सौजन्य- TVS Website
भारतातील लोकप्रिय Two Wheeler उत्पादक कंपनी TVS मोटरने आपल्या लोकप्रिय Apache RTR 160 ची रेसिंग मॉडेल लॉंच केले आहे. TVS ने हे मॉडेल 1,28,720 रुपये एक्स-शोरूम किंमतीत बाजारात लॉंच केले आहे. हे नवीन Apache RTR 160 2V लाइनअपचे हाय व्हेरिएंट मॉडेल आहे. TVS ने भारतातील त्याच्या डीलरशिप नेटवर्कवर या नवीन मॉडेलची बुकिंग सुरू केले आहे.
TVS Apache RTR 160 रेसिंग मॉडेलमधील नाविन्यता
या रेसिंग मॉडेलमध्ये सर्वात खास गोष्ट म्हणजे त्याची मॅट ब्लॅक कलर स्कीम आहे, जी ठळक लाल आणि राखाडी ग्राफिक्ससह आकर्षक बनवण्यात आली आहे. हा पेंट फ्युएल टँक, फ्रंट फेंडर आणि टेल सेक्शनला उत्तम लुक देतो. बाईकचे व्हिज्युअल आकर्षण त्याच्या लाल अलॉय व्हीलमुळे अधिक वाढले आहे, जे तिला स्पोर्टी टच देतात. या बदलांशिवाय मोटरसायकलमध्ये कोणतेही यांत्रिक बदल करण्यात आलेले नाहीत.Apache RTR 160 Racing Edition मध्ये 160cc एअर-कूल्ड इंजिन आहे, जे 16.04 hp ची पॉवर आणि 12.7 Nm चा पीक टॉर्क देते. पाच-स्पीड गिअरबॉक्ससह, ही बाइक 107 किमी प्रतितास इतका वेग देऊ शकणार आहे.
TVS Apache RTR 160 रेसिंग मॉडेलची वैशिष्ट्ये
TVS Apache RTR 160 वैशिष्ट्यांच्या बाबतीत विचार करायचा झाल्यास रेसिंग एडिशनमध्ये तीन राइड मोड आहेत – स्पोर्ट, अर्बन आणि रेन. सर्व तीन मोड वेगवेगळ्या राइडिंग परिस्थितीनुसार आहेत. यामध्ये TVS SmartXonnect आणि नेव्हिगेशन आणि नोटिफिकेशनसाठी व्हॉइस असिस्टसह ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह डिजिटल एलसीडी क्लस्टर देखील आहे. LED हेडलॅम्प आणि टेल लॅम्प्सच्या समावेशामुळे प्रवास करतानाची दृश्यमानता आणखी सुधारली आहे. तसेच हे लॅम्प्स बाइकला समोरून एक प्रगत लूक देतात, तर ग्लाइड थ्रू टेक्नॉलॉजी (GTT) कमी वेगाने आरामदायी राइड सुनिश्चित करते.
Apache ही TVS ची गेल्या अनेक वर्षापासून लोकप्रिय असेलेली बाईक आहे. या नवीन मॉडेलमुळे ग्राहकांना अजून आकर्षक आणि आधुनिक वैशिष्टये असलेली Apache घेता येणार आहे.