सी डिपेन्डन्ट डॅम्पिंगसह अल्ट्रा गाइड सस्पेंशनसह बेजोड आरामदायकता आणि शांती मिळवा
जगातील पहिली हरमनची ३६.९ सेमी (१४.५३”) सिनेमॅटिक इन्फोटेन्मेंट स्क्रीन, जी सॅमसंग निओ क्यूएलईडीद्वारा संचालित आहे. हा जगातील पहिला निओ क्यूएलईडी ऑटोमोटिव्ह डिस्प्ले आहे, यात JBL ऑडिओ मोड आणि डॉल्बी अॅटमॉस सह जेबीएल ब्लॅक १० स्पीकर सिस्टम आहे, जी थिएटरमॅक्स अनुभव देते
  •  ई-व्हॅले ऑटो पार्क असिस्ट, डिजी अॅक्सेस डिजिटल की आणि ड्राइव्हपे सह तुमच्या हातात सुविधेचे बळ
  • मालकीच्या मुक्त अनुभवासाठी बॅटरी पॅकवर आजीवन वॉरंटी दिली आहे (*फक्त प्रथम मालक – खाजगी वैयक्तिक ग्राहकासाठीच)
  • ७५ केडब्ल्यूएच बॅटरी पॅकचे पाठबळ जे ६२७ किमीची एआरएआय प्रमाणित (पी१ + पी२) रेंज (अंदाजे ४८० किमी – ५०५ किमी सी७५ रेंज) देते
  • १५ मिनिटांच्या चार्जिंगमध्ये २५० किमी पर्यंत रेंज जोडून जलद चार्जिंग स्पीडचा लाभ मिळवा
  • हॅरियर.इव्ही केवळ आपल्या अत्याधुनिक क्षमता प्रदर्शित करत नाही, तर देशात बनणाऱ्या एसयूव्हीसाठी एक नवीन मापदंड स्थापित करते.

आई शपथ! रंग बदलणारी कार, 8 वे आश्चर्य की काय? Porsche Car चा ‘कारनामा’

Web Title: Tata motors has announced the starting prices of the harrier ev

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2025 | 03:30 AM

Topics:  

  • auto news
  • automobile

संबंधित बातम्या

Maruti Suzuki Grand Vitara च्या 39000 पेक्षा जास्त मॉडेल्स बोलावले परत, कारमध्ये झाला मोठा बिघाड
1

Maruti Suzuki Grand Vitara च्या 39000 पेक्षा जास्त मॉडेल्स बोलावले परत, कारमध्ये झाला मोठा बिघाड

पाकिस्तानातील महागाईचा नवा उच्चांक! Swift ची किंमत 44 लाखांवर तर Toyota Fortuner ची किंमत कोटींमध्ये
2

पाकिस्तानातील महागाईचा नवा उच्चांक! Swift ची किंमत 44 लाखांवर तर Toyota Fortuner ची किंमत कोटींमध्ये

EVs चा भारतीय Auto Sector मध्ये दबदबा! ऑक्टोबर Electric Car च्या विक्रीत भरमसाट वाढ
3

EVs चा भारतीय Auto Sector मध्ये दबदबा! ऑक्टोबर Electric Car च्या विक्रीत भरमसाट वाढ

Kawasaki ने भारतात लाँच केली 1,099 cc इंजिनच्या 2 बाईक, किंमत 12 लाखांपेक्षाही जास्त
4

Kawasaki ने भारतात लाँच केली 1,099 cc इंजिनच्या 2 बाईक, किंमत 12 लाखांपेक्षाही जास्त

ताज्या बातम्या

पुढे वाचा
अभूतपूर्व घटना! ‘हि’ अशी कोणती परीक्षा आहे ज्यासाठी ‘या’ देशाने चक्क रद्द केली 140 विमान उड्डाणे

अभूतपूर्व घटना! ‘हि’ अशी कोणती परीक्षा आहे ज्यासाठी ‘या’ देशाने चक्क रद्द केली 140 विमान उड्डाणे

Nov 15, 2025 | 03:45 PM
Smriti Mandhana पहिल्यांदाच दिसली एंगेजमेंट रिंग घालून; पलाश मुच्छलने या क्रिकेट स्टेडियममध्ये केला प्रपोज

