Tata Nexon की Curvv, कोणत्या कारवर सरकार लावत आहे जास्त टॅक्स? जाणून घ्या
भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्र हे प्रचंड मोठे क्षेत्र आहे. त्यामुळेच फक्त स्वदेशी नाही तर विदेशी ऑटो कंपनीज सुद्धा भारतात कार्स आणि बाईक्स विकत असतात. तसेच भारतीय ग्राहकांना स्वस्तात मस्त कार्स हव्या असतात त्यामुळेच कंपनीज नेहमीच दर्जेदार कार्सवर दमदार ऑफर्स लाँच करत असतात.
आज भारतात काही मोजक्याच ऑटो कंपनीज आहेत ज्यांच्या कार्स ग्राहक डोळे झाकून खरेदी करत असतात. यातीलच एक कंपनी म्हणजे टाटा मोटर्स. टाटा मोटर्सने भारत अनेक कार्स लाँच केल्या आहेत, ज्याची काही चांगल्याच लोकप्रिय ठरल्या आहेत.
हे देखील वाचा: ‘ही’ आहे भारतात विकली जाणारी सर्वात महागडी बाईक, किंमत Fortuner Innova पेक्षा जास्त
Tata Nexon भारतातील सर्वात लोकप्रिय कार्सपैकी एक आहे. नुकतेच टाटा मोटर्सने भारतीय बाजारात Tata Curve ही नवीन कार लाँच केली होते. Tata Curve चे अनेक फीचर्स हे Nexon सारखेच आहेत. पण कर्व्हची किंमत नेक्सॉनपेक्षा सुमारे दोन लाख रुपये जास्त आहे. एकीकडे, Tata Nexon ची किंमत 7.99 लाख रुपयांपासून सुरू होते. तर Tata Curve ची एक्स-शोरूम किंमत 9.99 रुपयांपासून सुरू होते.
टाटा मोटर्सच्या या दोन्ही कारमध्ये काही फरक आहे, ज्यामुळे कर्व्ह वर जास्त टॅक्स आहे. Nexon आणि Curve मधील कोणती कार खरेदी करताना तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते ते आज आपण जाणून घेणार आहोत.
सरकारी गाईडलाइन्सनुसार, पेट्रोल, सीएनजी किंवा एलपीजीवर चालणाऱ्या वाहनांवर सरकार 29 टक्के कर लावते. विशेषतः ज्यांचे इंजिन 1200 सीसीपेक्षा कमी आहे आणि ज्यांची लांबी 4 मीटरपेक्षा कमी आहे.
याशिवाय पेट्रोल, सीएनजी किंवा एलपीजीवर चालणाऱ्या वाहनांवर ज्यांचे इंजिन 1200 सीसीपेक्षा कमी आहे, परंतु त्यांची लांबी ४ मीटरपेक्षा जास्त आहे, त्यांच्यावर सरकार एकूण 43 टक्के टॅक्स लावते.
वाहनांवरील सरकारच्या कर धोरणानुसार, टाटा नेक्सॉन, जी 4 मीटरच्या रेंजमध्ये येते, त्यावर 29 टक्के कर आकारला जातो. तर टाटा कर्व्हची लांबी सुमारे 4.3 मीटर आहे. या कारणास्तव सरकार कर्व्हवर 43 टक्के कर लावते.