फोटो सौजन्य: Freepik
आपली स्वतःची बाइक असणे आणि ती मोकळ्या रस्त्यावर मनमुराद चालवणे हा आनंदच काह औरच असतो. परंतु याच आनंदाला तडा जाऊ शकतो, तेही जर तुमच्या बाईकचे इंजिन सीज झाले तर. यात मुख्यतः लोकं असे समजतात की जुन्या बाइक्सना इंजिन सीज होण्यासारख्या समस्या येऊ शकतात. पण तसे नाही आहे.
एखादी जुन्या किंवा नव्या बाइकचे इंजिन सुद्धा सीज होऊ शकते. ज्यामुळे तुमच्या खिशाला मोठी कात्री बसण्याची शक्यता आहे. इंजिन सीज झाल्यामुळे बाइकच्या परफॉर्मन्सवर सुद्धा परिणाम होऊ शकतो. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला इंजिन सीज होण्यामागील पाच कारणे सांगणार आहोत.
इंजिन ऑइल इंजिनच्या भागांना चांगले तसेच थंड ठेवते. इंजिनमध्ये पुरेसे ऑइल नसल्यास किंवा ऑइल खराब झाले असल्यास, इंजिनचे भाग एकत्र घासून सीज होऊ शकतात. ज्याचा परिणाम तुम्हाला बाइकच्या परफॉर्मन्समध्ये जाणवेल.
जर इंजिन जास्त गरम झाले तर ते सीज होऊ शकते. इंजिन जास्त गरम होण्याची अनेक कारणे असू शकतात, जसे की अपुरे कूलिंग, एअर फिल्टर बंद होणे किंवा चुकीच्या इंधनाचा वापर.
कूलंट बाइकमधील इंजिन थंड ठेवण्यास मदत करते. जर इंजिनमध्ये पुरेसे कूलंट नसेल किंवा कूलंट खराब झाले असेल तर यामुळे इंजिन जास्त तापू शकते आणि सीज सुद्धा होऊ शकते.
जर तुम्ही तुमच्या मोटारसायकलमध्ये चुकीचे इंधन वापरत असाल तर त्यामुळे इंजिन खराब होऊ शकते आणि ते सीज होऊ शकते. यामुळे नेहमीच बाइकच्या उत्तम परफॉर्मन्ससाठी उच्प्रतीचे इंधनच वापरा.
काही वेळा इंजिनमधील समस्या इंजिन सीज होण्याची कारणं बनू शकतात. तुटलेला पिस्टन किंवा रिंग हे इंजिन सीज होण्यामागील प्रमुख कारणे असू शकतात.
आपल्या इंजिन ऑइलची स्थिती नियमित चेक करा
बाईकचे एअर फिल्टर नियमितपणे स्वच्छ करा किंवा बदला.
तुमची मोटारसायकल जास्त गरम होण्यापासून ठेवा.
तुमच्या मोटारसायकलची नियमित सर्व्हिसिंग करा.
तुमच्या मोटारसायकलचे इंजिन सीज झाल्यास, तुम्ही ताबडतोब एखाद्या चांगल्या मेकॅनिककडे आपली मोटारसायकल घेऊन जावी. जर तुम्हाला इंजिनला सीज होण्यापासून टाळायचे आहे तर नियमित देखभाल आणि काळजीपूर्वक वाहन चालवणे महत्वाचे आहे.