Smriti Mandhana पहिल्यांदाच दिसली एंगेजमेंट रिंग घालून; पलाश मुच्छलने या क्रिकेट स्टेडियममध्ये केला प्रपोज

Nov 15, 2025 | 03:41 PM
Science Centre Inauguration: मीरा-भाईंदरसहित संपूर्ण मुंबई विभागासाठी फायद्याचे! आता मनोरंजातून शिका विज्ञान

Science Centre Inauguration: मीरा-भाईंदरसहित संपूर्ण मुंबई विभागासाठी फायद्याचे! आता मनोरंजातून शिका विज्ञान

Nov 15, 2025 | 03:36 PM
Nashik News: कुंभमेळा कामांच्या ठेकेदारीवरून अधिकाऱ्यांना क्लीन चिट; शिंदे गटाला चपराक, फडणवीसांचे एका दगडात दोन पक्षी

Nashik News: कुंभमेळा कामांच्या ठेकेदारीवरून अधिकाऱ्यांना क्लीन चिट; शिंदे गटाला चपराक, फडणवीसांचे एका दगडात दोन पक्षी

Nov 15, 2025 | 03:36 PM
Bhavana Ghanekar : उरण नगराध्यक्षपदासाठी भावना घाणेकरांचा अर्ज दाखल

Bhavana Ghanekar : उरण नगराध्यक्षपदासाठी भावना घाणेकरांचा अर्ज दाखल

Nov 15, 2025 | 03:34 PM
कधी विचार केलाय ? बाळाला कडदोरा का बांधतात? काय सांगतात तज्ज्ञ

कधी विचार केलाय ? बाळाला कडदोरा का बांधतात? काय सांगतात तज्ज्ञ

Nov 15, 2025 | 03:31 PM
THANE : महायुतीचे यश विरोधकांनी मान्य करा, प्रताप सरनाईक यांचा टोला

THANE : महायुतीचे यश विरोधकांनी मान्य करा, प्रताप सरनाईक यांचा टोला

Nov 15, 2025 | 03:30 PM

व्हिडिओ

पुढे बघा
विरोधक कितीही एकत्र येवोत, विकासाच्या मुद्द्यावर जनता आमच्याच पाठीशी, डहाणूमध्ये भाजपचा निर्धार

विरोधक कितीही एकत्र येवोत, विकासाच्या मुद्द्यावर जनता आमच्याच पाठीशी, डहाणूमध्ये भाजपचा निर्धार

Nov 14, 2025 | 07:15 PM
Palghar News : डहाणूमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, भाजप विरोधात बळ एकवटले

Palghar News : डहाणूमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, भाजप विरोधात बळ एकवटले

Nov 14, 2025 | 06:54 PM
Raigad : पेण तालुक्यात 4 वर्षाची चिमुकली बेपत्ता, 24 तास उलटून देखील मुलीचा तपास नाही

Raigad : पेण तालुक्यात 4 वर्षाची चिमुकली बेपत्ता, 24 तास उलटून देखील मुलीचा तपास नाही

Nov 14, 2025 | 12:33 PM
Ulhasnagar : सिंधी समाजाच्या निषेधार्थ सिंधी एकता पत्रकार मंचाची ऐतिहासिक आक्रोश रॅली

Ulhasnagar : सिंधी समाजाच्या निषेधार्थ सिंधी एकता पत्रकार मंचाची ऐतिहासिक आक्रोश रॅली

Nov 14, 2025 | 11:51 AM
Sunil Tatkare : रायगडच्या कर्जत, खोपोली, माथेरानमधील राष्ट्रवादीचे उमेदवार ठरले

Sunil Tatkare : रायगडच्या कर्जत, खोपोली, माथेरानमधील राष्ट्रवादीचे उमेदवार ठरले

Nov 14, 2025 | 11:46 AM
Kalyan News : कल्याणमध्ये प्रथम येणाऱ्याला एक्टिवा भेट! शिंदे गटाकडून विद्यार्थ्यांसाठी अनोखी योजना

Kalyan News : कल्याणमध्ये प्रथम येणाऱ्याला एक्टिवा भेट! शिंदे गटाकडून विद्यार्थ्यांसाठी अनोखी योजना

Nov 13, 2025 | 07:55 PM
Thane : ठाण्यात एमडी ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश

Thane : ठाण्यात एमडी ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश

Nov 13, 2025 | 07:42 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.