पोर्श बदलतेय रंग, कसा ते नक्की पहा (फोटो सौजन्य - iStock/X.com)
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर, शीतल यादव नावाच्या एका महिलेने पोर्श कारचा व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये एक अद्भुत कार दिसते जी तिच्या जवळून जाणाऱ्या व्यक्तीच्या कपड्यांनुसार रंग बदलू शकते. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्वांनाच आश्चर्य वाटले आहे. चला तर मग जाणून घेऊया हा व्हिडिओ काय आहे आणि त्यात काय दिसते.
खरं तर पोर्श कार ही अत्यंत महाग कार्सपैकी एक आहे. मात्र आता ही कार चालवताना रंगही बदलू शकते असं जर तुम्हाला सांगितलं तर तुमचा विश्वासच बसणार नाही. पण अहो विश्वास ठेवावाच लागेल. कारण आता असा व्हिडिओदेखील समोर आला आहे. शीतल यादवने शेअर केलेला हा व्हिडिओ पहाच, तुमचेही डोळे विस्फारतील (फोटो सौजन्य – X.com)
व्हिडिओ झालाय व्हायरल
खरंतर डॉ. शीतल यादव नावाच्या एका महिलेने या नवीन पोर्श कारचा व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये असे दिसून येते की जो कोणी या कारजवळून जात आहे, ही कार त्याच्या कपड्यांच्या रंगानुसार रंग बदलते आणि हे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटते. शीतल यादवने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे.
“ही पोर्श कंपनीची कार आहे, या कारची खासियत अशी आहे की ती कळायच्या आता एका क्षणात रंग बदलते. भारतात पोर्श कारची किंमत १ कोटी ते ५ कोटी पर्यंत आहे, पोर्श व्यतिरिक्त, बीएमडब्ल्यूनेही अशी कार बनवली आहे परंतु बीएमडब्ल्यूमध्ये फक्त दोन रंग आहेत काळा आणि पांढरा. त्यामुळे या पोर्श कारबाबत उत्सुकता अधिक वाढल्याचे दिसून येत आहे.
‘या’ दिवशी लाँच होणार Kia Carens Clavis, ‘एवढी’ असू शकते संभाव्य किंमत
कसे आहे तंत्र
BMW कंपनीने कारचा रंग बदलण्याच्या प्रक्रियेबद्दलही माहिती काही वर्षांपूर्वी दिली होती. कंपनीच्या मते, ही प्रक्रिया इलेक्ट्रिक सिग्नलद्वारे नियंत्रित केली जाते. ज्याला इलेक्ट्रोफोरेटिक तंत्रज्ञान म्हणतात. यासाठी कोणत्याही अतिरिक्त उर्जेची आवश्यकता नाही. या अंतर्गत, वेगवेगळ्या रंगांचे रंगद्रव्य पृष्ठभागावर येतात, ज्यामुळे ते निवडलेला रंग संपूर्ण कारवर लागू करते.
कंपनीचे ग्रुप डिझाइन प्रमुख एड्रियन व्हॅन यांनी सांगितले होते की, हा बीएमडब्ल्यू आयएक्स फ्लो एक प्रगत संशोधन आणि डिझाइन प्रकल्प आहे आणि बीएमडब्ल्यूच्या भविष्यातील विचारसरणीचे एक उत्तम उदाहरण आहे. याप्रमाणेच आता पोर्शमध्येही हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आल्याचे दिसून येत आहे.
पहा व्हायरल व्हिडिओ
यह पोर्श (Porsche) कम्पनी की कार है, इस कार की खासियत है कि यह पलक झपकते ही अपना रंग बदल लेती है।
Porsche कार की कीमत भारत में 1cr से 5cr तक है,
Porsche के अलावा इस तरह की कार BMW ने भी बनाई है लेकिन BMW में ब्लैक और व्हाइट दो ही रंग है। pic.twitter.com/njw9V877gQ
— Dr. Sheetal yadav (@Sheetal2242) June 23, 2025
अशाप्रकारे करा प्लॅनिंग, हमखास खरेदी कराल Mahindra XUV 3XO चा बेस व्हेरिएंट