फोटो सौजन्य: YouTube
सध्या भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात अनेक कार्स, बाइक्स आणि स्कूटर्स लाँच होत आहे. एकीकडे इलेक्ट्रिक बाइक्स आणि स्कूटर्सची वाढती मागणी पाहता अनेक दुचाकी उत्पादक कंपनीज आगामी काळात अधिक इलेक्ट्रिक टू व्हीलर लाँच करण्याच्या तयारीत आहे तर दुसरीकडे आजही अनेक ग्राहक पेट्रोलवर चालणाऱ्या दू चाकींना प्राधान्य देत आहे.
अलीकडेच TVS कंपनीने आपली ज्युपिटर 110 भारतीय बाजारपेठेत लाँच केली आहे. त्याच्या बेस मॉडेलची एक्स-शोरूम किंमत 73,700 रुपये आहे. तर टॉप-स्पेक ट्रिमची एक्स-शोरूम किंमत 87,250 रुपये आहे. जर तुम्ही सुद्धा ही स्कूटर विकत घेण्याचा विचार करताय, पण त्याचवेळी अन्य पर्यायांच्या शोधात आहात तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आपण ज्युपिटर 110 च्या किंमतीत येणाऱ्या टू व्हीलर्सबद्दल जाणून घेणार आहोत.
होंडाच्या या नवीन स्कुटरच्या टॉप-स्पेक एच-स्मार्ट वेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 82,684 रुपये आहे. त्याच वेळी, ही सर्वात जास्त विक्री होणाऱ्या स्कूटरपैकी एक आहे. ही स्कुटर 109cc सिंगल-सिलेंडर इंजिनसह येते, जे 7.73bhp पॉवर आणि 8.90Nm टॉर्क जनरेट करते. यात एलईडी हेडलाइट, सायलेंट स्टार्टर, सीट उघडण्यासाठी ड्युअल फंक्शन स्विच, फ्युएल लीड आणि कीलेस ऑपरेशन यांसारखी फीचर्स आहेत.
हे देखील वाचा: टाटाची सर्वात जास्त विकली जाणारी ‘ही’ कार झाली टॅक्स फ्री, आजच करा बुक
Hero Splendor Plus च्या टॉप-स्पेक वेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 78,286 रुपये आहे. अॅक्टिव्हा 6G प्रमाणेच हे लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. त्याच वेळी, ही मोटरसायकल भारतीय बाजारात सर्वाधिक विकली जाणारी वाहन आहे. यात 97.2cc, एअर-कूल्ड इंजिन आहे, जे 7.91bhp पॉवर आणि 8.05Nm टॉर्क जनरेट करते. त्याचे इंजिन चार-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.
Honda Shine च्या डिस्क ब्रेक वेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 84,250 रुपये आहे. यात 123cc सिंगल-सिलेंडर इंजिन आहे, जे 10.59bhp पॉवर आणि 11 Nm टॉर्क जनरेट करते. या बाईकचे इंजिन पाच-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. यात टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स आणि ड्युअल रिअर स्प्रिंग आहे.
अॅक्टिव्हा 6G व्यतिरिक्त, होंडाची अॅक्टिव्हा 125 देखील भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात खूप लोकप्रिय आहे. त्याच्या टॉप-स्पेक H-Smart मॉडेलची एक्स-शोरूम किंमत 89,429 रुपये आहे. यात 124cc सिंगल-सिलेंडर इंजिन आहे, जे 8.19bhp पॉवर आणि 10.4Nm पीक टॉर्क जनरेट करते.
Yamaha Fascino 125 ची एक्स-शोरूम किंमत 94,830 रुपये आहे. यात 125cc एअर-कूल्ड इंजिन आहे, जे 8.04bhp पॉवर आणि 10.03Nm पीक टॉर्क जनरेट करते. आपण जाणतोच की यामाहा स्कूटरमध्ये स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, साइड-स्टँड इंजिन कट ऑफ आणि एलईडी लाईट्स असतात. या स्कुटरला रेट्रो डिझाइन देण्यात आला आहे, जे इतर स्कूटर्सपेक्षा वेगळे हिला बनवते.